AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

माझी आई 82 व्या वर्षीही 20 पुश अप्स मारते, मिलिंद सोमणचं चाहत्यांना फिटनेस चॅलेंज

अभिनेता आणि सुपरमॉडेल मिलिंद सोमण इन्स्टाग्रामवर मोटिवेशनल पोस्ट लिहित फॉलोअर्सना हेल्दी राहण्यासाठी प्रेरित करत असतो. (Milind Soman mother Usha Soman)

माझी आई 82 व्या वर्षीही 20 पुश अप्स मारते, मिलिंद सोमणचं चाहत्यांना फिटनेस चॅलेंज
मिलिंद सोमण आणि मातोश्री उषा सोमण
| Updated on: Mar 24, 2021 | 12:57 PM
Share

मुंबई : 55 व्या वर्षीही फिट अँड फॅब्युलस राहणारा अभिनेता मिलिंद सोमण (Milind Soman) अनेकांचे प्रेरणास्थान आहे. सेल्फी घेण्यासाठी मिलिंद आपल्या चाहत्यांना पुश अप्स मारुन दाखवण्याचे चॅलेंज देतो. मिलिंदने आपल्या 82 वर्षीय मातोश्री उषा सोमण (Usha Soman) 20 जोर-बैठका काढू शकतात, असं सांगून भल्याभल्यांना फिटनेस गोल दिला आहे. (Milind Soman says his mother Usha Soman can do 20 push ups at the age of 82 years)

अभिनेता आणि सुपरमॉडेल मिलिंद सोमण इन्स्टाग्रामवर मोटिवेशनल पोस्ट लिहित फॉलोअर्सना हेल्दी राहण्यासाठी प्रेरित करत असतो. मंगळवारीही मिलिंदने एक फोटो शेअर केला, ज्यामध्ये त्याचा चाहता पुशअप्स करत असताना दिसत आहे.

मुलांना 20, मुलींना 10 पुश अप्सचे चॅलेंज

फोटोसाठी विनंती करणाऱ्या चाहत्यांकडून पुश अप करुन घेतल्यानंतरच मी सेल्फी काढू देतो, असं मिलिंद सांगतो. मुलांकडून किमान 20, तर मुलींकडून किमान 10 पुश अप्स ही माझी अट आहे. गेल्या सहा वर्षांपासून मी हे पाळत आलोय. माझी आई वयाच्या 82 व्या वर्षीही दररोज 20 जोर-बैठका काढते, असं मिलिंदने सांगितलं.

…तरच तुम्हाला माफी

विमानतळ, हायवे किंवा रेस्टॉरंट कुठेही असलं तरी क्वचितच कोणी पुश अप्स काढण्यास नकार देतं. जे थोडेफार फॅन्स जोर बैठक मारण्यास नकार देतात, त्यांना मी एकच सल्ला देतो, की एखाद्या चांगल्या गोष्टीसाठी प्रयत्न करण्यास कधीही नकार देऊ नका. गर्भवती, गणवेशधारी व्यक्ती आणि महिन्याभरात शस्त्रक्रिया किंवा जखम झालेल्या व्यक्ती केवळ अपवाद आहेत, असं मिलिंदने स्पष्ट केलं.

पंतप्रधानांनाही अवाक करणारा फिटनेस

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी फिटनेस आणि आरोग्य यांना प्रोत्साहन देण्यासाठी “फिट इंडिया डायलॉग” (“Fit India Dialogue) हा उपक्रम सुरु केला आहे. याचा भाग म्हणून क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) आणि अभिनेता-मॉडेल मिलिंद सोमण (Milind Soman) यांच्यासह देशातील फिटनेस आयकॉन्सशी मोदींनी काही महिन्यांपूर्वी संवाद साधला होता. यावेळी मिलिंद सोमणचा फिटनेस पाहून अवाक झालेल्या पंतप्रधानांना ‘तू खरंच 55 वर्षांचा आहेस?’ असा प्रश्न विचारण्याचा मोह आवरता आला नव्हता.

संबंधित बातम्या :

तू खरंच 55 वर्षांचा आहेस? मिलिंद सोमणच्या फिटनेसने पंतप्रधान मोदीही अवाक

Photo : अंकिता आणि मिलिंद सोमणच्या नव्या फोटोची चर्चा, चक्क लिपलॉक करताना केला फोटो शेअर

(Milind Soman says his mother Usha Soman can do 20 push ups at the age of 82 years)

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.