AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पुण्यातील सोन्याची ही पावती व्हायरल, कारण त्यावेळी सोन्याचे दर होते…

Gold Old Bill: १९५९ मधील किंमत आणि आजची सोन्याची किंमत पाहिल्यास त्यात ५० हजार पट वाढ झाली. त्यामुळे सोने खरेदी नेहमी फायदेशीर आहे. सोन्यातील गुंतवणूक चांगली असल्याचे जुने लोक म्हणत होते, ते सत्य आहे.

पुण्यातील सोन्याची ही पावती व्हायरल, कारण त्यावेळी सोन्याचे दर होते...
Gold bill
Jitendra Zavar
Jitendra Zavar | Updated on: Aug 06, 2024 | 2:14 PM
Share

Gold Old Bill: भारतीय लोकांना सोन्याची प्रचंड आवड आहे. घराघरात भारतीय महिलांकडे सोन्याचे अनेक दागिने आहेत. भारतीयांचे सोन्यासंदर्भात असलेले हे प्रेम पुरातनकाळापासून आहे. त्यामुळे जगात सर्वाधिक सोन्याची विक्री भारतात होते. आता सोन्याचे दर ७० हजार रुपये तोळ्यापलीकडे गेले आहेत. त्यानंतर सराफ बाजारात सोने खरेदीसाठी प्रचंड गर्दी असते. या पार्श्वभूमीवर १९६० च्या दशकातील सोन्याची एक पावती सोशल मीडियावर व्हायरल झाली. पुण्यातील सोने व्यापाऱ्याकडून ग्राहकाने ११.१६ ग्रॅम सोने घेतले होते. त्यासाठी केवळ ११३ रुपये मोजले होते. आजची परिस्थिती पहिल्यास तितके सोने घेण्यास ८० हजारांपेक्षा जास्त रक्कम लागणार आहे. यामुळे ही पावती व्हायरल झाली असून त्यावर अनेक कॉमेंट येत आहेत.

६५ वर्षांपूर्वीचे बिल व्हायरल

सोशल मीडियावर zindagi.gulzar.h या खात्यावरुन सोने खरेदीचे एक बिल व्हायरल झाले आहे. त्या बिलात ११.१६ ग्रॅम सोने ११३ रुपयांना होते. ही सोन्याची पावती पुणे येथील सराफाची आहे. वामन निंबाजी अष्टेकर यांच्या दुकानातून सोने खरेदी केले आहे. ३ मार्च १९५९ खरेदी केलेले हे सोने आणि चांदी ग्राहकाला १०९ रुपयांना मिळाले आहे. शिवलिंग आत्माराम या व्यक्तीने हे सोने घेतले आहे. सोन्यासोबत त्या व्यक्तीने चांदीही घेतली आहे. ती केवळ १२ रुपयांना आली आहे.

सोशल मीडिवर मजेशीर कमेंट

‘जिंदगी गुलजार है’ नावाच्या इन्स्टा अकाऊंटवर हे बिल शेअर करण्यात आले आहे. त्याला मजेशीर कमेंट मिळत आहे. अनेकांनी या पोस्टला लाईक केले आहे. ७९ हजारांपेक्षा जास्त लाइक्स या पोस्टला मिळाल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, त्यावेळी ११३ रुपयांचे मूल्य आजच्या ८० हजारांसारखे आहे. दुसरा म्हणतो ११३ रुपये कमवण्यासाठी तीन महिने त्या काळात लागत होते. आणखी एक जण म्हणतो, त्याकाळात पाच आणि दहा रुपये पगार होता.

सोन्याची किंमत ५० हजार पट वाढली

एक युजरने म्हटले. १९५९ मधील किंमत आणि आजची सोन्याची किंमत पाहिल्यास त्यात ५० हजार पट वाढ झाली. त्यामुळे सोने खरेदी नेहमी फायदेशीर आहे. सोन्यातील गुंतवणूक चांगली असल्याचे जुने लोक म्हणत होते, ते सत्य आहे.

Follow Us
महागाईचा तडाखा सुरूच! CNG-PNG दरात तिसऱ्यांदा मोठी वाढ
Fuel Price Hike | महागाईचा तडाखा सुरूच! CNG-PNG दरात तिसऱ्यांदा मोठी वाढ, सर्वसामान्य हैराण!
ठाकरेंच्या गटात फटाफुटीच्या चर्चांदरम्यान खासदाराचं सर्वात मोठं विधान,
ठाकरेंच्या गटात फटाफुटीच्या चर्चांदरम्यान खासदाराचं मोठं विधान, मी दिल्लीला...
हे काय? भाजप नेत्याने चालवली बस, स्टेअरिंग हातात घेताच मोठा अपघात...
हे काय? भाजप नेत्याने चालवली बस, स्टेअरिंग हातात घेताच मोठा अपघात... पहा VIDEO
ठाकरेंचे खासदार तळ्यात की मळ्यात आदित्य ठाकरेंच्या त्या विधानची सगळीकड
ठाकरेंचे खासदार तळ्यात की मळ्यात आदित्य ठाकरेंच्या त्या विधानची सगळीकडे चर्चा!
उद्धव ठाकरेंचा आमदारांना थेट आदेश, खासदार बंडखोरीच्या चर्चेनंतर घेतला
उद्धव ठाकरेंचा आमदारांना थेट आदेश, खासदार बंडखोरीच्या चर्चेनंतर घेतला मोठा निर्णय, 22 तारखेला...
पुन्हा 14 जून! सुशांतने जीवन संपवलं त्याच दिवशी संचिता गेली... भावानेच
पुन्हा 14 जून! सुशांतने जीवन संपवलं त्याच दिवशी संचिता गेली... भावानेच केला धक्कादायक खुलासा
खासदारांनी साथ सोडली की नाही? उद्धव ठाकरेंच्या प्रतिक्रियेवरून सगळंच
खासदारांनी साथ सोडली की नाही? उद्धव ठाकरेंच्या प्रतिक्रियेवरून सगळंच समजलं, पहा...
पहिले कानाखाली मारली, नंतर कॉलर खेचली, अभिजीत दिपकेसोबत काय घडलं?Video
पहिले कानाखाली मारली, नंतर कॉलर खेचली, अभिजीत दिपकेसोबत काय घडलं? पहिला Video समोर
ठाकरे गटात फूट की अफवा?; संजय राऊतांनी दिलं सर्वात मोठं उत्तर, म्हणाले
ठाकरे गटात फूट की अफवा?; संजय राऊतांनी दिलं सर्वात मोठं उत्तर, म्हणाले....
खासदार संजय देशमुखांचा ठाकरेंना फोन; प्रतापराव जाधवांच्या भेटीबाबत...
मोठी बातमी! खासदार संजय देशमुखांचा ठाकरेंना फोन; प्रतापराव जाधवांच्या भेटीबाबत सांगितलं अन्... काय घडलं?