कामवाली, चायवाला, वडापाव गर्ल ते ट्रक चालक… युट्यूबमधून लाखो रुपये कमावतात हे लोक…

यश हे प्रत्येकालाच मिळतं असं नाही. एखाद्या व्यक्तीला मेहनत करून यश मिळतं. तर एखाद्याला कितीही मेहनत करून यश मिळत नाही. काही लोकांना तर रातोरात यश मिळून जातं. ही किमया घडलीय सोशल मीडियामुळे. सोशल मीडिया नसता तर डॉलीचायवाला, वडापाव गर्ल आणि त्या ट्रकवाल्याचं काय झालं असतं? कुठे असते हे लोक?

कामवाली, चायवाला, वडापाव गर्ल ते ट्रक चालक... युट्यूबमधून लाखो रुपये कमावतात हे लोक...
Follow us
| Updated on: Aug 29, 2024 | 11:43 AM

सोशल मीडियाच्या जमान्यात कुणाचं कधी नशिब फळफळेल हे सांगता येत नाही. ज्याच्याकडे संकल्पना आहेत, ज्याच्याकडे नवनव्या कल्पना आहेत, अशा व्यक्तीला मरण नाही. सोशल मीडियात तुम्ही तुमच्या कल्पना विकून रातोरात श्रीमंत बनू शकता. बरं हे काही टाळ्या खाणारं वाक्य नाही, किंवा पुस्तकी ज्ञान नाही. हे वास्तव आहे. आज असंख्य लोक आहेत, ज्यांना धड बोलता येत नाही, ज्यांचं शिक्षण कमी आहे, असे लोक युट्यूबवर स्वत:चं चॅनल काढून लाखो रुपये कमावत आहेत. त्यांना स्वप्नातही वाटलं नसेल एवढी कमाई ते करत आहेत. यात कोण कामवालीबाई आहे, कोणी झाडू मारणारा आहे, कोणी वडापाव विकणारा आहे, तर कोणी ट्रकचालक आहे. त्यांची ही कहाणी तुम्हालाही प्रेरणा दिल्याशिवाय राहणार नाही.

ट्रकमध्ये रेसिपीचे व्हिडीओ, एक कोटीचं घर घेतलं

झारखंडच्या जामताडा येथील ट्रक चालक राजेश रवानी हा एक ट्रकचालक आहे. गेल्या 25 वर्षापासून राजेश ट्रक चालवतात. कुटुंबाची आर्थिक स्थिती वाईट होती. त्यामुळे त्यांनी शिक्षण सोडलं आणि ट्रक चालवू लागले. राजेश यांचे वडीलही ट्रकचाल होते. ट्रक चालवता चालवता डोक्यात एक आयडिया आली. अन् राजेश यांनी युट्यूब चॅनेल काढलं. ट्रकमध्ये जेवण बनविण्याचे व्हिडीओ त्यांनी करण्यास सुरुवात केली. त्यांचे व्हिडीओ प्रचंड लोकप्रिय झाले. आज त्यांच्याकडे 1.86 मिलियन सब्सक्राईबर आहेत. या युट्यूबच्या कमाईतून त्यांनी एक कोटीचं घर खरेदी केलं आहे.

राजेश रोज ट्रकमध्ये आणि रस्त्यावर बनवत असलेल्या जेवणाचे व्हिडीओ तयार करतात. हाच त्यांच्या कमाईचा एक मार्ग बनला आहे. ट्रक चालवून त्यांना महिन्याला 25 हजार ते 30 हजार रुपये पगार मिळतो. पण युट्यूबच्या कमाईतून त्यांना महिन्याला 4 ते 5 लाख रुपये मिळतात. कधी कधी तर ही कमाई 10 लाखावरही जाते. त्यांनी आपल्या ब्लॉगमधून एका महिन्यात 18 लाखाहून अधिक रुपयांची कमाई केली आहे.

झाडू मारला, आज कोट्यधीश

मोहम्मद अरबाज खान हा एक प्रसिद्ध युट्यूबर आहे. सोशल मीडियातील अत्यंत प्रसिद्ध नाव. त्याने आतापर्यंत सहा देशांचा प्रवास केला आहे. एक काळ असा होता की, मोहम्मद दिल्लीत फक्त 17 रुपये घेऊन आला होता. जगण्यासाठी त्याने अनेक उद्योग केले. आज त्याचे युट्यूबवर लाखो सब्सक्राईबर्स आहेत. त्यातून त्याला चांगली कमाई होते. वडिलांच्या निधनानंतर त्याच्यावर कुटुंबाचा भार आला होता. दिल्लीत आल्यावर त्याने एका हॉटेलमध्ये वेटरची नोकरी पत्करली. झाडू मारण्याचंही काम केलं. पण आज तो एक यशस्वी युट्यूबर असून महिन्याला लाखो रुपये कमावत आहे.

50 लाखाच्या कारचा मालक

बिहारच्या एका छोट्या गावात राहणाऱ्या हर्ष राजपूत याचाही एक किस्सा आहे. हर्ष हा एक धडाडीचा रिपोर्टर आहे. तो बिहारच्या एका छोट्याश्या गावचा रहिवाशी आहे. त्याने सोशल मीडियातून पैसे कमावून आपल्या मेहनतीवर 50 लाख रुपयांची ऑडी कार खरेदी केली. त्याने कोरोना काळात त्याचं युट्यूब चॅनल सुरू केलं. त्याने यापूर्वी दिल्लीत थिएटर केलं होतं. नशीब अजमावण्यासाठी तो मुंबईत आला. पण लॉकडाऊन लागला आणि त्याच्या स्वप्नांचा चक्काचूर झाला. त्यानंतर त्याने युट्यूब चॅनल सुरू केलं. त्यावर त्याने कॉमेडी व्हिडीओ टाकण्यास सुरुवात केली. आज त्याच्या व्हिडीओवर 20 मिलियनहून अधिक व्ह्यूज आहेत. जोश टॉकमध्येही त्याने आपली सक्सेस स्टोरी सांगितली आहे.

कामवाली बाईची लाखोची कमाई

प्रीती 22 वर्षाची आहे. ती उत्तराखंडच्या रुद्रापूरची आहे. आता ती सोशल मीडियातील एक प्रतिथयश नाव झाली आहे. तिचे लाखो फॉलोवर्स आहेत. पण हे यश तिला सहजासहजी मिळालं नाही. त्यासाठी तिला प्रचंड संघर्ष करावा लागलाय. सोशल मीडियावर स्वत: धोका पत्करून ती लोकांना हसवत असते. लोकांना एंटरटेन करते. कधीकाळी प्रीती लोकांच्या घरी काम करायची. कामवाली बाई म्हणून तिला ओळखलं जायचं. तिला कामवालीबाई म्हणून चिडवलंही जायचं. आज ती सोशल मीडियातील स्टार आहे. लाखोंची मालकीण आहे. चालत्या स्कूटरवर होळी खेळणं किंवा मेट्रोत अश्लील डान्स करणं या कारणामुळेही ती नेहमी चर्चेत असते.

चाय विकली अन्…

नागपूरचा डॉली चायवालाही आता देशात प्रसिद्ध आहे. डॉली चायवाल्याची एक छोटीशी टपरी आहे. डॉली चायवाला अवघा दहावी शिकलेला आहे. परिस्थितीमुळे त्याला चहाचं दुकान टाकावं लागलं. त्याची चहा बनवण्याची पद्धत अनोखी होती. त्याचा व्हिडीओ त्याने सोशल मीडियावर टाकला. हा व्हिडीओ बिल गेट्स यांनी पाहिला आणि ते स्वत: त्याला भेटायला आले. त्या दिवसानंतर डॉली चायवाल्याचं नशीबच बदललं. तो मीडियात चर्चेचा विषय झाला. आज तो यशस्वी झाला आहे. परदेशातही जाऊन येऊन असतो. त्याला अनेकदा दुबईतूनही निमंत्रण असतं. कधी बुर्ज खलिफाच्या टॉपला जाऊन चहा पितो तर कधी दुबईतील फेमस मोबाईल शॉपचं तो प्रमोशन करत असतो. पण कमाईही तेवढीच तगडी करत असतो.

वडापाव गर्ल…

चंद्रिका दीक्षितही वडा पाव गर्ल म्हणून प्रसिद्ध आहे. वडा पावचं दुकान टाकून ती प्रसिद्ध झाली. इतकी की तिला बिगबॉसमध्ये येण्याचं आमंत्रणही आलं. सहा महिन्याची असतानाच तिला तिची आई सोडून गेली. वडील व्यसनाधीन झाले. त्यानंतर आयुष्य अत्यंत दारिद्र्यात गेलं. हल्दीराममध्ये तिला नोकरी करावी लागली. त्यातच मुलाची तब्येत बिघडायची. त्यामुळे नोकरी सोडावी लागली. त्यानंतर दिल्लीच्या रस्त्यावर तिने वडापावची गाडी टाकली. त्यानंतर ती अधिकच चर्चेत आली. इतकी की वडा पाव विकून ती दिवसाला 40 हजार रुपये कमवू लागली. व्हिडीओच्या माध्यमातून तिची स्टोरी प्रचंड व्हायरल झाली. त्यानंतर ती बिगबॉसमध्येही गेली.

म्हणून मुस्लिम महिलांना बुरखा वाटले, विरोधकांच्या टीकेला प्रत्युत्तर
म्हणून मुस्लिम महिलांना बुरखा वाटले, विरोधकांच्या टीकेला प्रत्युत्तर.
अजितदादा गटातील माजी नगरसेवकाच्या पिस्तूलमधून चुलत भावाने केला गोळीबार
अजितदादा गटातील माजी नगरसेवकाच्या पिस्तूलमधून चुलत भावाने केला गोळीबार.
'लाडकी बहीण' योजनेत 12 'भामट्या' भावांनी भरला अर्ज , कशी झाली पोलखोल?
'लाडकी बहीण' योजनेत 12 'भामट्या' भावांनी भरला अर्ज , कशी झाली पोलखोल?.
तर खुलासा करा, राहुल गांधींच्या 'त्या' वक्तव्यानंतर मुंडेंचे आव्हान
तर खुलासा करा, राहुल गांधींच्या 'त्या' वक्तव्यानंतर मुंडेंचे आव्हान.
वादग्रस्त वक्तव्यानंतर स्पष्टीकरण, विरोधकांच्या टीकेवर राणे म्हणाले..
वादग्रस्त वक्तव्यानंतर स्पष्टीकरण, विरोधकांच्या टीकेवर राणे म्हणाले...
अजित पवार बारामतीतूनच लढणार? दादा गटाचे 20 उमेदवार ठरले, बघा यादी
अजित पवार बारामतीतूनच लढणार? दादा गटाचे 20 उमेदवार ठरले, बघा यादी.
सुषमा अंधारेंना किती शिवसेना माहिती?त्या टीकेवर यामिनी जाधवांचा पलटवार
सुषमा अंधारेंना किती शिवसेना माहिती?त्या टीकेवर यामिनी जाधवांचा पलटवार.
'भाजपात गेलो होतो, पण...'; नाराजी व्यक्त करत माजी आमदाराची घरवापसी
'भाजपात गेलो होतो, पण...'; नाराजी व्यक्त करत माजी आमदाराची घरवापसी.
पूरस्थितीवर आमदार-खासदार असंवेदनशील? पाहणीसाठी गेले अन् स्टंटबाजी
पूरस्थितीवर आमदार-खासदार असंवेदनशील? पाहणीसाठी गेले अन् स्टंटबाजी.
'राऊत भैसाटलेले, त्यांच्या बुद्धीला लकवा', भाजपच्या नेत्याचा पलटवार
'राऊत भैसाटलेले, त्यांच्या बुद्धीला लकवा', भाजपच्या नेत्याचा पलटवार.