Trending Video : बसमध्ये बसण्यावरून विद्यार्थ्यांची फ्रि स्टाईल हाणामारी; व्हिडीओ पाहून तुम्ही म्हणाल…
एक मुलगा आणि एक मुलगी विंडो सीटवर बसण्यासाठी भांडण करत आहेत. दोघांमध्ये तुफान राडा झाल्याचं दिसत आहे.

व्हायरल व्हिडीओ : प्रत्येक व्यक्तीला वाटतं की प्रवासामध्ये विंडो सीट मिळावी. त्यासाठी काही जण तर बाहेरूनच विंडो सीटवर रुमाल किंवा बॅग ठेऊन जात असतात. पण त्या ठिकाणी दुसरा व्यक्ती येऊन बसते. त्यानंतर त्या दोघांमध्ये जागेसाठी तुफान भांडणं होतात. ट्रेन, बस (bus), लोकलमध्ये देखील खूप मोठ्या प्रमाणात सीटवर बसण्यासाठी भांडण होत असतात. त्यांच्या भांडणाचे व्हिडीओ देखील सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल (video viral) होत असतात. असाच एक स्कूल बसमधील विद्यार्थ्यांचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एक मुलगा आणि मुलगी विंडो सीटवर बसण्यासाठी एकमेकांवर तुटून (Students fight) पडताना दिसत आहेत.
Boy and Girl Over Mirror Seat in School Bus pic.twitter.com/UOLqWdqf4B
— Soneshwar Patil (@soneshwar_patil) October 21, 2022
बसमधील व्हिडीओमध्ये नेमकं काय?
एका बसमधील व्हिडीओने सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. या व्हिडीओमध्ये एक मुलगा आणि एक मुलगी विंडो सीटवर बसण्यासाठी भांडण करत आहेत. दोघांमध्ये तुफान राडा झाल्याचं दिसत आहे. हा व्हिडीओ कुठला आहे ते अद्याप माहिती नाही.
हा व्हिडीओ r/Ghar Ke Kalesh या ट्विटर अंकाऊटवर शेअर केला आहे. त्या व्हिडीओला मोठ्या प्रमाणात लाईक्स आणि रिट्विट करण्यात आलं आहे. आतापर्यंत हा व्हिडीओ 65 हजार जणांनी पाहिला आहे. या व्हिडीओवर मोठ्या प्रमाणात कमेंट्स करण्यात आल्या आहेत.
