AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Dog rescue : …अन् जळत्या कारमधून बाहेर काढत पोलिसानं कुत्र्याचा ‘अशा’प्रकारे वाचवला जीव, Video Viral

Dog rescue video : सोशल मीडिया(Social Media)त कुत्र्याच्या बचावाचा व्हिडिओ व्हायरल (Viral) होत असतात. असाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये एका पोलीस (Police) कर्मचाऱ्याने जळत्या कारमधून एका कुत्र्याचा जीव वाचवला, तो इंटरनेटवर लोकांची मने जिंकत आहे.

Dog rescue : ...अन् जळत्या कारमधून बाहेर काढत पोलिसानं कुत्र्याचा 'अशा'प्रकारे वाचवला जीव, Video Viral
जळत्या कारमधून कुत्र्याला पोलिसानं वाचवलं (सौ. डग्लस काउंटी शेरीफ कार्यालय)
| Updated on: Feb 08, 2022 | 4:28 PM
Share

Dog rescue video : सोशल मीडिया(Social Media)त कुत्र्याच्या बचावाचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल (Viral) होत असतात. असाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये एका पोलीस (Police) कर्मचाऱ्याने जळत्या कारमधून एका कुत्र्याचा जीव वाचवला, तो इंटरनेटवर लोकांची मने जिंकत आहे. ही घटना 22 जानेवारीला अमेरिकेतील कोलोरॅडोमध्ये घडली होती, मात्र आता त्याचा व्हिडिओ समोर आला आहे. पोलीस कर्मचारी कुत्र्याचा जीव वाचवत असताना ही सर्व घटना कॅमेऱ्यामध्ये कैद झाली होती. आता हा व्हिडिओ पाहिल्यानंतर सोशल मीडिया यूझर्स या पोलिसाच्या शौर्याचे कौतुक करत आहेत. प्रत्येकजण त्याला खरा हिरो म्हणत आहेत. व्हिडिओमध्ये रस्त्याच्या कडेला एका कारला आग लागल्याचे दिसत आहे. त्याचवेळी त्याच्याभोवती काही लोक उभे असतात. गाडीच्या आत कोणीतरी अडकल्यासारखे दिसते. मग डग्लस काउंटीचे पोलीस अधिकारी मायकेल ग्रेगोरेक यांनी त्या माणसाकडे पाहिले, जो ओरडत होता की त्याचा कुत्रा जळत्या वाहनाच्या आत अडकला होता.

कुत्र्याला काढतात बाहेर

हा सगळा प्रकार पोलीस अधिकारी मायकेल यांना समजताच कोणताही उशीर न करता ते कारमधून बाहेर पडतात आणि जळत्या एसयूव्हीकडे धावतात. त्यानंतर ते कुत्र्याचा शोध घेऊ लागतात. मग कसे तरी ते कुत्र्याला बाहेर काढतात.

कुत्र्याचा मालक घाबरलेल्या अवस्थेत

कुत्र्याचा मालक किती घाबरलेला आहे हे तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता. तो आपल्या कुत्र्याला सुरक्षित पाहण्यासाठी उत्सुक आहे. त्याचवेळी पोलीस अधिकारी मायकेल ग्रेगोरेक कारच्या मागील भागातून कुत्र्याला बाहेर काढतात. यादरम्यान कुत्राही खूप घाबरलेला दिसतो. मात्र सुदैवाने त्याचा जीव वाचला आणि तो जिवंत जळण्यापासून बचावला. याआधी वाहन मालकाने आग विझवण्यासाठी अग्निशामक यंत्राचा वापर केला होता, त्यामुळे आग काही प्रमाणात विझली होती.

फेसबुक पेजवर फुटेज शेअर

22 जानेवारी रोजी घडलेल्या या घटनेचे फुटेज डग्लस काउंटी शेरीफ कार्यालयाने त्यांच्या अधिकृत फेसबुक पेजवर शेअर केले आहे. या व्हिडिओमुळे सोशल मीडियावर खळबळ उडाली आहे. हा व्हिडिओ आतापर्यंत 42 लाखांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे आणि हा आकडा वाढतच आहे.

Lion Video : …अन् सफारीदरम्यान अचानक जंगलाचा राजा आला समोर…

Funny Viral Video : चिमुरड्यानं घेतला मेंढराशी पंगा, मग बसला ‘असा’काही दणका…

…म्हणून काश्मीरला म्हणतात पृथ्वीवरचा स्वर्ग! सर्वात मोठा कॅफे ‘Snowglu’चे Photos होतायत Viral

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.