15 दिवस हा, 15 दिवस तो.. 10 वेळा प्रियकरासोबत पळालेल्या विवाहीत महिलेची अजब ऑफर
रामपूर जिल्ह्यातील एका पंचायतीतून एक धक्कादायक घटना समोर आली आहे, जिथे एक विाहीत महिला तब्बल 10 वेला तिच्या प्रियकरासोबत पळून गेली होती. आता त्याच विवाहित महिलेने एक विचित्र मागणी केली आहे. तिला पती आणि प्रियकरासोबत 15-15 दिवस विभागून हवे आहेत.

प्रेमात असलेली व्यक्ती काहीही करू शकते. योग्य-अयोग्य, भलं -बुरं याचा विचार न करता आपल्याला जे पटतं, तेच करायचा प्रेमात पडलेल्या व्यक्तीचा विचार असतो. पण त्यामुळे इतरांना काही त्रास होत असेल तर ते त्यांच्या गावीही नसतं. उत्तर प्रदेशातील रामपूरमधून असंच एक विचित्र प्रकरण समोर आले आहे. तिथे एका परपुरुषाच्या प्रेमात पडलेल्या आणि 10 वेळा पळून गेलेल्या विवाहीत महिलेची गावात सध्या सगळीकडे चर्चा सुरू आहे. तिथे , त्याच महिलेने पंचायतीसमोर अशी विचित्र मागणी केली की ती ऐकून तिच्या पतीसह सर्वांनाच धक्का बसला. खरंतर, महिलेचे जवळच्या गावातील एका तरुणाशी प्रेमसंबंध आहेत. ही विवाहीत महिला एका वर्षात तब्बल 10 वेळा तिच्या प्रियकरासोबत पळून गेली होती. मात्र वारंवार होणाऱ्या या घटनेमुळे, त्रासामुळे महिलेने गावातील पंचायत बोलावली आणि सर्वांसमोर एक अजब ऑफर ठेवली. या पंचायतमध्ये महिलेने सांगितलं की ती 15 दिवस तिच्या पतीसोबत तर 15 दिवस प्रियकरासोबत राहू इच्छिते. मात्र तिचं हे बोलणं ऐकून सगळेच चक्रावले.
हे संपूर्ण प्रकरण अझीमनगर पोलीस स्टेशन परिसरातील आणि रामपूरच्या तांडा पोलीस स्टेशन परिसरातील दोन गावांशी संबंधित आहे. अझीमनगर पोलीस स्टेशन परिसरातील एका तरूणींच लग्न सुमारे दीड वर्षांपूर्वी शेजारच्या गावात राहणाऱ्या एका तरुणाशी झालं होतं. लग्नाच्या काही दिवसांनंतर, विवाहित महिलेचं तांडा पोलीस स्टेशन परिसरात राहणाऱ्या एका तरुणावर प्रेम जडलं. एक वर्षापूर्वी ती महिला तिच्या प्रियकरासोबत पळून गेली. पंचायतीनंतर पतीने पत्नीला घरी परत नेले.
10 वेळा प्रियकरासोबत पळाली
मात्र यानंतर ती महिला एकाच वर्षात तब्बल 9 वेळा पळून गेली होती. मात्र शेवटच्या वेळी ती घरी परत आलीच नाही. अखेर आठवड्यापूर्वी तिच्या पतीने अझीमनगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. यादरम्यान, पतीने गुन्हा दाखल न करता पत्नीला तिच्या प्रियकराकडून परत आणण्याची मागणी केली होती. पोलिसांनी प्रकरणाचे गांभीर्य समजून पत्नीला परत आणलं आणि पतीच्या स्वाधीन केले. पण अवघी एक रात्र पतीच्या घरी घालवल्यावर ती महिला चक्क 10 व्यांदा तिथून फरार झाली.
पंचायतीसमोर ठेवला अजब प्रस्ताव
पत्नी पुन्हा घरातून बेपत्ता झाल्याचे कळताच पतीला धक्का बसला. यानंतर, पती आपल्या पत्नीच्या प्रियकराच्या घरी गेला तेव्हा त्याला त्याची पत्नी तिथे आढळली. पतीने आपल्या पत्नीला खूप समजावण्याचा प्रयत्न केला आणि तिला घरी परतण्यास सांगितले. त्यानंतर पंचायत बोलावण्यात आली . आणि तिथेच पत्नीने सर्वांसमोर अजब प्रस्ताव ठेवला. मी 15 दिवस पतीसोबत आणि 15 दिवस प्रियकरासोबत राहू इच्छिते असं तिने सर्वांना सांगितलं.
पती काय म्हणाला ?
मात्र तिचं हे बोलणं, तो प्रस्ताव ऐकताच पंचायतीत उपस्थित असलेले लोक हैराण झाले. पत्नीचा प्रस्ताव ऐकताच पती तर थेट हात जोडूनच उभा राहिला. तो म्हणाला, मला माफ कर, आता तू तुझ्या प्रियकरासोबतच रहा. यानंतर, पतीने त्याच्या पत्नीला तिच्या प्रियकराच्या घरी सोडलं आणि तो थेट त्याच्या आपल्या घरी परतला. ही घटना संपूर्ण परिसरात चर्चेचा विषय बनली आहे.
