Video | चिमुकली राधा कृष्णावर रुसली, मजेदार डान्स सोशल मीडियावर व्हायरल

या व्हिडीओमध्ये एक छोटी मुलगी राधेसारखी नटली आहे. हलकासा मेकअप करुन ही छोटी मुलगी घरात मस्तपैकी नाचत आहे. राधा कैसै ना जले या गीतावर व्हिडीओतील मुलगी ठुमके मारत आहे.

Video | चिमुकली राधा कृष्णावर रुसली, मजेदार डान्स सोशल मीडियावर व्हायरल
SMALL GIRL DANCING ON RADHA SONG

मुंबई : भगवान कृष्णाचं सगळ्यांनाच आकर्षण आहे. कृष्णाने काढलेल्या खोड्या, त्याचे राधेवरचे निस्सीम प्रेम यामुळे अनेक लोक कृष्णवडे आहेत. याच कारणामुळे संपूर्ण देशभरात श्रीकृष्ण जन्माष्टमी मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. या पार्श्वभूमीवर एका चिमुकलीच्या डान्सचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. लोक हा व्हिडीओ पाहून चांगलेच खूश झाले आहेत. (small cute girl dancing like radha song on occasion of janmashtami video went viral on social media)

छोटी मुलगी राधेसारखी नटली

व्हायरल होत असलेला व्हिडीओ हा अतिशय मजेदार आहे. या व्हिडीओमध्ये एक छोटी मुलगी राधेसारखी नटली आहे. हलकासा मेकअप करुन ही छोटी मुलगी घरात मस्तपैकी नाचत आहे. राधा कैसै ना जले या गीतावर व्हिडीओतील मुलगी ठुमके मारत आहे.

चिमुकलीच्या व्हिडीओला हजारो लाईक्स

व्हिडीओतील मुलीचा डान्स पाहून नेटकरी भारावले आहेत. ही छोटी मुलगी मनमोहक हावभाव करुन सुंदर डान्स करत आहे. तिचा हा डान्स पाहून नेटकऱ्यांनी वेगेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. काही नेटकऱ्यांनी व्हिडीओतील राधा खूपच गोड आहे असं म्हटलंय. तर काही नेटकऱ्यांनी गोड मुलीच्या डान्सची प्रशंसा केली आहे. व्हिडीओतील मुलगी आमिर खानच्या लगान चित्रपटातील गीतावर थिरकल्यामुळे तिच्या व्हिडीओला हजारो लोकांनी लाईक केले आहे.

पाहा व्हिडीओ :

 

View this post on Instagram

 

A post shared by Tania & Sony (@tania_and_sony)

व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल, लोकांच्या उत्स्फूर्तपणे प्रतिक्रिया

व्हायरल होत असलेला व्हिडीओ नेमका कुठला आहे, याची माहिती मिळू शकलेली नाही. मात्र, या व्हिडीओला tania_and_sony या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर करण्यात आले आहे. लोक हा व्हिडीओ उत्स्फूर्तपणे शेअर करत आहेत.

इतर बातम्या :

IAS अधिकाऱ्यावर भाज्या विकण्याची वेळ, सगळं सोडून रस्त्यावर बसला, ‘त्या’ एका फोटोमुळे चर्चांना उधाण

Video | उंच डोंगरावर कुत्र्याची मस्ती, एका चुकीमुळे मालकाला फुटला घाम, नेमकं काय घडलं ?

Video | नावाला चिंपाझी पण काम माणसाचं, हवेत उडवतायत चक्क ड्रोन, व्हिडीओ व्हायरल !

(small cute girl dancing like radha song on occasion of janmashtami video went viral on social media)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI