AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बक्षीस जाहीर! पण 71 कोटी पाठवायचे कुणाच्या खात्यावर? लॉटरी कंपनी विनरचा शोध घेऊन घेऊन दमली पण…

लंडनमधील एका लॉटरी कंपनीची 71 कोटींच्या रकमेच्या लॉटरीच्या तिकीटाचे बक्षिस जाहीर झाले. मात्र बक्षीस जाहीर होऊन 15 दिवस उलटले तरी या लॉटरीचे पैसे घेण्यासाठी कोणीही आलेले नाही. त्यामुळे लॉटरी आयोजक देखील विजेत्याचा शोध घेत आहेत. या लॉटरीचे तिकीट घेणाऱ्या सर्व ग्राहकांनी आपले तिकीट तपासावे असे कंपनीकडून सांगण्यात येत आहे. कंपनीने मिडलँड्सपर्यंत विजेत्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला.

बक्षीस जाहीर! पण 71 कोटी पाठवायचे कुणाच्या खात्यावर? लॉटरी कंपनी विनरचा शोध घेऊन घेऊन दमली पण...
फाईल फोटो
vanita kamble
vanita kamble | Updated on: Jul 01, 2022 | 5:38 PM
Share

ब्रिटन : अनेकांना लॉटरीचे तिकीट काढण्याची सवय असते. अनेक जण विजयी देखील होतात. ते स्वत: लॉटरी(lottery) कंपनीशी संपर्क साधून बक्षिसाची रक्कम मिळवण्यासाठी धडपड करतात. मात्र, लंडमध्ये(UK) या विरुद्ध प्रकार घडला आहे. लॉटरी कंपनी स्वत: लॉटरीचे तिकीट जिंकणाऱ्या दावेदाराचा शोध घेत आहे. या लॉटरीच्या तिकीटाचे बक्षिस जाहीर झाले आहे. मात्र, बक्षिसाचे हे 71 कोटी पाठवायचे कुणाच्या खात्यावर? असा प्रश्न लॉटरी कंपनीला पडला आहे. त्यामुळे कंपनीकडून विनरचा शोध घेतला जात आहे. लॉटरीचे 71 कोटींचे बक्षीस जाहीर

लंडनमधील एका लॉटरी कंपनीची 71 कोटींच्या रकमेच्या लॉटरीच्या तिकीटाचे बक्षिस जाहीर झाले. मात्र बक्षीस जाहीर होऊन 15 दिवस उलटले तरी या लॉटरीचे पैसे घेण्यासाठी कोणीही आलेले नाही. त्यामुळे लॉटरी आयोजक देखील विजेत्याचा शोध घेत आहेत. या लॉटरीचे तिकीट घेणाऱ्या सर्व ग्राहकांनी आपले तिकीट तपासावे असे कंपनीकडून सांगण्यात येत आहे. कंपनीने मिडलँड्सपर्यंत विजेत्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला.

सदर लॉटरी कंपनी लवकरच ६०० कोटी रुपयांच्या जॅकपॉट लॉटरी विजेत्याची घोषणा करणार आहे. कॅमलोट नॅशनल लॉटरी वोल्व्हरहॅम्प्टनमधील मोलिनेक्स स्टेडियमवर भव्य कार्यक्रम आयोजित केला जाणार आहे. येथे या लॉटरी विजेत्याची घोषणा केली जाणार आहे.

मागच्या आठवड्यातच लंडनमध्ये अशाच एका लॉटरी शोमध्ये एका व्यक्तीने ५२५ कोटी रुपये जिंकले होते. यापूर्वी 4 फेब्रुवारी रोजी आणखी एका व्यक्तीने 10 अब्ज रुपयांहून अधिक रक्कमेची लॉटरी जिंकली होती.

जो आणि जेस थ्वेट्स नावाच्या जोडप्याने लॉटरीची आत्तापर्यंतची सर्वात मोठी रक्कम जिंकली आहे. या जोडप्याने जवळ पास १८ अब्जांची बंपर लॉटरी जिंकली आहे. हे जोडपे चेल्टनहॅममध्ये राहणारे आहे. ब्रिटनमधील आतापर्यंतची सर्वात मोठ्या रकमेची लॉटरी मानली जात आहे. मे महिन्यात या लॉटरीची सोडत पार पडली.

लहानपणी नाकात अडकलेलं नाणं, दहावर्षानंतर शिंकल्यावर बाहेर पडलं…

दक्षिण लंडन मध्ये वास्तव्यास असणारा मुलगा अवघ्या चार वर्षांचा असतांनाच त्याच्या नाकात नाणं अडकले (The coin stuck in nose) हेाते. ते, नाणं तसेच दहा वर्षे त्याच्या नाकात अडकून राहिले. आपल्या नाकात नाणं आडकुन राहिल्याचे त्यालाही निट आठवत नव्हते. एकदा अशीच शिंक (Sneeze) आली अन्‌ त्या सोबत ते, नाणं नाकातून बाहेर पडले. दहावर्षापासून नाकात नाणं अडकलेल्या अवस्थेत होते. आता ते बाहेरं पडल्याने, त्याला बरं वाटत आहे. लंडन मधील उमर कमर या चौदा वर्षाच्या या मुलाची ही गोष्ट आहे. उमर कमर दक्षिण लंडनमध्ये (In south London) राहतो. लहानपणी खेळतांना त्याच्या नाकात नाणे अडकले होते. नाणे अडकल्याची घटना तो विसरला होता. नाकाला जखम झाल्याने, तो अनेकवेळा डॉक्टरांकडे गेला, पण नाणे अडकल्याचे डॉक्टरांनाही कळू शकले नाही.

Follow Us
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?
राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; वाघमारेंचा जोरदार हल्ला
Jyoti Waghmare : राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; ज्योती वाघमारेंचा जोरदार हल्लाबोल
नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि लंकेंमध्ये खडाजंगी
Nilesh Lanke Vs Sujay Vikhe : नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि निलेश लंकेंमध्ये राजकीय खडाजंगी
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवरून पोलिसांना थेट आव्हान
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवरून पोलिसांना थेट आव्हान
मुंबई विमानतळावर लँड जिहाद? किरीट सोमय्या यांच्या आरोपांमुळे खळबळ
मुंबई विमानतळावर लँड जिहाद? किरीट सोमय्या यांच्या आरोपांमुळे खळबळ; थेट कारवाईची मागणी; आरोप काय?
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पुरेसा साठा, तरीही पाणीकपात सुर
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पुरेसा साठा, तरीही 10% पाणीकपात सुरू
एसटी प्रवाशांसाठी मोठी बातमी; 1 ऑक्टोबरपासून स्मार्ट कार्ड बंधनकारक...
ST Smart Card Sakti : एसटी प्रवाशांसाठी मोठी बातमी; 1 ऑक्टोबरपासून सवलतीसाठी स्मार्ट कार्ड बंधनकारक, कार्ड नसेल तर...
राज्यात सगळीकडे कोरडा दुष्काळ, या जिल्ह्यात मात्र महापूर....
राज्यात सगळीकडे कोरडा दुष्काळ, या जिल्ह्यात मात्र महापूर, 250 घरं थेट पाण्याखाली; नेमकं काय घडलं?