काय म्हणताय? या देशात कंगाल असणं गुन्हा? शोधूनही सापडत नाहीत भिकारी… च्युईंगम खाण्यावरही बंदी
जगातील या दोन देशांमध्ये गरिबी किंवा भीक मागणे हा जवळपास गुन्हा मानला जातो. मजबूत सामाजिक सुरक्षा, उच्च किमान वेतन आणि कठोर नियमांमुळे येथे भिकारी शोधूनही सापडत नाहीत. स्वच्छता, सुरक्षितता आणि प्रत्येकाला घर देण्याची सरकारी धोरणे या देशांना समृद्ध बनवतात.

जगात असाही एक देश आहे, जिथे गरीब असणं गुन्हा मानला जातो. कंगाल असणं म्हणजे सर्वोच्च गुन्हा आहे. त्यामुळेच या देशात शोधूनही भिकारी सापडत नाही. स्वित्झर्लंड असं या देशाचं नाव आहे. यूरोपातील सर्वात समृद्ध देश म्हणून स्वित्झर्लंडकडे पाहिलं जातं. या ठिकाणी तुम्हाला शोधूनही एखादा कंगाल व्यक्ती सापडणार नाही. या देशात एकही व्यक्ती बेघर नाहीये. सरकारची वक्रदृष्टी या कंगालांवर असते. त्यामुळे कंगाल असणं या देशात बेकायदेशीर समजलं जातं. सोशल मीडियातील एका पोस्टनुसार, येथील लोकांचं कमीत कमी मासिक वेतन 4000 यूरो (4,07,856 रुपये) आहे. बेरोजगारीवर शेवटच्या पगाराचा 80 टक्के हिस्सा मिळतो. तर रस्त्यावर सिगारेटचं धोटूक फेकल्यास 300 यूरो (30589 रुपये) ची पावती फाडली जाते. ऐकायला हे विचित्र वाटतं. पण हीच इथली शिस्त आहे आणि विशेष म्हणजे लोकही ही शिस्त पाळतात.
19व्या शतकापासून स्वित्झर्लंडची अर्थव्यवस्था विकसित होत आहे. त्यासोबतच या देशाने एक मजबूत सामाजिक जाळं विणलं आहे. या देशात कोणीच रस्त्यावर झोपत नाही. कारण तुमच्याकडे घर नसेल तर सरकार तुम्हाला घर देतं. फेडरल हौसिंग पॉलिसीच्या अंतर्गत 60 टक्के लोकसंख्येला सब्सिडाइज्ड अपार्टमेंट दिले जातात. आरोग्य सेवा तर जवळपास मोफत आहे. तुम्ही बेरोजगार असाल तर 80 टक्के पगाराचा हिस्सा भत्ता म्हणून दिला जातो. तसेच करिअर रिट्रेनिंग प्रोग्रामही फुकटात शिकवला जातो. स्विस फेडरल स्टॅटिस्टिकल ऑफिसच्या मते, देशाचा गरिबी दर 6.6 टक्के आहे. म्हणजेच या देशात एकही व्यक्ती उपाशी झोपत नाही.
सर्वात सुरक्षित देश
या देशाची आणखी एक खासियत म्हणजे स्वच्छता. येथील रस्ते चकाचक असतात. हीच या देशाची खरी ओळख आहे. रस्त्यावर कचरा टाकल्यास तगडी रक्कम वसूल केली जाते. सिगारेटचे तुकडे फेकल्यावरही 250-300 फ्रँकचा दंड भसतो. 1980मध्ये स्वित्झर्लंडमध्ये क्लीन स्वित्झर्लंड म्हणून मोहीम सुरू करण्यात आली होती. त्याचाच हा एक भाग आहे. देशात कचऱ्याचं प्रमाण अत्यंत कमी आहे. कचऱ्याच्या रिसायक्लिंगचा रेट 50 टक्क्याहून अधिक आहे. गुन्ह्याचा दरही एवढा कमी आहे की, पोलिसांना नेहमीची हत्यारे सुद्धा नेण्याची गरज पडत नाही. फक्त 10 टक्के पोलीसच बंदूक घेऊन फिरतात. तेही विशेष परिस्थितीत. यूएन क्राईम इंडेक्समध्ये स्वित्झर्लंड सर्वात सुरक्षित देशांच्या टॉप 10 यादीत आहे, असं इथल्या पर्यावरण खात्याने स्पष्ट केलंय.
शोधला तरी सापडणार नाही
सिंगापूरच्या डेस्टिट्यूट पर्सन्स कायद्यानुसार या देशात भीक मागणे हा गुन्हा आहे. भीक मागितल्यास 1800 यूरोचा दंड आणि तुरुंगवास ठोठावला जातो. सिंगापूरची गरीबी 10 टक्क्यापेक्षाही कमी आहे. तसेच सरकारकडून 80 टक्के लोक संख्येला घरही देते. त्यामुळेच या देशात शोधूनही भिकारी सापडत नाहीत. या देशात च्युईंगमवर बॅन आहे. च्युईंगम खाताना पकडले गेलात तर जबर दंड ठोठावला जातो.
