AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

हा माणूस नेमका कोणत्या प्राण्यासोबत कलिंगड खातोय? नेटकरी भडकले

एक व्यक्ती कलिंगड खात आहे. पण त्याचवेळी एक प्राणीही हे कलिंगड खाताना दिसतोय. त्यावर लोक प्रतिक्रिया देत आहेत.

हा माणूस नेमका कोणत्या प्राण्यासोबत कलिंगड खातोय? नेटकरी भडकले
iguana and man eating watermelonImage Credit source: Social Media
Rachana Bhondave
Rachana Bhondave | Updated on: Nov 06, 2022 | 1:28 PM
Share

पाळीव प्राणी आणि त्यांच्याशी संबंधित सर्व व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतात. कधी ते मजेशीर असतात, तर कधी ते खूप भीतीदायक असतात. असाच एक व्हिडिओ समोर आलाय, ज्यामध्ये एक व्यक्ती कलिंगड खात आहे. पण त्याचवेळी एक प्राणीही हे कलिंगड खाताना दिसतोय. त्यावर लोक प्रतिक्रिया देत आहेत. पेट इग्वानासोबतचा हा व्हिडिओ एका युझरने ट्विटरवर शेअर केला आहे. यामध्ये एक व्यक्ती आपल्या पाळीव प्राणी इग्वानासोबत कलिंगडाचा तुकडा शेअर करताना दिसत आहे.

इग्वाना हा एक असा जीव आहे जो पालीच्याच प्रजातीचा आहे परंतु तो दिसायला पालीपेक्षा किंचित मोठा आहे. पाळीव प्राणी इग्वाना कोणालाही इजा करत नाहीत.

या व्हिडीओमध्ये हा माणूस एका हातात कलिंगड पकडून ते कलिंगड खाताना दिसत आहे. त्याचबरोबर तो इग्वानाही मागून या कलिंगडाचा आस्वाद घेत आहे.

तो आपल्या लहानशा तोंडात कलिंगडाचा एक छोटासा भाग घेऊन खातोय. व्हिडिओ पाहून असं वाटतं की, या व्यक्तीला इग्वानापासून धोका नाही आणि त्यांचा बॉंड खूप स्ट्रॉंग आहे.

त्याला कोणताही धोका नसला तरी हा व्हिडिओ व्हायरल होताच लोक या व्यक्तीवर संतापले आहेत. या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये शेअरिंग म्हणजेच केअरिंग असं लिहिलं आहे. पण एका युझरने लिहिलं की, हे आरोग्यासाठी खूप हानिकारक ठरू शकतं. या व्हायरल व्हिडिओवर सध्या लोक प्रतिक्रिया देत आहेत.

Follow Us
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?
राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; वाघमारेंचा जोरदार हल्ला
Jyoti Waghmare : राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; ज्योती वाघमारेंचा जोरदार हल्लाबोल