कपलला ‘नवाबी शौक’ भोवला, वाघाच्या बछड्यासोबत फोटोशूट केल्यामुळे टीका

नुकतंच लग्न झालेल्या एका जोडप्याने चक्क वाघाच्या बछड्यासोबत फोटोशूट केलं आहे. (pakistani couple viral photoshoot tiger cub)

कपलला 'नवाबी शौक' भोवला, वाघाच्या बछड्यासोबत फोटोशूट केल्यामुळे टीका
पाकिस्तानी कपलने अशा प्रकारे वाघाच्या बछड्यासोबत फोटोशूट केलं,
prajwal dhage

|

Mar 11, 2021 | 8:00 PM

इस्लामाबाद : कोणत्या माणसाला कशीची हौस असेल याचा काही नेम नसतो. कधी कोणी आपल्या लग्नात हेलीकॉप्टरवरुन एन्ट्री मारतो. तर कधी कोणी आपल्या नव्या नवरीला बुलेटवरुन फिरवतो. कधी कोणी सोन्याचे दागीने परिधान करुन गोल्डमॅन असल्याची बिरुदावली घेऊन मिरवतो. तर कोणी कोणाला वेगवेगळे फोटोशूट करण्याची हौस असते. आजकाल वेडींग फोटोशूट, प्रिवेडिंग फोटोशूट, आफ्टर वेडींग फोटोशूट अशा वेगवेगळ्या फोटो सेशनचे फॅड आले आहे. सध्या अशाच एका आगळ्या वेगळ्या फोटशूची चर्चा होत आहे. नुकतंच लग्न झालेल्या एका जोडप्याने चक्क वाघाच्या बछड्यासोबत फोटोशूट केलं आहे. (pakistani newly wed couple photoshoot with tiger cub has been gone viral)

काही जणांकडून प्रशंसा तर काहींकडून टीका 

वाघाच्या बछड्यासोबत फोटोशूट करणारे हे जोडपे मूळचे पाकिस्तानमधील पंजाब प्रांतातील आहे. या जोडप्याने चक्क वाघाच्या बछड्याला घेऊन फोटोशूट केलं. बछड्याला घेऊन वेगवेळ्या पोजमध्ये फोटो काढल्यामुळे हे कपल चांगलंच चर्चेत आलं. हे फोटो सोशल मीडियावर टाकल्यामुळे तर त्यांच्या या फोटोशूटची चांगलीच चर्चा झाली. काहींनी त्यांच्या या कल्पक बुद्धीची वाहवा केली. तर आपली हौस भागवण्यासाठी एका जंगली प्राण्याला वेठीस धरल्यामुळे काहींनी त्यांच्यावर जोरदार टीका केली.

वाघाच्या बछड्याला रेस्क्यू करण्याची मागणी

मिळालेल्या माहितीनुसार ‘sardarqasimkhanbhurgrii’ या इन्स्टाग्राम अकाऊंटवर वाघाच्या बछड्यासोबतचे हे फोटो शेअर केले गेले. त्यानंतर हे फोटो अल्पावधितच व्हायरल झालेयत. शोशल मीडियाच्या वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर हे फोटो जोमात शेअर केले जात आहेत. काहींनी त्यांच्या फोटोंना भरभरुन लाईक्स दिल्या आहेत. जंगली प्राण्यांचा उपयोग व्यावसायिक कामास करण्यास पाकिस्तानमध्ये बंदी असल्यामुळे काहींनी या कपलवर कडक कारवाई करुन वाघाच्या बछड्याला रेस्क्यू करण्यात यावे अशी मागणी केली आहे.

दरम्यान, या फोटोशूटविषयी वेगवेगळे मतप्रवाह असले तरी, हा विषय सध्या चर्चेचा विषय बनला आहे.

इतर बातम्या :

VIDEO | हिंदी गाण्यावर लावणीचा ठसका, पाहा चिमुकल्या किंजलचा भन्नाट डान्स व्हिडीओ

VIDEO : गाणं गाताना मुलींविषयी अश्लील टिप्पणी, लोक भडकले, अर्ध मुंडन करुन गावात धींड, व्हिडीओ व्हायरल

Video: कैलास पर्वतावर निवास, त्याचीच सुरक्षा खास, ITBP जवानाकडून पहाडी आवाजात भोळ्या शंकराची आराधना

(pakistani newly wed couple photoshoot with tiger cub has been gone viral)

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें