Viral Video: कित्ती क्युट एवढुसा कुक ! नेटिझन्स या छोट्याशा शेफ च्या प्रेमात…

लोकं म्हणतात कि, खेळण्याचं आणि शिकण्याचं मुलाचं वय, हे मूल त्या लहान वयातच आपल्या कुटूंबासाठी आर्थिक मदत करण्यात गुंतलेलं आहे. व्हायरल व्हिडिओमध्ये ज्या पद्धतीनं हे मूल पूर्ण मेहनतीने लोकांसाठी चायनीज फूड तयार करण्यात गुंतलेलं आहे, ते पाहता तो नेटकऱ्यांची मनं जिंकत आहे.

Viral Video: कित्ती क्युट एवढुसा कुक ! नेटिझन्स या छोट्याशा शेफ च्या प्रेमात...
एका मुलाचा व्हिडीओ व्हायरल
Image Credit source: Instagram
रचना भोंडवे

|

May 20, 2022 | 8:30 PM

सोशल मीडियावर (Social Media) आजकाल एका मुलाचा व्हिडीओ व्हायरल (Video Viral) होतोय. व्हिडीओ क्लिपमध्ये, लहान मूल रस्त्याच्या कडेला असलेल्या स्टॉलवर चायनीज (Chinese Stall) पदार्थ बनवताना दिसत आहे. आता हा व्हिडीओ पाहून इंटरनेटची जनता भावुक झाली आहे. लोकं म्हणतात कि, खेळण्याचं आणि शिकण्याचं मुलाचं वय, हे मूल त्या लहान वयातच आपल्या कुटूंबासाठी आर्थिक मदत करण्यात गुंतलेलं आहे. व्हायरल व्हिडिओमध्ये ज्या पद्धतीनं हे मूल पूर्ण मेहनतीने लोकांसाठी चायनीज फूड तयार करण्यात गुंतलेलं आहे, ते पाहता तो नेटकऱ्यांची मनं जिंकत आहे.

मुलाचा व्हायरल होणारा हा व्हिडीओ अवघ्या काही सेंकंदाचा आहे, मात्र याकडे अनेक नेटकऱ्यांचं लक्ष लागलं आहे. व्हिडिओत तुम्ही पाहू शकता की, हे मूल पूर्णपणे फोकस्ड राहून ग्राहकांसाठी चायनीज फूड कसं तयार करत आहे. तुम्ही पाहू शकता की कमी उंचीमुळे मूल स्टूलवर उभं राहून डिश तयार करत आहे. मुलाची चिकाटी आणि मेहनतीने प्रभावित होऊन नेटिझन्स त्याच्यावर फिदा झाले आहेत.

मुलाचा हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर beinghuman__salman नावाच्या अकाऊंटवरून शेअर करण्यात आलाय. सोशल मीडियावर अपलोड केल्यापासून आतापर्यंत ५ लाख ४४ हजाराहून अधिक लोकांनी हा व्हिडीओ लाईक केला आहे. या व्हिडीओमुळे लोकं भावूक झाले आहेत. या मुलावर आपली कृपा कायम राहावी यासाठी बहुतांश युझर्स देवाकडे प्रार्थना करत आहेत. या व्हिडिओला नेटकऱ्यांचा जबरदस्त प्रतिसाद मिळालेला आहे.

एका युझरने कमेंट केली की,”देवाने निरपराध लोकांना असा दिवस दाखवू नये.” दुसऱ्या युझरने कमेंट करत लिहिलंय कि, “तुला प्रगती करायची आहे, देव तुझं भलं करो.” अनेक युझर्स असंही म्हणतात कि हा छोटा मुलगा नसून बुटका माणूस आहे. बहुतेक लोकांनी निगेटिव्ह कमेंट्स कडे लक्ष न देता मुलाच्या निरागसतेने प्रभावित होऊन कमेंट्स केलेल्या आहेत. एकूणच या व्हिडिओने लोकांची मनं जिंकली आहेत. बऱ्याच लोकांना या मुलाच्या भविष्याची चिंता सुद्धा सतावत आहे असं म्हणायला हरकत नाही.

हे सुद्धा वाचा

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें