जगातील सर्वात मोठा पांढरा हिरा ‘द रॉक’चा लिलाव, 1 अब्ज 69 लाख रुपयांना विक्री…

जगातील सर्वात मोठा पांढरा हिरा 'द रॉक'चा लिलाव, 1 अब्ज 69 लाख रुपयांना विक्री...
अबब! हिऱ्याची किंमत ऐकून चक्रावून जाल...

द रॉक हा अब्जावधीचा हिरा 228.31 कॅरेटचा आहे. 'द रॉक' हा जगाील सर्वात मोठ्या आकाराचा पांढरा हिरा आहे. याचा आकार एका गोल्फ बॉलपेक्षा मोठा आहे.

आयेशा सय्यद

|

May 13, 2022 | 1:07 PM

मुंबई : जगातील सर्वात मोठ्या पांढऱ्या हिऱ्याची विक्री झाली आहे. ‘द रॉक’ (The Rock Diamond) असं या हिऱ्याचं नाव आहे. हा हिरा $21.9 दशलक्ष म्हणजेच 1 अब्ज 69 लाख रुपयांना विकला गेला आहे. पण हा हा हिरा नक्की कोणाला विकला गेला, याची माहिती आयोजकांनी दिलेली नाही. हा अब्जावधीचा हिरा 228.31 कॅरेटचा आहे. ‘द रॉक’ हा जगाील सर्वात मोठ्या आकाराचा पांढरा हिरा आहे. याचा आकार एका गोल्फ बॉलपेक्षा मोठा आहे. जिनेव्हा येथील क्रिस्टीच्या लिलावगृहामध्ये या हिऱ्याचा लिलाव पार पडला. 14 दशलक्ष फ्रँकपासून सुरू झालेली बोली दोन मिनिटांनंतर 18.6 दशलक्ष फ्रँकवर थांबली. याची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा (Viral News )आहे.

सर्वात मोठ्या पांढऱ्या हिऱ्याचा लिलाव

जगातील सर्वात मोठ्या पांढऱ्या हिऱ्याची विक्री झाली आहे. ‘द रॉक’ (The Rock Diamond) असं या हिऱ्याचं नाव आहे. हा हिरा $21.9 दशलक्ष म्हणजेच 1 अब्ज 69 लाख रुपयांना विकला गेला आहे. पण हा हा हिरा नक्की कोणाला विकला गेला, याची माहिती आयोजकांनी दिलेली नाही. हा अब्जावधीचा हिरा 228.31 कॅरेटचा आहे.

हे सुद्धा वाचा

न्यूयॉर्क पोस्टने याबाबत वृत्त प्रसिरित केलं आहे. त्यानुसार, हा हिरा 2000 मध्ये खाणीतून काढण्यात आला होता. यापूर्वी हा हिरा दागिन्यांचा साठा करणाऱ्या एका व्यक्तीकडे होता. त्यानंतर आठ वर्षांनी हा हिरा विकण्याचा निर्णय घेण्यात आला. या हिऱ्यावर जेव्हा जिनिव्हात बोली लागली तेव्हा पाच जण उपस्थित होते. यातले तीनजण अमेरिकेतील होते तर इतर दोघे मध्यपूर्वेतील होते. जिनिव्हातील क्रिस्टीज ज्वेलरीचे तज्ज्ञ मॅक्स फॉसेट म्हणाले, “हा जगात अत्यंत दुर्मिळ हिरा आहे, दागिन्यांच्या संग्रहातही तो आकर्षणाचा केंद्रबिंदू आहे. हा हिरा आपल्याकडे असावा अशी अनेकांची इच्छा होती. त्याच्या खरेदीसाठी अनेकांनी बोली लावली अखेर हा हिरा आता विकला गेला आहे.”

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें