AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mumbai Local : घरात नाही सुकत, म्हणून लोकलमध्ये घातले वाळत! मुंबईकरांच्या जुगाडला तोडच नाही

लोकल आणि धावपळ! या दोन गोष्टींचं एकमेकांमध्ये खूप चांगलं नातं आहे. धावपळ आहे म्हणून लोकल (Mumbai Local) आहे. लोकल आहे म्हणून धावपळ आहे.

Mumbai Local : घरात नाही सुकत, म्हणून लोकलमध्ये घातले वाळत! मुंबईकरांच्या जुगाडला तोडच नाही
Mumbai Local Viral VideoImage Credit source: Instagram
| Updated on: Jul 17, 2022 | 5:36 PM
Share

मुंबई: बाबा रे मुंबईकर (Mumbaikar) कधी काय करतील याचा नेम नसतो! मुंबईत खूप धावपळ असते लोकांची असं सगळेच म्हणतात. इथे राहणार माणूस ते रोज अनुभवतो. मुंबईमध्ये उन्हाळा पावसाळा हिवाळा सगळेच ऋतू जबरदस्त असतात. पावसाळ्यात खूप पाऊस, उन्हाळ्यात जीवाचे पार हाल होतील इतकं ऊन आणि हिवाळा म्हणजे थंडीच थंडी! पावसाळ्यात तर सूर्याचं दर्शन होत नाही 4-4 दिवस मुंबईकरांना. ऋतू कोणताही असू, काही गोष्टी मुंबईकरांसाठी कधीच बदलत नाही. लोकल आणि धावपळ! या दोन गोष्टींचं एकमेकांमध्ये खूप चांगलं नातं आहे. धावपळ आहे म्हणून लोकल (Mumbai Local) आहे. लोकल आहे म्हणून धावपळ आहे. पण मुंबईकर गोष्टीसोबत ओक्के आहेत. ते आपल्या धावपळीत सुद्धा आपलं सगळं काम लोकल मध्ये करून घेतात. लोकल मध्ये भाजी कापतात, भाजी निवडतात, मेकअप करतात, जेवण करतात, झोपतात… बापरे अशा असंख्य गोष्टी आहेत. बाहेरच्या माणसाला नवल वाटेल कसं म्हणजे , कसं जमतं? असं लोकं म्हणतात…असाच एक व्हिडीओ व्हायरल (Video Viral) होतोय ज्याला बघून लोकं म्हणतायत बापरे…कसं? कसं जमतं?

चलती का नाम जिंदगी…

व्हिडीओ आहे मुंबईतल्या भर पावसाळ्यातला! खूप दिवस ऊन नाही आणि मुळात म्हणजे माणसाला वेळ नाही. करणार काय? ओले कपडे वाळणार कसे? अब देखो भय्या जिंदगी तो रुकेगी नहीं, मग त्या मुंबईकराने आयडिया केली. त्याने ते ओले कपडे लोकल मध्ये वाळत घातले. झाला व्हिडीओ व्हायरल! हा व्हिडीओ पाहून तुम्हाला हसू आवरणार नाही. ‘हे फक्त आपल्या मुंबईत घडू शकते, असे भन्नाट कॅप्शन देत शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये मुंबई लोकलचा एक डब्बा दिसतोय. या डब्यात कुणीतरी चक्क शाल, चादर आणि टॉवेल सुकत घातलेले दिसत आहे.

कितने तेजस्वी लोग है!

मुंबईसह राज्यभरात गेल्या काही दिवसांपासून पावसाने धुमाकूळ घातला आहे. कितीही पाऊस असला तरी कामानिमित्त लोकांना घराबाहेर पडावे लागते. पावसाळ्यात दैनंदिन जीवनातील सर्वात मोठी समस्या म्हणजे कपडे लवकर न सुकणे. प्रत्येकालाच या समस्येचा सामना करावा लागतो, परंतु एका मुंबईकराने या समस्येवरही मात करत जबरदस्त जुगाड शोधून काढला आहे. ‘दादर मुंबईकर या इन्स्टाग्राम पेजवरील एक व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल झाला आहे. व्हिडीओवर नेटिझन्सनीदेखील भन्नाट प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने कमेंट केली आहे, ‘आता फक्त हेच बघायचं राहिलं होतं’ तर दुसऱ्या युजरने कितने तेजस्वी लोग है. असे म्हटलेय.

नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामावर साधू महंतांची नाराजी
नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामावर साधू महंतांची नाराजी.
मुंबईला नवा महापौर कधी मिळणार? तारखेबाबत मोठी अपडेट
मुंबईला नवा महापौर कधी मिळणार? तारखेबाबत मोठी अपडेट.
शेतकरी संकटात, बदलत्या हवामानामुळे रब्बी हंगामातील पिके धोक्यात
शेतकरी संकटात, बदलत्या हवामानामुळे रब्बी हंगामातील पिके धोक्यात.
परप्रांतीयांना मुभा, मराठी माणसावर कारवाई... डोंबिवलीत मनसे आक्रमक
परप्रांतीयांना मुभा, मराठी माणसावर कारवाई... डोंबिवलीत मनसे आक्रमक.
मेलो तरी बेहत्तर, दोन व्यापाऱ्यांचा गुलाम बनून जगणार नाही
मेलो तरी बेहत्तर, दोन व्यापाऱ्यांचा गुलाम बनून जगणार नाही.
ते तर 12 जणांची प्रेयसी; भाजपने राऊतांना डिवचलं
ते तर 12 जणांची प्रेयसी; भाजपने राऊतांना डिवचलं.
शिवसेना- भाजपची गट स्थापना घटस्थापनेपर्यंत जाऊ शकते
शिवसेना- भाजपची गट स्थापना घटस्थापनेपर्यंत जाऊ शकते.
मंत्री छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर राजकारण तापलं
मंत्री छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर राजकारण तापलं.
शिंदेंना राज ठाकरेंचा लवचिक पाठिंबा, राजकीय वर्तुळात चर्चा
शिंदेंना राज ठाकरेंचा लवचिक पाठिंबा, राजकीय वर्तुळात चर्चा.
अकोल्यात राजकीय समीकरणं बदलली भाजपविरोधात एकजूट, वंचितचं नवं पर्व सुरू
अकोल्यात राजकीय समीकरणं बदलली भाजपविरोधात एकजूट, वंचितचं नवं पर्व सुरू.