तेरे लिये चांद तारे तोड लाऊंगा ! नासामधून चंद्रावरचा दगड चोरला, बेडखाली ठेऊन गर्लफ्रेंडशी रोमान्स
नासाच्या एका इंटर्नने २१ दशलक्ष डॉलर्सचा लूनर रॉक म्हणजेच चंद्रावरचा दगड चोरला. पण त्याने असं का केलं? चोरी करण्यासाठी त्याने काय योजना आखली होती ?

तुझ्यासाठी चंद्र-तारे तोडून आणेन… प्रियकर आपल्या प्रेयसीला असं आश्वासन देताना आपण अनेकदा पाहिलं असेल. पण एका इसमाने हे वाक्य खरं करून दाखवलं. त्याने त्याच्या प्रेयसाठीसाठी चक्क लूनर रॉक म्हणजेच चंद्रावरचा दगड चोरून आणला, तोही NASAच्या लॅबमध्ये घुसून. विशेष म्हणजे त्याने चोरलेल्या या लूनर रॉकची किंमत 21 लाख डॉलर इतकी होती.
नासातून चंद्राचा दगड चोरणाऱ्या माणसाचे नाव रॉबर्ट थॅड होते. एलए टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत रॉबर्टने सांगितले की, तो नासामध्ये काम करणाऱ्या टिफनीवर प्रेम करत होता. रॉबर्ट, तिच्याखूप प्रेमात होता, त्याला त्याच्या प्रेयसीसोबतचे नाते अधिक रोमँटिक बनवण्याची कल्पना सुचली आणि ती होती चंद्रावरील प्रणय. यासाठी त्याने एक योजना आखली.
प्रेमासाठी चोरला लूनर रॉक
रॉबर्टने नासाच्या प्रयोगशाळेत ठेवलेला चंद्राचा एक खडक चोरला. त्याने त्याची मैत्रीण टिफनी फाउलरलाही याबद्दल सांगितले. दोघांनी मिळून चंद्राचा तुकडा चोरण्याची योजना आखली.
बेडखाली चंद्रावरचा दगड ठेऊन केला प्रणय
अखेर चंद्रावरचा तो खडक चोरल्यानंतर, रॉबर्टने तो घरी आणला. त्याने चंद्रावरून आणलेला दगड त्याच्या बेडमध्ये लपवून ठेवला. नंतर त्याच बेडवर त्याने फाउलरसोबत प्रणय केला. रॉबर्ट म्हणतो की यापेक्षा चांगले काहीही असू शकत नव्हते. कारण तो चंद्रावर रोमान्स करण्यासारखाच अनुभव होता असंही त्याने सांगितलं.
कसा चोरला लाखोंचा दगड ?
Peopleच्या एका अहवालानुसार, माजी नासा इंटर्न Thad Roberts आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी चंद्रावरचा खडक चोरण्यासाठी सुरक्षा कॅमेरे पुन्हा डिझाइन केले. त्यांनी निओप्रीन बॉडीसूट घातले आणि प्रयोगशाळेत प्रवेश मिळवण्यासाठी अधिकृत बॅज देखील बनवले. या सर्व गोष्टींच्या मदतीने रॉबर्ट, फाउलर आणि त्यांच्या एका मित्राला 17 पौंड वजनाचा चंद्राचा दगड चोरण्यात यश आले. ही घटना 2002 सालची आहे. रॉबर्टची मैत्रीण फाउलर स्वतः अंतराळ संस्थेत काम करायची.
मात्र FBIने या प्रकरणाला आर्थिक गुन्हा म्हटले आहे. हे संपूर्ण काम पैशासाठी केले गेले होते, असं एजन्सीने सांगितलं. कारण त्यानंतर ते (रॉबर्ट आणि त्याची मैत्रीण) बेल्जियममधील एका खरेदीदाराच्या संपर्कात होते जो दगडांसाठी सुमारे 1000 ते 5000 डॉलर्स देण्यास तयार होता.
एफबीआयच्या सांगण्यानुसार, मात्र त्या खरेदीदाराला त्या लूरन रॉकच्या सोर्सबद्दल स्रोताबद्दल संशय येताच त्याने एजन्सीला माहिती दिली. त्यानंतर एफबीआयने रॉबर्ट आणि त्याच्या साथीदारांना पकडण्यासाठी गुप्त कारवाई केली. अखेर रॉबर्टने आपला गुन्हा कबूल केला. या चोरीसाठी, गुन्ह्यासाठी त्याल 8 वर्षांची शिक्षा झाली, मात्र नंतर त्याल 2 वर्षं आधीच 2008 सालीच सोडून देण्यात आलं. तर फाऊल हिला 150 तासांच्या सामुदायिक सेवेची आणि 9 हजार डॉलर्सच्या दंडाची शिक्षा सुनावण्यात आली.
