काचेच्या पिंजऱ्यात कैद, तो सीरियल किलर ज्याला लोक म्हणत होते देवदूत! शेवटची इच्छा वाचून हादरू जाल, आजही भोगतोय शिक्षा
आज आम्ही तुम्हाला एका अशा सीरियल किलरबद्दल सांगणार आहोत, जो ब्रिटनचा सर्वात खतकनाक सीरियल किलर मानला जातो. या गुन्हेगाराच्या नावावर सर्वात जास्त काळ तुरुंगात कैद राहण्याचा रेकॉर्डही आहे. हा आरोपी गेल्या ५० वर्षांपासून तुरुंगात बंद आहे.

एक असा कैदी, जो गेल्या ५० वर्षांपासून तुरुंगाच्या लोखंडी सळयांच्या मागे कैद आहे. तो इतका खतरनाक आहे की, त्याला जमिनीत एका काचेच्या, पारदर्शक पिंजऱ्यात ठेवण्यात आले आहे. त्याचे कर्म इतके वाईट आहेत की, मृत्यूही त्याला स्पर्श करायला तयार नाही. या आरोपीचे नाव आहे रॉबर्ट मॉड्स्ली… रॉबर्ट मॉड्स्लीच्या गुन्ह्यांची कथा इतकी भयानक आहे की, दुसऱ्या कैद्यांना त्याच्याशी भेटण्याची-संबंध ठेवण्याचीही परवानगी नाही. रॉबर्ट मॉड्स्ली ब्रिटनच्या वेकफील्ड तुरुंगात एकटा गेल्या ५० वर्षांपासून आपली शिक्षा भोगत आहे. १९७४ मध्ये त्याला तुरुंगात टाकण्यात आले होते. आता तो ७१ वर्षांचा झाला आहे.
डोक्यात चमचा घुसवून मारले
रॉबर्ट मॉड्स्लीला १९७४ मध्ये तुरुंगात टाकण्यात आले होते. तेव्हा कोर्टाने रॉबर्टला लहान मुलांचे लैंगिक शोषण करणाऱ्या जॉन फॅरेल नावाच्या एका माणसाच्या हत्येचा दोषी ठरवले. तुरुंगात राहत असताना रॉबर्टने तीन आणखी लोकांची हत्या केली. यापैकी एकाला त्याने डोक्यात चमचा घुसवून मारले होते. त्यानंतर रॉबर्टला दुसऱ्या कैद्यांशी भेटण्यावर बंदी घालण्यात आली.
खर्चांसाठी पुरुष वेश्या बनला
रॉबर्टचा जन्म लिव्हरपूलमध्ये झाला होता, आठ वर्षांपर्यंत त्याने एका कॅथोलिक अनाथालयात जीवन काढले. त्यानंतर त्याला दत्तक घेतले गेले आणि तो आपल्या आई-वडिलांसोबत राहू लागला. तेथे त्याला खूप हिंसक वागणूक मिळाली. १६ वर्षांचा असताना रॉबर्ट घर सोडून पळून गेला आणि त्याला ड्रग्सचे व्यसन लागले. आपले खर्च भागवण्यासाठी तो पुरुष वेश्येच्या भूमिकेत काम करू लागला. या काळात त्याची एक ग्राहक, जॉन फॅरेल नावाच्या माणसाशी भेट झाली. जॉन हा मुलांचे लैंगिक शोषण करत होता.
रॉबर्टची पहिली हत्या
एक दिवस जॉनने रॉबर्टला मुलांचे फोटो दाखवले. या मुलांचे त्याने लैंगिक शोषण केले होते. फोटो पाहून रॉबर्ट भडकला आणि त्याने जॉनची हत्या केली. ही हत्या इतक्या भयानक पद्धतीने केली गेली होती की, जॉनच्या चेहऱ्याचा रंग पूर्ण निळा पडला होता. तपासादरम्यान पोलिसांनी मृतदेहाचे नावच ‘ब्लू’ ठेवले होते.
९ तास कोठडीत बंद करून मारहाण केली
या हत्येसाठी १९७४ मध्ये रॉबर्टला आजीवन कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आणि एका अशा तुरुंगात पाठवण्यात आले. १९७७ मध्ये रॉबर्टला कळले की, या तुरुंगात डेव्हिड फ्रान्सिस नावाचा एक कैदी आहे, ज्याच्यावर लहान मुलांच्या लैंगिक शोषणाचा गुन्ह्या आहे. रॉबर्टने डेव्हिडला एका खोलीत नेले आणि ९ तास कोठडीत बंद करून डेव्हिडची मारहाण केली आणि जेव्हा दुसऱ्या कैद्यांनी दरवाजा तोडला, तेव्हा डेव्हिडचा मृत्यू झाला होता. त्यानंतर रॉबर्टला यॉर्कशायरच्या वेकफील्ड तुरुंगात पाठवण्यात आले.
काचाच्या पिंजऱ्याची कोठडी
त्यानंतर तुरुंगाच्या तळघरात एक विशेष काचेच्या पिंजऱ्याच्या कोठडीचे बांधकाम सुरू झाले आणि १९८३ पर्यंत ते तयार झाले. या कोठडीत मोठ्या बुलेटप्रूफ खिडक्या आणि पेपरबोर्डपासून बनवलेला एक टेबल आणि खुर्ची आहे. तसेच शौचालय आणि सिंक फरशीशी जोडलेले आहेत. एंट्री गेट एका स्टीलच्या दरवाजातून होतो, जो जाड पर्स्पेक्समध्ये बंद एका छोट्या पिंजऱ्यात उघडतो. यात खाली एक छोटी खिडकी बनवण्यात आली आहे, ज्याद्वारे त्याला अन्न दिले जाते. या कोठडीत ठेवल्यानंतर, रॉबर्टने एका पत्रात लिहिले होते की, इथे राहून वाटते की, जणू त्याला जिवंतच पुरले गेले आहे.
पाळीव पोपटाची मागणी
त्याने कोर्टाकडून आपल्या कोठडीत एक टीव्ही मागितला आणि लिहिले की, जर टीव्ही देऊ शकत नसाल, तर तो सायनाइड कॅप्सूल मागेल. त्याने लिहिले की, ही कॅप्सूल तो आपल्या इच्छेनुसार खाईल. २००० मध्ये रॉबर्टने कोर्टाकडून त्याला मरण्याची परवानगी देण्याची विनंती केली. जेव्हा ही मागणीही मान्य झाली नाही, तेव्हा त्याने आपल्यासाठी एक पाळीव पोपट मागितला. आपल्या पत्रात त्याने वचन दिले की, तो त्या पोपटावर प्रेम करेल आणि त्याला मारून खाणार नाही. तरीही त्याची प्रत्येक मागणी नाकारण्यात आली. सध्या रॉबर्ट तुरुंगात बंद आहे आणि आपली भयानक शिक्षा भोगत आहे.
