Video: 24 वर्षांपूर्वी शाहरुख म्हणाला होता, मला वाटतं माझ्या मुलाने ड्रग्जही घेतले पाहिजे, व्हिडीओ व्हायरल!

शाहरुख खानचा 24 वर्ष जुना व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. ज्यात त्याने गमतीनं म्हटलं होते की, त्याच्या मुलाने देखील ड्रग्ज आणि सेक्सचा अनुभव घ्यावा.

Video: 24 वर्षांपूर्वी शाहरुख म्हणाला होता, मला वाटतं माझ्या मुलाने ड्रग्जही घेतले पाहिजे, व्हिडीओ व्हायरल!
व्हायरल झालेला हा व्हिडिओ 1997 चा आहे, जेव्हा शाहरुख खान आणि त्याची पत्नी गौरी खान हे दोघेही सिमी गरेवालच्या शोमध्ये गेले होते
टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: Nupur Chilkulwar

Oct 04, 2021 | 1:24 PM

बॉलिवूडचा किंग खान अभिनेता शाहरुख खानचा (Shahrukh Khan) मुलगा आर्यन खानला (Aryan Khan) ड्रग्ज पार्टी प्रकरणी अटक करण्यात आली आहे. एनसीबीने (Narcotics Control Bureau-NCB) रविवारी आर्यनची बराच वेळ चौकशी केली, त्यानंतर त्याला अटक करण्यात आली. सोशल मीडियावर ही बातमी पसरताच शाहरुख आणि त्याच्या मुलाशी संबंधित जुने व्हिडिओ आणि फोटोंचा पूर आला. यातील शाहरुख खानचा 24 वर्ष जुना व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. ज्यात त्याने गमतीनं म्हटलं होते की, त्याच्या मुलाने देखील ड्रग्ज आणि सेक्सचा अनुभव घ्यावा. ( shahrukh-khan-gauri-khan-old-video-goes-viral-on-internet-after-aryan-detained-by-ncb-see-how-social-media-reacts )

व्हायरल झालेला हा व्हिडिओ 1997 चा आहे, जेव्हा शाहरुख खान आणि त्याची पत्नी गौरी खान हे दोघेही सिमी गरेवालच्या शोमध्ये गेले होते. या मुलाखतीत, शाहरुख खान गंमतीत म्हणाला की, आपल्या मुलाने त्या सर्व गोष्टी करायला हव्यात, ज्या तो स्वतः तरुण पणात करू शकला नाही. त्याचवेळी पुढं बोलताना गंमतीने शाहरुख खान म्हणतो की, “मला माझ्या मुलाने मुलींना डेट करावं, सेक्स आणि ड्रग्जचाही अनुभव घ्यावा असं वाटतं.” हेच नाही तर मुलाखतीत तो हेही म्हणाला की, ” जर तो एका सभ्य मुलासारखा दिसू लागला तर, मी त्याला घराबाहेर काढून टाकेल”.

व्हायरल व्हिडीओ आधी पाहू.

पण म्हणतात ना कधी कधी गंमतीत बोललेली गोष्टही पुढं जाऊन खरी होते, शाहरुख आणि त्याच्या मुलाबाबतही तेच झालं. शाहरुख खानने 24 वर्षांपूर्वी जे सांगितले ते आता खरे ठरत आहे. आज त्याचा मुलगा आर्यनला ड्रग्ज पार्टी प्रकरणात अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी शाहरुखसह बॉलूवूडला ट्रोल करायला सुरुवात केली आहे. शाहरुख खानविरोधात ट्विटरवर कमेंट्सचा पूर आला आहे. ‘ आर्यन खानला रविवारी मध्यरात्री मुंबईहून गोव्याला जाणाऱ्या क्रूजमध्ये ड्रग प्रकरणी ताब्यात घेण्यात आले आणि 12 तासांच्या चौकशीनंतर अटक करण्यात आली आणि फोर्ट कोर्टात त्याला हजर करण्यात आलं.

हेही वाचा:

Aryan Khan drug case | रेव्ह पार्टी-ड्रग्ज प्रकरणात आर्यन खान एनसीबीच्या ताब्यात, चर्चा मात्र एका वेगळ्या फोटोची, नेमका प्रकार काय ?

 

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें