बौद्ध भिक्षूंना सौंदर्याच्या जाळ्यात अडकवले! 80,000 अश्लील व्हिडीओ बनवले, प्रेग्नंट होताच.. कोण आहे ‘मिस गोल्फ’?
आज आम्ही तुम्हाला अशा एका महिलेबद्दल सांगणार आहोत, जी प्रथम अनेक पुरुषांशी संबंध प्रस्थापित करायची आणि गुपचूप त्यांचे व्हिडीओ बनवायची. जेव्हा तिच्या घराची झडती घेण्यात आली, तेव्हा पोलिसांना 80,000 हून अधिक छायाचित्रे आणि अश्लील व्हिडीओ सापडले. या व्हिडीओचा वापर ती भिक्षूंना भिक्खूंना ब्लॅकमेल करण्यासाठी करायची.

एक 35 वर्षीय महिला, नाव विलावन एम्सावट उर्फ ‘मिस गोल्फ’ (Ms Golf) आणि काम अश्लील फोटो आणि व्हिडीओ बनवून पैसे उकळणे. होय, या एकट्या महिलेने थायलंडमधील सर्वात मोठा घोटाळा केला आहे. कसा? तिने प्रथम अनेक बौद्ध भिक्षूंना सौंदर्याच्या जाळ्यात अडकवले, नंतर त्यांचे अश्लील व्हिडीओ बनवले आणि मग सुरू झाला ब्लॅकमेलिंगचा खेळ.
या 35 वर्षीय महिलेने 2019 पासून अनेक बौद्ध मंदिरांमधील सुमारे 20 वरिष्ठ आणि श्रीमंत भिक्षूंना भुरळ घातली. त्यांच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. ही मिस गोल्फ एवढ्यावरच थांबली नाही, तर तिने या भिक्षूचे 80,000 हून अधिक अश्लील फोटो आणि व्हिडीओ बनवले.
नेमकं प्रकरण काय आहे?
खरं तर, बौद्ध भिक्षूंना ब्रह्मचर्याचे पालन करणे बंधनकारक आहे. याच फायदा घेत मिस गोल्फ भिक्षूंना आपल्या जाळ्यात अडकवत होती. या साऱ्या गोष्टी अगदी गुपचूप चालल्या होत्या. पण अचानक पोलिसांना एका प्रकरणाची कुणकुण लागली. जून महिन्यात पोलिसांना कळले की, बँकॉकमधील एका भिक्षूंने अचानक संन्यासी जीवन सोडण्याचा निर्णय घेतला आहे. ही बातमी जंगलात लागलेल्या वणव्याप्रमाणे पसरली. प्रकरणाचा तपास केला असता पोलिसांना कळले की, हा ब्लॅकमेलिंगचा मामला आहे. त्यामुळे त्या भिक्षूने अचानक हा निर्णय घेतला.
पोलिसांच्या मते, मिस गोल्फ त्या भिक्षूला ब्लॅकमेल करत होती. मागील वर्षी मे महिन्यात मिस गोल्फने त्या भिक्षूशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले आणि नंतर दावा केला की ती आई होणार आहे. मुलाच्या संगोपनासाठी तिने 70 लाख थाई बाट (सुमारे 18.52 कोटी रुपये) मागितले. त्यानंतर त्या भिक्षूने ब्रह्मचर्य सोडण्याचा निर्णय घेतला.
5600 व्हिडीओ, 80,000 फोटो
जेव्हा या प्रकरणाचा तपास सुरु झाला, तेव्हा एकामागून एक खुलासे होत गेले. केवळ एकच नव्हे, तर अनेक भिक्षू मिस गोल्फच्या खात्यात पैसे पाठत होते. मिस गोल्फ प्रथम संबंध प्रस्थापित करायची आणि मग ब्लॅकमेल करायची. जेव्हा तिच्या घराची झडती घेण्यात आली, तेव्हा पोलिसही थक्क झाले. पोलिसांनी तिला बँकॉकजवळील नॉन्थाबुरी येथून अटक केली. तिचे पाच मोबाइल फोन जप्त केले. जेव्हा फोन तपासले गेले, तेव्हा त्यात 5600 आक्षेपार्ह व्हिडीओ, 80,000 फोटो आणि चॅट रेकॉर्ड सापडले. यामध्ये तिची मोठ्या बौद्ध भिक्षूंशी जवळीक स्पष्ट दिसत होती. या खुलाशाने थायलंडच्या धार्मिक आणि सामाजिक रचनेला हादरवून सोडले आहे.
श्रीमंत आणि वरिष्ठ बौद्ध भिक्षूंना करत होती लक्ष्य
विलावनचा मार्ग खूपच शातीर होता. ती थायलंडमधील प्रसिद्ध मंदिरांमध्ये राहणाऱ्या श्रीमंत आणि प्रभावशाली बौद्ध भिक्षूंना लक्ष्य करत होती. पोलिसांच्या मते, तिने सुमारे 15 वरिष्ठ बौद्ध भिक्षूंशी रोमँटिक आणि शारीरिक संबंध प्रस्थापित केले. त्यानंतर ती दावा करायची की ती गर्भवती आहे आणि भिक्षूंकडून लाखो रुपये उकळायची. अशा प्रकारे तिने सुमारे 385 मिलियन बाट (102 कोटी रुपये) कमावले होते. मात्र, आता मिस गोल्फ पोलिसांच्या ताब्यात आहे. सध्या या प्रकरणाचा तपास सुरू आहे.
