13 वर्षाच्या चिमुरड्याचं कुकिंग स्किल पाहून नेटकरी हैराण, म्हणाले, हाच खरा मास्टरशेफ!

व्हिडिओच्या सुरुवातीला, ब्लॉगर विशाल दीपेशशी त्याचे घर, पालक, शाळा आणि अभ्यास याबद्दल बोलतो. विशेष म्हणजे दिपेश या सर्व प्रश्नांची उत्तरे देतो, पण डिश तयार करण्यापासून त्याचे लक्ष क्षणभरही हटत नाही.

13 वर्षाच्या चिमुरड्याचं कुकिंग स्किल पाहून नेटकरी हैराण, म्हणाले, हाच खरा मास्टरशेफ!
फरीदाबादचा 13 वर्षाचा कुकिंग करणारा चिमुरडा
Follow us
| Updated on: Nov 25, 2021 | 5:15 PM

सध्या सोशल मीडियावर एक 13 वर्षांचा मुलगा त्याच्या अनोख्या कुकिंग स्किलसाठी व्हायरल झाला आहे. दीपेश नावाचा हा मुलगा हरियाणातील फरिदाबादचा रहिवासी आहे. फूड ब्लॉगर विशालने हा व्हिडिओ त्याच्या यूट्यूब चॅनलवर शेअर केला आहे. ज्यावर जवळपास 5 मिलियन व्ह्यूज आले आहेत. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हीही म्हणाल की या मुलासमोर चांगले शेफही फेल आहेत. ( Masterchef Child cooking Video of 13 year old faridabad street vendor cooking skill goes viral)

व्हिडिओमध्ये, फूडी विशाल म्हणतो, “आम्ही बटाटे, स्प्रिंग रोल, मोमोज इत्यादी बनवणाऱ्या या 13 वर्षाच्या मास्टर शेफला भेटलो. दीपेश असं त्याचं नाव आहे. तो सकाळी शाळेत जातो. मग संध्याकाळच्या वेळी रस्त्यावर ठेला लावून त्यांच्या कुटुंबाला आर्थिक मदत करण्यात गुंततो.

चला तर मग आधी हा व्हिडिओ पाहूया.

ब्लॉगर विशालच्या व्हिडिओमध्ये तुम्ही दिपेश बटाटे आणि मिरचीची स्वादिष्ट डिश तयार करत असल्याचे पाहू शकता. व्हिडिओच्या सुरुवातीला, ब्लॉगर विशाल दीपेशशी त्याचे घर, पालक, शाळा आणि अभ्यास याबद्दल बोलतो. विशेष म्हणजे दिपेश या सर्व प्रश्नांची उत्तरे देतो, पण डिश तयार करण्यापासून त्याचे लक्ष क्षणभरही हटत नाही. दीपेश सांगतो की, तो रोज शाळेत जातो. यानंतर तो रोज संध्याकाळी आपला स्टॉल उघडतो आणि रात्री 9 वाजेपर्यंत थांबतो. जेवढं होईल तितकं पालकांना आर्थिक मदत करण्याचाही प्रयत्न करत असल्याचेही हा चिमुरडा सांगतो.

या व्हिडिओला नेटकऱ्यांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे. काही लोक दीपेशच्या प्रतिभेने पूर्णपणे प्रभावित झाले होते, तर काही युजर्सनी त्याला त्याच्या भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. एका यूजरने कमेंट करताना लिहिले की, ‘या 13 वर्षांच्या मुलाला माझा सलाम. ज्या वयात बहुसंख्य मुले खेळतात, त्या वयात हा आपल्या कुटुंबाला आर्थिक मदत करत आहे.

त्याचवेळी आणखी एका यूजरने कमेंट करत लिहिले की, ‘धन्य आहेत ते आई-वडील ज्यांच्या पोटी असा मुलगा जन्मला. अभ्यासासोबतच हा मुलगा घरच्या आर्थिक मदतीसाठी जे काही करत आहे ते कौतुकास्पद आहे.दुसऱ्या युजरचे म्हणणे आहे की, हा व्हिडीओ पाहून वय फक्त एक आकडा आहे हे समजतं. माणूस कामाने मोठा असतो वयाने नाही. एकंदरीत हा व्हिडिओ पाहिल्यानंतर सर्वजण दीपेशचे कौतुक करत आहेत.

हेही पाहा:

Video: कपडे वाळत घालताना आजीचा पाय सटकला, 19 व्या मजल्यावरुन थेट खाली, पण तितक्यात…पाहा धडकी भरवणारा व्हिडीओ!

Video: हाय हिल्स आणि स्कर्ट घालून तरुणीचा जबरदस्त बॅक फ्लिप, व्हिडीओ पाहून नेटकरी अवाक

 

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.