कसोटीच नाही तर टी-20 आणि वनडेतही इंग्लंडला धूळ चारली, सोशल मीडियावर मीम्सचा धुमाकुळ

भारताने इंग्लंडला कसोटीसोबतच टी-20 आणि वनडे मालिकेतही धुळ चारलीय.

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 22:48 PM, 29 Mar 2021
कसोटीच नाही तर टी-20 आणि वनडेतही इंग्लंडला धूळ चारली, सोशल मीडियावर मीम्सचा धुमाकुळ

मुंबई : भारताने इंग्लंडला कसोटीसोबतच टी-20 आणि वनडे मालिकेतही धुळ चारलीय. सॅम करनने आपल्या झुंजार नाबाद 95 धावांच्या खेळीने काही काळ भारताला विजयापासून दूर ठेवलं. मात्र, अखेरच्या 2 षटकांमध्ये हार्दिक पंड्या आणि टी नटराजनने सामन्याची दिशाच बदलत भारताला विजय मिळवून दिला. पुण्यात झालेल्या या सामन्यातील विजयासह भारताने (Team India) 7 धावांनी रोमांचक विजय मिळवला (Many Memes on Social Media after India defeat England in all three format of cricket).

यासह आता भारताने इंग्लंडला वन डे मालिकेत 2-1 ने धुळ चारलीय. इंग्लंडला (England) या भारत दौऱ्यात मोकळ्या हातीच परतावं लागलंय. त्यांना कसोटीतही 3-1 आणि टी-20 मध्ये 3-2 ने पराभव पत्करावा लागला. अशाप्रकारे भारताने (India) तिन्ही प्रकारात आपला दबदबा कायम ठेवला आहे. या विजयानंतर भारताच्या टीमचं कौतुक करत इंग्लंडच्या टीमची खिल्ली उडवणं सुरु झालंय. यासाठी सोशल मीडियावर अक्षरशः मीम्सचा पाऊस पडत आहे.

Many Memes on Social Media after India defeat England in all three format of cricket