AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

37 वर्षापूर्वीचा कागदाचा एक तुकडा सापडला अन् कुटुंब रातोरात झालं मालामाल; 10 रुपयाशी काय कनेक्शन?

चंदीगडमधील रतन ढिल्लो यांना घरात जुने रिलायन्स इंडस्ट्रीजचे शेअर्स सापडले. 1988 मध्ये 10 रुपयांना खरेदी केलेले हे शेअर्स आता लाखोंच्या किमतीचे आहेत. IEPFA ने या शेअर्सबाबत मार्गदर्शन केले असून रतन यांना ऑनलाइन प्रक्रिया करून ते परत मिळवता येतील.

37 वर्षापूर्वीचा कागदाचा एक तुकडा सापडला अन् कुटुंब रातोरात झालं मालामाल; 10 रुपयाशी काय कनेक्शन?
कागदाचा एक तुकडा सापडला अन् कुटुंब रातोरात झालं मालामाल; Image Credit source: money9
| Updated on: Mar 12, 2025 | 7:35 PM
Share

कुणाचं नशीब कधी उघडेल याचा काही नेम नाही. चंदीगडमधील एक कुटुंबाचं नशिबही रातोरात चमकलं. चंदीगडमधील या व्यक्तीला त्याच्या घरात रिलायन्स इंडस्ट्रीजच्या शेअरची कागदपत्रे मिळाली. त्याच्यासाठी हा मोठा कुबेराचा खजिनाच होता. रतन ढिल्लो असं या व्यक्तीचं नाव आहे. त्याने या बाबतची माहिती सोशल मीडियावर दिली. त्याने सोशल मीडियावर या शेअरचे कागदपत्र शेअर केली आहेत. 1988मध्ये केवळ 10 रुपयाला हे शेअर खरेदी केले असल्याची माहिती सोशल मीडियावर देण्यात आली आहे. रतनच्या म्हणण्यानुसार, त्याला हे कागद घरात पडलेले आढळले. त्याला शेअर मार्केटच्या बाबत काहीच माहीत नव्हतं. त्याने सोशल मीडियावरून लोकांची मदत मागितली. मी या शेअरचा अजून मालक आहे का? हे कोणी सांगू शकतो का? असं त्याने विचारलं. रतनची ही पोस्ट आता देशभरात व्हायरल होत आहे.

रतनच्या पोस्टनुसार, RILचे हे शेयर 1988मध्ये खरेदी करण्यात आले होते. त्यावेळी त्याची किंमत प्रती शेअरला 10 रुपये होती. त्यावेळी त्याने 30 शेअर खरेदी केले होते. आज रिलायन्सचे शेअर 1200 रुपयाच्यावर ट्रेंड करत आहेत. त्यामुळेच आता 37 वर्षानंतर या शेअरचं काय होणार? अशी माहिती घेण्यास लोक उत्सुक आहेत.

IEPFA चा सल्ला

रतन ढिल्लोंच्या पोस्टवर इन्व्हेस्टर एज्युकेशन अँड प्रोटेक्शन फंड ऑथेरिटी (IEPFA)ने उत्तर दिलंय. IEPFAच्या मते, रतनचे शेअर अनेक वर्षापासून अनक्लेम्ड आहेत. त्यामुळे हे शेअर IEPFAला ट्रान्स्फर झाल्याची शक्यता आहे. त्यामुळे IEPFA अधिकृत वेबसाईटवर सर्च फॅसिलिटीवरून चेक केलं जाऊ शकतं. जर रतनचे शेअर IEPFAमध्ये असेल तर त्यांना ऑनलाइन प्रोसेसला फॉलो करावे लागेल. त्यांना हे शेअर परत त्यांच्या डीमॅट अकाऊंटमध्ये आणावे लागतील. त्यांच्या मदतीसाठी IEPFAने एक लिंकही शेअर केली आहे. त्याशिवाय Zerodhaच्या कामथ बंधूंनीही रतनसाठी मदतीचा हात पुढे केला आहे.

शेअरची व्हॅल्यू काय?

रतनची पोस्ट व्हायरल होताच त्यावर कमेंटचा पाऊस पडत आहे. जर 30 शेअर असतील तर तीन वेळा स्टॉक स्प्लिट आणि दोन वेळा बोनस मिळून त्यांच्याकडे 960 शेअर होतील. त्यामुळे आता त्याची व्हॅल्यू सुमारे 11.88 लाख रुपये होते, असं एका यूजर्सने म्हटलंय. दरम्यान, टीव्ही9 मराठी या दाव्याची पुष्टी करत नाही. पण जर 1988नंतर चार 1:1 बोनस इश्यू झाले असं समजलं तर 30 शेअरचे 863 शेअर होतात. मंगळवारी BSE वर RIL ची क्लोजिंग प्राइस 1247.40 रुपये होती. म्हणजे रतनच्या शेअरची व्हॅल्यू या घडीला सुमारे 10.7 लाख रुपये असू शकते.

RIL ने कितीवेळा बोनस दिला?

मीडिया रिपोर्टनुसार, मुकेश अंबानी यांच्या नेतृत्वातील रिलायन्सने 1970च्या दशकात लिस्टिंगनंतर 6 वेळा बोनस दिला आहे. पहिला बोनस 1980 मध्ये 3:5 च्या रेशिओमध्ये होता. नंतर 1983 मध्ये 6:10 आणि त्यानंतर 1997, 2009, 2017 आणि नुकतेच 2024 मध्ये 1:1 रेशिओत बोनस शेअर देण्यात आले होते.

महापालिका निवडणुकीत AB फॉर्मवरून शिंदे गटाच्या शिवसेनेत राडा
महापालिका निवडणुकीत AB फॉर्मवरून शिंदे गटाच्या शिवसेनेत राडा.
कुख्यात गुंड गजा मारणेच्या पत्नीला दादांच्या राष्ट्रवादीचे तिकीट
कुख्यात गुंड गजा मारणेच्या पत्नीला दादांच्या राष्ट्रवादीचे तिकीट.
दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी
दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी.
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?.
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट..
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष....
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?.
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्..
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्...
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त.
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज.