स्वस्तातील फार्महाऊस खरेदी केल्याने नवरा-बायको होते जाम खूश; एक सीक्रेट दरवाजा उघडला अन्…

एक जोडपं जुना फार्महाऊस खरेदी करते. घराचा तपासणी करताना त्यांना एक गुप्त दरवाजा सापडतो. तो उघडल्यावर त्यांना दगडी शिडी असलेलं रहस्यमय तळघर दिसते. तळघरात असलेल्या जुन्या फुलांच्या वॉलपेपरने त्यांची उत्सुकता वाढवते. त्यांनी याचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे, ज्यावर विविध प्रतिक्रिया येत आहेत. घराची खरी कहाणी काय आहे हे अजूनही रहस्य आहे.

स्वस्तातील फार्महाऊस खरेदी केल्याने नवरा-बायको होते जाम खूश; एक सीक्रेट दरवाजा उघडला अन्...
Image Credit source: प्रातिनिधीक फोटो
Follow us
| Updated on: Jan 02, 2025 | 4:38 PM

प्रत्येकाला आपलं हक्काचं घर असावं वाटतं. अलिशान घर असावं, त्यात सर्व सुविधा असाव्यात असं प्रत्येकाला वाटत असतं. त्यामुळे आयुष्याची सर्व पुंजी घालवून माणसं घर घेतात. आपल्या स्वप्नांचा महाल उभा करतात. काहींना अधिक मोठं घर हवं असतं म्हणून बंगला खरेदी करतात. काहींचा कल रो हाऊसकडे असतो. तर काहींना फार्महाऊसमध्ये राहायला आवडतं. आनंद अनुभवता यावा म्हणून अनेकजण फार्महाऊसची निवड करतात. पण आयुष्यभराची पुंजी देऊन फार्म हाऊस खरेदी केलं आणि त्यात वेगळंच काही निघालं तर…

एका वेबसाईटने एक धक्कादायक वृत्ती दिलं आहे. DIYशी संबंधित व्हिडिओ शेअर करणाऱ्या विकीने तिच्या फॉलोअर्सला एक महत्त्वाची माहिती दिली आहे. मला एक जुना फार्महाऊस एकदम चांगल्या किमतीत मिळाला आहे. हा फार्महाऊस पाहिल्यावर मी जामच खूश झाले होते. मात्र, या घरात आम्ही नवराबायको राहायला आलो आणि आमची बोबडीच वळाली, असं विकीने म्हटलंय.

काय होतं तिथे?

ज्या गोष्टीची कल्पनाही केली नव्हती, असं काही या दोघांच्या बाबतीत त्या फार्महाऊसमध्ये घडलं. आपण जेव्हा नव्या घरात शिफ्ट होतो. तेव्हा त्या घरातील कोपरा न् कोपरा नीट पाहतो. त्या घराचा किती वापर करायचा आहे. घर मजबूत तर आहे ना हे पाहण्यासाठी आपण या गोष्टी चेक करत असतो.

अन् शिडी दिसली

फार्महाऊसचा कोपरा न् कोपरा चेक करत असताना त्यांना एक रहस्यमय गोष्ट सापडली. या ठिकाणी त्यांना एक सीक्रेट दरवाजा दिसला. हा दरवाजा उघडल्यावर त्यांना त्यात काही शिड्या दिसल्या. दरवाजाच्या आत काय आहे हे पाहण्यासाठी त्यांनी दरवाजा उघडला. हे जोडपं दरवाजा उघडून तळघरात गेलं. तळघरात जाताना दोघेही घाबरून गेले होते. पण दोघांनीही हिंमत केली आणि एक एक पाऊल टाकत पुढे गेले. पण दरवाजा उघडल्यावर त्यांना तळघरात दिसलं त्याने त्यांची तंतरली. दरवाजा उघडताच त्यांच्यासमोर एक दगडांची शिडी दिसली.

ही शिडी पाहिल्यावर हा रस्ता पाताळात जात असल्याचं वाटत होतं. या रस्त्यावर जुन्याकाळातील फुलांचे वॉलपेपर होते. त्यामुळे या दाम्पत्याला आश्चर्य वाटलं. हा रस्ता पाताळात तर जात नाही ना? अशी मनात शंका आली. त्यांनी तात्काळ याचा व्हिडीओ तयार केला आणि सोशल मीडियावर टाकला. त्यावर आता वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत.

जळगावात 'पुष्पक'मधून थेट रूळावर उड्या अन् दुसऱ्या ट्रेननं उडवलं
जळगावात 'पुष्पक'मधून थेट रूळावर उड्या अन् दुसऱ्या ट्रेननं उडवलं.
धसांकडून परळीतील दोन खुणांचा खुलासा, एकाची हत्या तर एकीला जीवंत जाळलं
धसांकडून परळीतील दोन खुणांचा खुलासा, एकाची हत्या तर एकीला जीवंत जाळलं.
सैफच्या हॉस्पिटल बिलावरून नवा वाद, सर्वसामान्यांना 5 लाख देत नाही अन्
सैफच्या हॉस्पिटल बिलावरून नवा वाद, सर्वसामान्यांना 5 लाख देत नाही अन्.
निकष धुडकावून 1500 रूपये घेतले, अशा 'बहिणीं'साठी सरकारचा मोठा निर्णय
निकष धुडकावून 1500 रूपये घेतले, अशा 'बहिणीं'साठी सरकारचा मोठा निर्णय.
अखेर सैफनं 'त्या' रिक्षाचालकाची भेट घेतली, फोटो आला समोर
अखेर सैफनं 'त्या' रिक्षाचालकाची भेट घेतली, फोटो आला समोर.
Beed Case BIG Breaking: सरपंच हत्या प्रकरणातील आरोपी कृष्णा आंधळे फरार
Beed Case BIG Breaking: सरपंच हत्या प्रकरणातील आरोपी कृष्णा आंधळे फरार.
'उदय सामंत भटकती अन् लटकती आत्मा, दावोसला आमदार फोडायला गेलेत'
'उदय सामंत भटकती अन् लटकती आत्मा, दावोसला आमदार फोडायला गेलेत'.
सरपंच हत्येबद्दल मुंडे स्पष्टच बोलले, जे हत्यारे आहेत, त्यांना तात्काळ
सरपंच हत्येबद्दल मुंडे स्पष्टच बोलले, जे हत्यारे आहेत, त्यांना तात्काळ.
कराडला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी अन् जरांगे म्हणाले, '..आरोपी एकच'
कराडला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी अन् जरांगे म्हणाले, '..आरोपी एकच'.
बीड हत्या प्रकरणात कराडची जेलवारी वाढली! 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी
बीड हत्या प्रकरणात कराडची जेलवारी वाढली! 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी.