कुल्फी ले लो कुल्फी, शपथविधीपूर्वीच ट्रम्प तात्यांचा पाकिस्तानात हा बिझनेस कोणता? बघ्यांची एकच झुंबड, सेल्फीसाठी चाहत्यांची तोबा गर्दी
American New President Donald Trump at Pakistan : तिकडं दूर अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प हे 20 जानेवारी रोजी राष्ट्राध्यक्ष पदाची शपथ घेणार आहेत. पण त्यापूर्वी पाकिस्तानात त्यांची चर्चा रंगली आहे. त्यांच्यासोबत सेल्फी घेण्यासाठी भाऊगर्दी उसळली आहे.

डोनाल्ड ट्रम्प हे अमेरिकेचे नवीन राष्ट्राध्यक्ष म्हणून 20 जानेवारी 2025 रोजी शपथ घेतील. सोमवारी 10:30 वाजता बंदिस्त समारंभ ठिकाणी शपथविधी होईल. या सोहळ्यापूर्वी पाकिस्तानात ट्रम्प आल्याचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. ऐन शपथविधीपूर्वी ट्रम्प पाकिस्तानातील एका हातगाडीवर दिसल्याने एकच खळबळ उडाली. विशेष म्हणजे ते कुल्फी विक्री करत असल्याने आणि अस्खलित पंजाबीत संवाद साधत असल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या. त्यापुढे जाऊन कुल्फी लेलो म्हणून जेव्हा त्यांनी सूर लावला तेव्हा मात्र अनेकांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली.
डोनाल्ड ट्रम्प अत्यंत लहरी




डोनाल्ड ट्रम्प हे दुसऱ्यांदा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष होत आहेत. अत्यंत सनकी आणि हडेलहप्पी अशी त्यांची जणू ओळख आहे. ते केव्हा काय निर्णय घेतील हे सांगताच येत नाही. त्यांच्या या लहरी स्वभावाचे जितके चाहते आहे, त्यापेक्षा अधिक विरोधक आहेत. तरुणाईला ते आवडतात. बिनधास्त आणि धडक बोलणाऱ्या आणि तसंच वागणाऱ्या नेत्याची अमेरिकेला गरज होती असे काहीसा सूर अमेरिकेत आहे. पण ते थेट पाकिस्तानात शपथविधी अगोदर काय करतायेत असा अनेकांना प्रश्न पडला आहे.
Donald Trump’s lookalike spotted selling Kulfi in Pakistan in a melodious way pic.twitter.com/rMSvYYhILb
— Historic Vids (@historyinmemes) January 1, 2024
मग पाकिस्तानातील ट्रम्प आहे तरी कोण?
तर हे पाकिस्तानातील ट्रम्प आहे तरी कोण? असा सवाल अनेकांना पडला आहे. पाकिस्तानमधील पंजाब राज्याच्या साहिवाल या जिल्ह्याच्या ठिकाणी ते रोजच अनेकांच्या नजरेस पडतात. तर पाकिस्तानात डोनाल्ड ट्रम्प सारखे दिसणारे हे सलीम बग्गा आहेत. ते हुबेहुब डोनाल्ड ट्रम्प सारखे दिसतात. इतकेच काय त्यांची चालण्याची आणि बोलण्याची लकब पण सेम टू सेम ट्रम्पसारखीच आहे. त्यांना सर्वजण पाकिस्तानचे डोनाल्ड ट्रम्प म्हणूनच हाक मारतात. अर्थात त्यावर ते पण ट्रम्पसारख्या भुवया उंचावून अभिवादन करतात.
कुल्फी विक्रीचा व्यवसाय
तर सलीम बग्गा हे पाकिस्तानमधील साहिवालमध्ये कुल्फी आणि खीर विक्रीचा व्यवसाय करतात, एका ठेल्यावर, हातगाडीवर त्यांचा हा व्यवसाय चालतो. दिवसभर कमाईतून त्यांचा आणि कुटुंबाचा उदरनिर्वाह होतो. ते हुबेहुब ट्रम्प सारखे दिसत असल्याने केवळ त्यांना भेटण्यासाठी अनेक जण येतात. त्यांच्यासोबत सेल्फी काढतात. त्यातून इतर फायदा होवो ना होवो पण त्यांचा व्यवसाय वाढला हे नक्की.