35 वर्षांनंतर बाप-लेकाची भेट, भेटीच्या 10 मिनिटांनंतर मुलाचा मृत्यू, बायकरच्या मृत्यूने कुटुंबावर संकट

पॉल यांनी वडिलांना 35 वर्षांपासून पाहिलं नव्हतं. या दोघांची भेट झाली, आणि त्याच्याच 10 मिनिटांनंतर पॉल यांचा मृत्यू झाला.

35 वर्षांनंतर बाप-लेकाची भेट, भेटीच्या 10 मिनिटांनंतर मुलाचा मृत्यू, बायकरच्या मृत्यूने कुटुंबावर संकट
ज्या रस्त्यावर हा अपघात झाला, त्या ठिकाणी कुठलीही गती मर्यादा नव्हती. शिवाय, रस्ता खूपच वळणदार होता.

तब्बल 35 वर्षांनंतर आपल्या वडिलांना भेटल्यानंतर, एका बाईकस्वाराचा दुर्दैवी मृत्यू झाला. 56 वर्षांच्या पॉल कॉवेल यांचा सोमवारी(27 सप्टेंबर) ऑईल ऑफ मॅनध्ये एका टुरिस्ट व्हॅनला धडक दिल्यानंतर मृत्यू झआला. पॉल कॉवेल मॅन टीटी माऊंटेन कोर्सच्या एका मोटारसायकल रोड रेसिंग सर्किटमध्ये होते. ज्या रस्त्यावर हा अपघात झाला, त्या ठिकाणी कुठलीही गती मर्यादा नव्हती. शिवाय, रस्ता खूपच वळणदार होता. (The boy and father met 35 years later, after which the biker boy died in a road accident )

एका अंदाजानुसार, या टेकडीवर चढाई करताना त्यांच्या डोळ्यावर सूर्यकिरणं पडली, आणि त्यामुळे त्यांना समोरची टुरिस्ट व्हॅन दिसली नाही. मोटारबाईक प्रेमी पॉलचा जन्म ऑइल ऑफ मॅनमध्येच झाला होता. पॉलची 22 वर्षीय सावत्र मुलगी डेमी रामशॉ म्हणाली की, ” हा भयानक प्रसंग आहे, पॉल आपल्या वडिलांना परत एकदा भेटले होते. त्यांनी वडलांना 35 वर्षांपासून पाहिलं नव्हतं. या दोघांची भेट झाली, आणि त्याच्याच 10 मिनिटांनंतर पॉल यांचा मृत्यू झाला. त्यांनी आपल्या दोन्ही मुलांना पहिल्यांदाच आपल्या आजोबांना भेटण्यासाठी सांगितलं होतं.”

डेमी रामशॉने सांगितलं की, “मला आणि माझी सहकारी डॅनीला आता एक मुलगा झाला आहे, जो आता केवळ 12 दिवसांचा आहे. तो फक्त एकदाच त्यांना भेटला होता. हा खूपच दुखद प्रसंग आहे.” पॉलचं कुटुंब त्यांच्या पार्थिवाला आता फ्लीटवूड आणण्याचे प्रयत्न करत आहे, जेणेकरुन त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जावे. पॉलच्या अंत्यविधीसाठी आर्थिक निधी उभा केला जात आहे, यासाठी GoFundMe नावाची मोहिम सुरु झाली आहे.

हेही वाचा:

पोरं असावीत तर अशी, चार भाऊ आपसात भिडले, कोर्टात लढले, कोण म्हणतं आई कुठं काय करते?

Video | पूर आला अन् होत्याचं नव्हतं झालं, तब्बल 25 गाई वाहून गेल्या, हृदय पिळवटून टाकणारा व्हिडीओ

 

 

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI