AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Comedy video viral : दुकानदाराला फसवण्याचा Plan fail! चलाख दुकानदार असं काही करतो, की…

Shopkeeper customer video : शॉपिंगसाठी (Shopping) आपण अनेकवेळा दुकानात जातो. कधीकधी ग्राहक दुकानदाराला फसवतो तर कधी दुकानदार ग्राहकाला... असाच एक व्हिडिओ (Video) व्हायरल (Viral) होत आहे.

Comedy video viral : दुकानदाराला फसवण्याचा Plan fail! चलाख दुकानदार असं काही करतो, की...
फसवणाऱ्या ग्राहकांना चलाख दुकानदार युक्तीने आणतो ताळ्यावरImage Credit source: Youtube
| Updated on: Mar 11, 2022 | 8:30 AM
Share

Shopkeeper customer video : शॉपिंगसाठी (Shopping) आपण अनेकवेळा दुकानात जातो. पण कधीकधी आपल्या मनासारखे आपल्याला मिळत नाही. कधीकधी आपण शॉपिंग तर करतो, पण आपण फसले गेलो आहोत, असे आपल्याला घरी आल्यावर लक्षात येते. पण तोवर वेळ निघून गेलेली असते. म्हणजे दुकानदाराने त्याच्या फायद्यासाठी ग्राहकाला फसवलेले असते. पण कधीकधी ग्राहकही दुकानदाराला फसवतो. आता दुकानदार व्यावसायिक असतो शेवटी. जरी एखाद्या ग्राहकाने शेंडी लावण्याचा प्रयत्न केला तरी तेदेखील काही कमी नसतात. ते अशा खोडकर ग्राहकांना बरोबर ताळ्यावर आणतात. असाच एक व्हिडिओ (Video) व्हायरल (Viral) होत आहे. यामध्ये ग्राहक खरेदी तर करतात पण पैसे नाहीत, असे म्हणून दुकानदाराला शेंडी लावण्याचा प्रयत्न करतात. पण दुकानदारही हुशार असतो, तोही अशी काही युक्ती करतो, की शेवटी ते ग्राहक नमते घेतात. दुकानदार आणि ग्राहक यांच्यातला विनोदी व्हिडिओ चांगलाच व्हायरल झालाय.

दुकानदाराला शेंडी लावण्याचा प्रयत्न

व्हिडिओमध्ये आपल्याला एक दुकानदार आणि दोन ग्राहक दिसतात. ते एका कपड्याच्या दुकानात गेलेले असतात. तिथे दुकानदाराला चांगल्या क्वालिटीचे कपडे ते मागतात. मग दुकानदार त्यांना तसेच कपडे दाखवतो. त्याचे बिल होते 2500 रुपये. मग ते म्हणतात, आम्ही पैसे घरी विसरलो. उद्या दिले तर चालतील का? आम्हाला एका लग्नाला जायचे आहे. मग दुकानदार त्यांना म्हणतो, मी तुमच्यावर विश्वास ठेऊन तुम्हाला कपडे देत आहे. पण तरी दुकानदाराला त्यांच्यावर विश्वास नसतो. तो अशी काही युक्ती करतो, की अवखळ ग्राहकांचा गेम होतो. त्यासाठी हा मजेशीर व्हिडिओ पाहा…

यूट्यूबवर अपलोड

यूट्यूबवर सचिन चौहान टीबीसी (SachinChauhanTBC) या चॅनेलवर हा व्हिडिओ अपलोड करण्यात आला आहे. 9 मार्चला अपलोड केलेल्या या व्हिडिओला 951,102+ व्ह्यूज मिळाले आहेत. ‘Chalaak Dukaandaar‘ अशी कॅप्शन व्हिडिओला देण्यात आली आहे. यूझर्सनी या व्हिडिओवर हसणाऱ्या इमोजी पोस्ट केल्या आहेत. तसेच व्हिडिओ शेअरदेखील करत आहेत.

आणखी वाचा :

चिमुकल्यानं आईला ओळखलंच..; आतापर्यंतचा Cute video अजिबात miss करू नका

Viral : काय जबरदस्त साधलंय संतुलन! पुन्हा पुन्हा पाहावा असा Stunt video

Viral video : लग्नात सजावटीसाठी ठेवले होते कारंजे, बघा लोकांनी त्याचा उपयोग कसा करून घेतला…

दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी
दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी.
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?.
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट..
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष....
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?.
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्..
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्...
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त.
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज.
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली.
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार.