AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

काहीही…! चक्क वॉशिंग मशीनमध्ये बनवलं तूप; video तर पहाच

​Washing Machine me Banaya Ghee Video: सोशल मीडियावर नेहमीच टाइम सेव्हिंग हॅक अर्थात वेळ वाचवण्याच्या काही ना क्लुप्तीचे व्हिडीओ व्हायरल होतात, त्यामध्ये लोकं विचित्र युक्त्या शोधून काढतात. असाच एक तूप बनवण्याचा एक अनोख व्हिडीओ समोर आला आहे, त्याला आत्तापर्यंत इंस्टाग्रामवर लाखो व्ह्यूज मिळाले आहेत.

काहीही...! चक्क वॉशिंग मशीनमध्ये बनवलं तूप; video तर पहाच
वॉशिंगमशीनचा जुगाडImage Credit source: Instagram
| Updated on: Mar 21, 2025 | 11:35 AM
Share

मार्केटमध्ये, बाजारात अशुद्ध तूप विकलं जात असल्याच्या अनेक बातम्या आपण ऐकत असतो. भेसळयुक्त तुपामुळे आरोग्याला त्रास होऊ शकतो, हे लक्षात ठेवून आणि भीतीपायी अनेक जण बाहेरचं तूप खरेदी करणं टाळतात. त्याऐवजी घरच्या घरीच चांगलं विरजण लावून, दह्याचं लोणी आणि नंतर तूप कढवणं याला अनेकांची पसंती असतं. घरच्या घरी कढवलेलं, कणीदार तूप तर सर्वांनांच आवडतं. पण या विरजलेल्या दह्याचं लोणी आणि नंतर त्याचं तूप कढवण्याच्या प्रक्रियेला बराच वेळ लागतो.

पण आता नेहमीच्या या कामाला फारसा वेळ न लागता आणि जास्त मेहनत करावी न लागता अवघ्या काही मिनिटांतच वॉशिंग मशीनच्या मदतीने घरच्या घरी तूप बनवता येईल, असं तुम्हाला कोणी सांगितलं तर तुमचा विश्वास बसेल का ?

चक्क वॉशिंग मशीनमध्ये बनवलं तूप

हो…. हे वाचून खरंतर तुम्हालाही हसू येईल,कदाचित तुम्ही डोक्यावरही हात मारून घ्याल, पण हेच खरं आहे. सोशल मीडियावर सध्या एका इसमाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे, त्याचीच सगळीकडे चर्चा आहे. इन्स्टाग्राम या सोशल नेटवर्किंग साईटवर शेअर केलेल्या या व्हिडीओत एका माणसाने लोण्याने भरलेला एक अख्खा ड्रम थेट वॉशिंग मशीनमध्ये उपडा केला आणि सगळं लोणी मशीन मध्ये काढलं. त्यानंतर तो त्याच मशीनमध्ये गरम, उकळतं पाणी टाकलं. त्यानंतर त्याने वॉशिंग मशीनचं झाकण काढलं आणि ते ऑन केलं. मशीन सुरू होताच पुढल्या काही सेकंदांमध्ये मशीनमध्ये थेट तूप तयार झालेलं दिसलं.

व्हिडीओला लाखो व्ह्यूज आणि लाईक्सही

वॉशिंग मशिनमध्ये तूप बनवण्याचे हे अजब गजब टेक्निक दाखवणारं हे रील @sanjay_dairyfarmer या हँडलवर पोस्ट करण्यात आलं आहे. विशेष म्हणजे या व्हिडीओला थेट 11.5 मिलियनपेक्षा व्ह्यूज मिळाले असून लाखो लोकांनी ते लाईक्सही केलेत.

गहू वाळवण्याचा व्हिडीओही व्हायरल

असाच आणखी एक व्हिडीओदेखील व्हायरल झाला होता. ही क्लिप पाहिल्यानंतर तुम्हाला नक्कीच हसू आले असेल. तुमच्यापैकी किती जणांनी आश्चर्याने डोक्यालाही हात लावला असेल. भारतातील लोकांना विनाकारण जुगाडू म्हटले जात नाही. सोशल मीडियावर दररोज असे विचित्र, वेळ वाचवणारे हॅक व्हिडिओ व्हायरल होतात. काही दिवसांपूर्वी असाच एक व्हिडिओ व्हायरल झाला होता, ज्यामध्ये एका व्यक्तीने वॉशिंग मशीनच्या ड्रायरमध्ये गहू वाळवले.

'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला
'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला.
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात.
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी.
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप.
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.