Video: सापाला डिवचण्याचा प्रयत्न अंगाशी, तब्बल 3 वेळा संर्पदंश, तरीही सापाला सोडेना, व्हिडीओ व्हायरल

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओ क्लिपमध्ये एक काळा साप जमिनीवर सरपटताना दिसत आहे. त्याचवेळी एक माणूस त्याला पकडण्याचा प्रयत्न करतो. यादरम्यान, साप प्रथम त्याच्यापासून निसटून पळून जाण्याचा प्रयत्न करतो.

Video: सापाला डिवचण्याचा प्रयत्न अंगाशी, तब्बल 3 वेळा संर्पदंश, तरीही सापाला सोडेना, व्हिडीओ व्हायरल
सापाला छेडल्यानंतर साप चावतो

सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ खूप व्हायरल होत आहे, जो पाहून बहुतेक युजर्स आश्चर्यचकित झाले आहेत. हा व्हिडिओ एका सापाचा आहे, ज्यामध्ये एक व्यक्ती त्याला चिथावणी देत ​​त्याला पकडण्याचा प्रयत्न करत आहे. पण याचा परिणाम पाहिल्यानंतर कुणालाही भीती वाटेल. ती व्यक्ती ज्या पद्धतीने बेधडकपणे साप पकडण्याचा वारंवार प्रयत्न करते, ते पाहण्यासारखे आहे. (Snake attacked man Netizens were shocked after watching the Shocking Viral Video)

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओ क्लिपमध्ये एक काळा साप जमिनीवर सरपटताना दिसत आहे. त्याचवेळी एक माणूस त्याला पकडण्याचा प्रयत्न करतो. यादरम्यान, साप प्रथम त्याच्यापासून निसटून पळून जाण्याचा प्रयत्न करतो. पण जेव्हा ती व्यक्ती त्याला वारंवार स्पर्श करून धरण्याचा प्रयत्न करते, तेव्हा तो वळतो आणि त्याला चावतो. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, साप चावल्यानंतर व्यक्तीच्या बोटांमधून रक्त येऊ लागते. ती व्यक्तीही कॅमेऱ्यात पुन्हा पुन्हा दाखवत असते.

पाहा व्हिडीओ:

 

View this post on Instagram

 

A post shared by Royal Pythons (@royal_pythons_)

काही सेकंदांचा हा व्हिडिओ इंस्टाग्रामवर royal_pythons_ नावाच्या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. युजरने कॅप्शनमध्ये लिहिले की, हा फ्लोरिडाचा सर्वात मोठा पाण्याचा साप आहे. मी माझ्या आयुष्यात पहिल्यांदाच पाहिलंय. हा दैत्यासारखा दिसतो. सहसा साप खूप रागावतात, परंतु ते स्वतःला वाचवण्यापेक्षा पळून जाणे पसंत करतात. पण सापांच्या काही प्रजाती अशा आहेत ज्यांना भडकवलं तर वळून चावतात. म्हणूनच या प्राण्याला चिथावणी न देणे चांगले आहे.हा व्हिडिओ पाहिल्यानंतर बहुतेक वापरकर्ते आश्चर्यचकित झाले आहेत.

इंस्टाग्रामवर शेअर केल्यापासून आतापर्यंत 18 हजारांहून अधिक लोकांनी त्याला लाईक केले आहे. त्याच वेळी, लोक व्हिडिओ पाहिल्यानंतर सतत त्यांच्या प्रतिक्रिया देत आहेत. एका युजरने अतिशय आश्चर्यचकित होऊन कमेंट करत लिहिले की, ‘या व्यक्तीने शेवटी हा साप का पकडला, तोही दोनदा.’ त्याचवेळी आणखी एका यूजरने कमेंट केली आहे की, ‘वॉटर मोकासिन हे विषारी असतात. फ्लोरिडामध्ये हे साप मुबलक प्रमाणात पाहायला मिळतात. त्याचवेळी आणखी एका युजरने लिहिले आहे की, जेव्हा साप त्याला चावत होता, तेव्हा त्याला वारंवार डिवचण्याची काय गरज होती.

हेही पाहा:

Video: सगळ्यांच्या नादी लागा, गेंड्याच्या नाही, प्रवाशांच्या जीप मागे धावणाऱ्या गेंड्याचा अंगावर शहारे आणणारा व्हिडीओ

Video: मृत्यूचा दाढेत फसला, लाथ मारुन बाहेर पडला, पोहणाऱ्यावरील मगरीच्या हल्ल्याच्या व्हिडीओ व्हायरल

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI