AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Video: रसगुल्ला, दही, चाटचं कॉम्बिनेशन तुम्ही ट्राय केलंय? पाहा फूड ब्लॉगरची या फूडवरची भन्नाट प्रतिक्रिया!

एका व्यक्तीने शेव, दही आणि चटणीसोबत रसगुल्ला चाट बनवला होता. बरं, आता हे कॉम्बिनेशन ट्राय करण्यासाठी एका फूड ब्लॉगरने दुकानाला भेट दिली. इंस्टाग्रामवर तिने पहिल्यांदा टिक्की रसगुल्ला चाट चाखतानाचा व्हिडिओ शेअर केला आहे.

Video: रसगुल्ला, दही, चाटचं कॉम्बिनेशन तुम्ही ट्राय केलंय? पाहा फूड ब्लॉगरची या फूडवरची भन्नाट प्रतिक्रिया!
दही रसगुल्ला चाट खाल्ल्यानंतर फूड ब्लॉगरची रिएक्शन
| Edited By: | Updated on: Nov 15, 2021 | 1:53 PM
Share

सोशल मीडियावर विचित्र गोष्टींची कमतरता नाही. सोशल मीडियावर फूडचे अनेक कॉम्बिनेशन्स पाहायला मिळतात, ज्यांचे फोटो आणि व्हिडिओ वेगाने व्हायरल होतात. तुम्ही जर खाद्यपदार्थाचे शौकीन असाल तर आम्हांला खात्री आहे की तुम्हीही त्याबद्दल थोडेसे उत्सुक असाल, सध्या व्हायरल होत असलेला व्हिडीओमध्ये एका व्यक्तीने शेव, दही आणि चटणीसोबत रसगुल्ला चाट बनवला होता. बरं, आता हे कॉम्बिनेशन ट्राय करण्यासाठी एका फूड ब्लॉगरने दुकानाला भेट दिली. इंस्टाग्रामवर तिने पहिल्यांदा टिक्की रसगुल्ला चाट चाखतानाचा व्हिडिओ शेअर केला आहे. (Weird Food Combination Food blogger tastes tikki rasgulla chaat Her reaction is now a viral video Funny Video)

होय, हे वाचून तुम्हाला थोडं विचित्र वाटलं असेल, पण हे खरं आहे. हा व्हिडिओ फूड ब्लॉगर अंजली धिंग्राने तिच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे आणि तो आतापर्यंत 84 हजार पेक्षा जास्त वेळा पाहिला गेला आहे. तिला हे कॉम्बिनेशन आवडले आहे का? हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला व्हिडिओ पाहावा लागेल. काही लोक हा व्हिडिओ लाईक करत आहेत तर काही लोक विचित्र प्रतिक्रिया देत आहेत.

व्हिडीओ पाहा:

View this post on Instagram

A post shared by So Saute (@sooosaute)

व्हायरल व्हिडिओची सुरुवात एका फूड ब्लॉगरने रेस्टॉरंटच्या बाहेर टिक्की रसगुल्ला चाट दाखवत आहेत. तिच्या हातात चाट दिसत आहे आणि ती तो टेस्ट करते. पण तिला तो काही आवडत नाही. ते खाल्ल्यानंतर ती निराश दिसते, कारण तो विकत घेण्यासाठी तिने 140 रुपये खर्च केले. हा व्हिडिओ शेअर करताना तिने कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘तुमचे आवडते स्ट्रीट फूड कोणते आहे?’, हा व्हिडिओ अपलोड झाल्यानंतर व्हायरल झाला आहे आणि नेटिझन्स व्हिडिओवर त्यांच्या प्रतिक्रिया शेअर करत आहेत. काही लोक रसगुल्ला चाट पाहून नाराज झाले होते, तर काही असामान्य कॉम्बो ट्राय करण्यासाठी उत्सुक होते.

फूड ब्लॉगर अंजली धिंग्रासारख्या पोस्टवर कमेंट करणाऱ्या अनेक वापरकर्त्यांनी या विचित्र खाद्यपदार्थाबद्दल आपली निराशा शेअर केली. एका युजरने लिहिले, ‘मला तिच्या चेहऱ्यावर निराशा दिसत आहे, कृपया अशा अस्सल मिठाईसोबत काहीही मूर्खपणा करू नका’ दुसऱ्या वापरकर्त्याने लिहिले, ‘एका बंगाली व्यक्तीचे मन खूप दुखावले गेले असावे’, दुसऱ्या यूजरने लिहिलं, ‘इतका विचित्र कॉम्बो कोण ठेवतो’ व्हिडिओच्या कमेंट सेक्शनमध्ये भरपूर इमोजी पाहायला मिळत आहेत.

हेही पाहा:

Video: छोट्या पगसोबत मालकाची मस्ती, मालकाचे डान्स स्टेप फॉलो करणारा छोट्या पगचा व्हिडीओ!

मुलगा कासव समजून नाल्यातल्या प्राण्याशी खेळत होता, पण जेव्हा खरं समोर आलं, तेव्हा सगळेच हादरले!

 

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.