VIDEO : वाघाच्या गळ्यात पट्टा बांधून कुत्र्यासारखं ओढलं; दोन तरुणांचा हा कारनामा पाहून लोक म्हणाले…

प्राण्यांचे वेगवेगळे व्हिडीओ नेहमीच सोशल मिडियावर व्हायरल होत असतात. मात्र, यावेळी एक वेगळाच व्हिडीओ सध्या सोशल मिडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये दोन तरूण वाघाच्या गळ्यात पट्टा बांधून कुत्र्यासारखं ओढत आहेत.

VIDEO : वाघाच्या गळ्यात पट्टा बांधून कुत्र्यासारखं ओढलं; दोन तरुणांचा हा कारनामा पाहून लोक म्हणाले...
वाघ

मुंबई : प्राण्यांचे वेगवेगळे व्हिडीओ नेहमीच सोशल मिडियावर व्हायरल होत असतात. मात्र, यावेळी एक वेगळाच व्हिडीओ सध्या सोशल मिडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये दोन तरूण वाघाच्या गळ्यात पट्टा बांधून कुत्र्यासारखं ओढत आहेत. हा व्हिडीओ बघितल्यानंतर लोक आश्चर्य व्यक्त करत आहेत. विशेष म्हणजे एका तरूणाच्या हातात पट्टा आहे तर दुसरा तरूण हाताने वाघाची शेपूट धरून वाघाला उठवण्याचा प्रयत्न करत आहे. (Two people pulling tiger Video Viral Goes on Social Media)

सोशल मीडियावर दररोज हजारो व्हिडीओ व्हायरल होतात. मात्र, वाघाच्या गळ्यात पट्टा बांधलेला व्हिडीओ खूप जास्त व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये वाघ जमिनीवर बसलेला दिसत आहे. त्यामध्ये एक तरूण वाघाला उठवण्याचा प्रयत्न करत आहे. त्यानंतर वाघ रागाने बघताना दिसत आहे. विशेष म्हणजे यावेळी वाघ कोणावरही हल्ला करत नाही. हा व्हिडीओ सोशल मीडियावर अनेकजण शेअर करत आहेत. या व्हिडीओला लाईक आणि कमेंट देखील मिळत आहेत.

एका युजर्सने या व्हिडीओवर कमेंट देताना लिहिले आहे की, खरोखरच हा वेडेपणा आहे. हा वाघ आहे, रस्त्यावरचा कुत्रा नाही. हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर wildanimals_2 नावाच्या पेजवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओ एक दिवसापूर्वी शेअर केला गेला आहे. आतापर्यंत 70 हजाराहून अधिक वेळा हा व्हिडीओ बघितला गेला आहे. सोशल मीडियावर नेहमीच असाप्रकारचे व्हिडीओ शेअर केले जातात.

मध्यंतरी सोशल मीडियावर अशाच प्रकारचा एक व्हिडीओ शेअर करण्यात आला होता. त्यामध्ये एक प्रशिक्षित हत्ती दुसर्‍या अनियंत्रित हत्तीवर नियंत्रण आणताना दिसत होता. त्या व्हिडीओमध्ये दिसत होते की, एक हत्ती अनियंत्रित झाला आणि तो सैरावैरा पळत होता. अनियंत्रित हत्तीचे ते रूप बघून अंगाला काटा येत होता. त्यानंतर एक प्रशिक्षित हत्ती त्याला कशाप्रकारे नियंत्रणात आणत हे त्या व्हिडीओमध्ये होते.

संबंधित बातम्या : 

Video | सिंहाच्या जबड्यात रानडुकराची तडफड, पाहा शिकारीचा थरारक व्हिडीओ

Video | मांस खाण्यासाठी दोघांची चढाओढ, बिबट्याचा मास्टरस्ट्रोक एकदा पाहाच

Viral Video : ‘ढल गया दिन हो गई शाम’गाण्यावर जवानांची परेड, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

(Two people pulling tiger Video Viral Goes on Social Media)