Video | भिजलेले कपडे कसे काढावे, माणसाने सांगितली खास ट्रिक, एकदा पाहाच

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: |

Updated on: Aug 31, 2021 | 10:26 PM

व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये एक महिला स्वीमिंग पूलमधून बाहेर आली आहे. पाण्यातून नुकतीच बाहेर आल्यामुळे महिलेचे सगळे अंग भिजले आहे. अंग भिजल्यामुळे तिला काय करावे हे समजत नाहीये.

Video | भिजलेले कपडे कसे काढावे, माणसाने सांगितली खास ट्रिक, एकदा पाहाच
swimming video

Follow us on

मुंबई : सोशल मीडियावर रोजच अनेक व्हिडीओ व्हायरल होतात. यामध्ये काही व्हिडीओ हे अतिशय मजेदार असतात तर काही व्हिडीओंना पाहून आपण हरखून जातो. काही व्हिडीओंमध्ये वेगवेगळ्या ट्रिक सांगितलेल्या असतात. सध्या असाच एक व्हिडीओ चर्चेचा विषय ठरला आहे. या व्हिडीओमध्ये एक महिला आणि पुरुषाने पाण्याने शर्ट भिजल्यावर नेमकं काय करावं हे चपखलपणे सांगितलं आहे. (man teaching women how to remove wet shirt video went viral on social media)

महिलेचे कपडे पाण्याने भिजले

व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये एक महिला स्वीमिंग पूलमधून बाहेर आली आहे. पाण्यातून नुकतीच बाहेर आल्यामुळे महिलेचे सगळे अंग भिजले आहे. अंग भिजल्यामुळे तिला काय करावे हे समजत नाहीये. ती अंगातील शर्ट काढून टाकत आहे. मात्र, यादरम्यान तिच्या मागून एक माणूस आला आहे. त्याने तू चुकीच्या पद्धतीने शर्ट काढत आहेस, असे सांगितले आहे.

माणसाने स्वीमिंग पूलमध्ये उडी घेऊन शर्ट काढला

तसेच पुढे त्याने स्वीमिंग पूलमध्ये उडी घेऊन स्वत:चे कपडे भिजवले आहेत. नंतर पुलामध्ये राहून त्याने अगदीच सहजपणे अंगातील शर्ट काढून फेकले आहे. त्याची ही ट्रिक पाहून महिला हरखून गेली आहे. तिनेही स्वीमिंग पूलमध्ये उडी घेत अंगातील टी-शर्ट काढून फेकला आहे.

पाहा व्हिडीओ :

व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

नेटकऱ्यांना ही ट्रिक चांगलीच आवडली आहे. लोक या व्हिडीओला वेगवेगळ्या समाजमाध्यमांवर शेअर करत आहेत. तसेच वेगवेगळ्या प्रतिक्रियासुद्धा देत आहेत. हा व्हिडीओ नेमका कुठला आहे, याची माहिती मिळालेली नाही, मात्र, त्याला JABiR KHAn SiNGAriYA या अकाऊंटवर शेअर करण्यात आले आहे.

इतर बातम्या :

Video | क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नर बनला रजिनकांत, केला ऐश्वर्या रायसोबत धमाकेदार डान्स

Video | चिमुकली राधा कृष्णावर रुसली, मजेदार डान्स सोशल मीडियावर व्हायरल

IAS अधिकाऱ्यावर भाज्या विकण्याची वेळ, सगळं सोडून रस्त्यावर बसला, ‘त्या’ एका फोटोमुळे चर्चांना उधाण

(man teaching women how to remove wet shirt video went viral on social media)


Non Stop LIVE Update

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI