शहीद मेजरची पत्नी सैन्यात दाखल, लोक म्हणतायत आम्हाला नितीका कौल यांचा अभिमान, नेटकऱ्यांकडून शुभेच्छा

नितीका कौल या सैन्यात सामील झाल्या आहेत. वीरमरण आलेल्या पतीला हीच खरी श्रद्धांजली असल्याचे अनेक नेटकऱ्यांनी म्हटलंय. (martyr major dhoundiyal wife nitika kaul joins indian army)

शहीद मेजरची पत्नी सैन्यात दाखल, लोक म्हणतायत आम्हाला नितीका कौल यांचा अभिमान, नेटकऱ्यांकडून शुभेच्छा
NITIKA KAUL VIRAL
Follow us
| Updated on: May 31, 2021 | 6:11 PM

मुंबई : जम्मू-काश्मीरमधील पुलवामा हल्ल्यात शहीद झालेल्या मेजर विभूती शंकर धौंडियाल (vibhuti dhoundiyal) यांची पत्नी नितीका कौल (Nitika Kaul) या शनिवारी (29 मे) भारतीय सैन्यात सामील झाल्या. सैन्यात दाखल झाल्यानंतर आता त्या ‘लेफ्टनंट नितीका धौंडियाल’ म्हणून ओळखल्या जात आहेत. त्यांच्या या धाडसी निर्णयानंतर सोशल मीडियावर विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. वीरमरण आलेल्या पतीला हीच खरी श्रद्धांजली असल्याचे अनेक नेटकऱ्यांनी म्हटलंय. काहींनी तर नितीका कौल यांना आदराने सलाम ठोकलाय. (Pulwama attack Martyr major Dhoundiyal wife Nitika Kaul joins Indian Army netizens congratulating her)

पतीला वीरमरण आल्यानंतर जिद्दीने सैन्यात दाखल

जम्मू-काश्मीरमध्ये 2019 साली दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात एकूण 40 जवान शहीद झाले होते. यामध्ये विभूती शंकर धौंडियाल यांनासुद्धा वीरमरण आले होते. ही घटना घडल्यानंतर 2019 साली सोशल मीडियावर प्रचंड गदारोळ झाला होता. यावेळी धौंडियाल यांच्या पत्नी नितीका कौल यांचे फोटो व्हायरल झाले होते. त्यांना झालेले दु:ख पाहून अनेकांना अश्रू अनावर झाले होते. मात्र, आता याच नितीका कौल यांनी जिद्दीने शॉर्ट सर्व्हीस कमीशनची परीक्षा उत्तीर्ण केली आणि सैन्यात दाखल झाल्या.

नेटकऱ्यांकडून नितीका कौल यांना सलाम

नितीका कौल या शनिवारी सैन्यात दाखल झाल्यानंतर त्यांचे फोटो शोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. सैनिकी गणवेशातील त्यांचे फोटो पाहून अनेकजण भावूक झालेयत. अनेकांनी नितीका कौल यांना शुभेच्छा देऊन त्यांच्या या धाडसी निर्णयाचे स्वागत केले आहे. तसेच अनेक नेटकऱ्यांनी नितीका कौल सारख्या धाडसी महिला या देशात असल्याचा आम्हाला गर्व असल्याचे म्हटले आहे.

नेटकऱ्यांना नितीका यांचा अभिमान

दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार नितीका कौल यांनी शहीद झालेल्या आपल्या पतींची प्रेरण घेऊन सैन्यात दाखल होण्याचा निर्णय घेतला. त्यांनी एका मल्टीनॅशनल कंपनीमधील नोकरी सोडून सैन्यात दाखल होण्यासाठी आवश्यक प्रशिक्षण घेतले. त्यांच्या याच निर्णयाचे अनेक सोशल मीडिया यूजर्सने स्वागत केले. सोशल मीडियावर नितीका कौल यांच्यावर शुभेच्छांचा पाऊस पडतोय.

इतर बातम्या :

Video | पिळदार देह, बलदंड भुजा, सोशल मीडियावर अनोख्या कांगारूची चर्चा, व्हिडीओ पाहाच

Viral Video : भर रात्री रस्त्यावर विचित्र आकृती, लोक म्हणतायत हा तर एलियन, व्हिडीओ व्हायरल

जब जागे तब सबेरा! IPS अधिकाऱ्यानं चक्क ‘वजन’ घटवलं, लॉकडाऊनमधली प्रेरणादायी बातमी

(Pulwama attack Martyr major Dhoundiyal wife Nitika Kaul joins Indian Army netizens congratulating her)

Non Stop LIVE Update
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.