AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Video: दूध अचानक गुलाबी कसं झालं? घाबरलेल्या आईचा व्हिडीओ शेअर करत सवाल, डॉक्टरांनी सांगितलं हे कारण!

जो जॉन्सन ओवरबी असं या महिलेचं नाव असून आपल्या बाळाला स्तनपान देत सुमारे सहा आठवडे उलटून गेले होते, त्यानंतर तिला एक दिवस तिच्या दुधात बदल झाल्याचे लक्षात आले.

Video: दूध अचानक गुलाबी कसं झालं? घाबरलेल्या आईचा व्हिडीओ शेअर करत सवाल, डॉक्टरांनी सांगितलं हे कारण!
आईच्या दुधाचा रंग अचानक गुलाबी झाला
| Edited By: | Updated on: Nov 15, 2021 | 5:48 PM
Share

आईचं दूध आणि गायीचं दूध, दोन्हीही बाळांसाठी चांगलं मानलं जातं. दोन्ही दुधांचा रंग एकच…पांढरा. पण एक अशीही आई आहे, जिच्या दुधाचा रंग अचानक बदलला आणि तो स्ट्रॉबेरी मिल्कशेक सारखा गुलाबी झाला. त्यामुळे पहिल्यांदाच आई झालेली महिला घाबरली. या आईने शेअर केलेला हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. (The milk of a woman who has been breastfeeding her baby for 6 weeks has turned pink, video goes viral)

जो जॉन्सन ओवरबी असं या महिलेचं नाव असून आपल्या बाळाला स्तनपान देत सुमारे सहा आठवडे उलटून गेले होते, त्यानंतर तिला एक दिवस तिच्या दुधात बदल झाल्याचे लक्षात आले. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये महिलेने म्हटले आहे की, “मला कुणीही सांगितले नाही की जेव्हा मला बाळ होईल आणि मी त्याला स्तनपान करेन, तेव्हा माझ्या दूधाच्या रंगात बदल होईल.” व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ 12 मिलियनपेक्षा जास्त वेळा पाहिला गेला आहे.

महिलेने व्हिडिओमध्ये दोन पाऊच दाखवले ज्यामध्ये तिचे एकामध्ये पांढरे दूध आणि दुसऱ्यामध्ये गुलाबी रंगाचे दूध होते, ज्याला ती स्ट्रॉबेरी दूध सांगत आहे. पिशवी दाखवत ही महिला बाळाला म्हणाली, “तुला या रंगाची अपेक्षा असेल ना?”

मात्र, त्यांनी लोकांना विचारले की, दुधाचा रंग गुलाबी का असतो? तर काही लोकांनी यावर प्रतिक्रिया व्यक्त करत दुधात त्याच्या शरीरातील रक्ताचे प्रमाण वाढल्याने ते गुलाबी झाल्याचे सांगितले. तथापि, लोकांनी सांगितले की मूल हे दूध पिऊ शकते.

दरम्यान, डॉक्टरांना याबद्दल विचारलं असता, त्यांच्या अंदाजानुसार बाळ दूध पित असताना निप्पलला चिरा जाऊ शकतात, किंवा कुठेतरी रक्तस्राव होऊ शकतो, त्यातून काही रक्त दुधात उतरत असेल, ज्याने दुधाचा रंग गुलाबी होत आहे. मात्र, यात घाबरण्यासारखं काहीच नसल्याचंही डॉक्टरांचं म्हणणं आहे.

त्याचवेळी हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर एका वेबसाइटने सांगितले की, आईचे दूध गुलाबी असणे म्हणजे दुधात रक्त मिक्स होत असल्याचं लक्षण आहे. वेबसाइट सांगते की, बऱ्याच काळ बाळाला दूध पाजत राहिल्यानंतर त्यात रक्ताचा काही अंश एकत्र होऊ शकतो.

हेही पाहा:

बंगळुरातल्या कृषी मेळाव्यात दांडग्या ‘कृष्णा’ची कमाल, 1 कोटींच्या बोलीने मालक मालामाल, देशी गोवंशाची किंमत डोकं चक्रावणारी!

Video: रसगुल्ला, दही, चाटचं कॉम्बिनेशन तुम्ही ट्राय केलंय? पाहा फूड ब्लॉगरची या फूडवरची भन्नाट प्रतिक्रिया!

 

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.