मुलं देवा घरची फुलं |आईचं स्वप्नपूर्ण करण्यासाठी 2 मुलांनी खांद्यावरुन तिला डोंगरावर नेलं, पण आईची ती इच्छा पूर्ण केली
कोट्टायम जिल्ह्यातील मुतुचिरा येथील 87 वर्षीय अलिकुट्टी पॉल यांनी त्यांच्या एका मुलाला सांगितले की तिला शेजारच्या इडुक्की जिल्ह्यात फुललेले दुर्मिळ फुले पाहायचे आहे.

कोट्टायमः सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल (Video Viral) झाला आहे. त्या हृदयस्पर्शी आणि भावनिक अशा व्हिडीओमध्ये दोन व्यक्ती आपल्या वृद्ध आईला आपल्या खांद्यावर बसवून. त्यांनी आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी उंच डोंगरावर घेऊन चढले आहेत. पश्चिम घाटातील एक दुर्मिळ फूल नीलाकुरिंजीचे फूल (Neelakurinji flower) पाहण्यासाठी ते आपल्या आईला त्या उंच टेकडीवर घेऊन गेले होते. असं सांगितले जाते की, हे फूल 12 वर्षांतून एकदाच उमलते, त्यामुळेच ते आपल्या आईला त्या डोंगरावर घेऊन गेले आहेत.
कोट्टायम जिल्ह्यातील मुतुचिरा येथील 87 वर्षीय अलिकुट्टी पॉल यांनी त्यांच्या एका मुलाला सांगितले की तिला शेजारच्या इडुक्की जिल्ह्यात फुललेले दुर्मिळ फुले पाहायचे आहे.
त्यातच त्या अलीकुट्टी पॉल वयोवृ्द्ध झाल्याने आणि आजाराने त्रस्त असल्याने त्या उंच पायऱ्या आणि टेकडी चढू शकत नव्हत्या.
आपली आई अलीकुट्टी पॉल ही वयोवृद्ध झाल्यामुळे चालू शकत नाही म्हणून त्यांचा मुलगा रोजन आणि सत्यन यांनी परिस्थितीला न डगमगता त्यांनी निर्णय घेतला.
त्यांनी आपल्या आईला जीपमध्ये बसवले आणि सुमारे 100 किलोमीचरचा प्रवास करून मुन्नारजवळील कालीपारा टेकडीवर पोहोचले.
त्या ठिकाणी गेल्यावर मात्र त्यांना समजले की, डोंगरावर जाण्यासाठी चांगला रस्ता आणि सरळ रस्ता नाही. त्यामुळे त्यांनी आपल्या आईचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी या दोन्ही मुलांनी आपल्या वृद्ध आईला खांद्यावर बसवून त्यांनी 1.5 किमी डोंगरावर घेऊन गेले.
जे नीलाकुरिंजीच्या जांभळ्या रंगाच्या त्या फुलामुळं सगळं शेत सुंदरमय झाले होते. नीलाकुरिंजी (स्ट्रोबिलांथेस कुंथियाना) हे पश्चिम घाटात आढळणारे दुर्मिळ फूल असले तरी ते एका विशिष्ट प्रदेशात आढळते मात्र ते बारा वर्षातून एकदाच फुलते.
इडुक्की जिल्ह्यातील मुन्नार हिल स्टेशन नीलाकुरिंजीसाठी प्रसिद्ध ठिकाण आहे. मुन्नारमध्ये नीलाकुरिन्जीचा पुढचा बहर २०३० मध्येच येणार आहे.
परंतु या दुर्मिळ घटनेचे साक्षीदार होण्यासाठी तुम्हाला 2030 पर्यंत थांबायचे नसेल, तर काळजी करू नका. 2018 पासून, नीलाकुरिन्जी तामिळनाडूमधील कोडाईकनाल, कर्नाटकातील कोडागू आणि केरळमधील पूपारा येथे फुलत आहेत.
यंदा कर्नाटकातील चिकमंगळूर आणि केरळमधील कालीपारा येथे नीलाकुरिंजी फुलले आहेत. इडुक्की जिल्ह्यातील मुन्नारजवळील कल्लीपारा हे गाव नीलाकुरिंजी जो पर्यंत फुलले नव्हते तेव्हापर्यंत हे गाव पर्यटनाच्या कोणाच्या नकाशावरही नव्हते.
