Chocolate Day 2025: व्हॅलेंटाईन वीकमध्ये चॉकलेट डे का साजरा केला जातो? जाणून घ्या त्याचे महत्त्व
दरवर्षी फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यात संपूर्ण जग व्हॅलेंटाइन वीक साजरा करते. या आठवड्याच्या तिसऱ्या दिवशी म्हणजे 9 फेब्रुवारी ला चॉकलेट डे साजरा केला जातो. या संदर्भात आम्ही तुम्हाला चॉकलेट डे, त्याचे महत्त्व आणि इतिहासाबद्दल सांगणार आहोत.

Chocolate Day: व्हॅलेंटाईन वीकच्या तिसऱ्या दिवशी म्हणजेच 9 फेब्रुवारीला चॉकलेट डे साजरा केला जातो. या दिवशी कपल्स एकमेकांना त्यांचे आवडते चॉकलेट देऊन त्यांचे प्रेम व्यक्त करतात. हा दिवस केवळ चॉकलेट्स देण्यापुरता नाही तर प्रेमी युगुल आणि कपल्सच्या नात्यात गोडवा निर्माण करण्याचा दिवस आहे. चॉकलेट हे नेहमीच प्रेमाचे प्रतीक मानले गेले आहे. त्यामुळे चॉकलेट डेची क्रेझ तरुण जोडप्यांमध्ये खूप पाहायला मिळते. प्रत्येकाची प्रेम व्यक्त करण्याची वेगळी पद्धत असते.
त्यामुळेच व्हॅलेंटाईन वीकमध्ये चॉकलेट डे साजरा करण्यासाठी खास दिवस देण्यात आलेला आहे. पण व्हॅलेंटाईन वीकमध्ये चॉकलेट डे साजरा करण्याची परंपरा कशी सुरू झाली हे तुम्हाला माहित आहे का? याची सुरुवात कधी झाली? या लेखात आम्ही तुम्हाला याविषयी सांगणार आहोत. चला जाणून घेऊयात.
चॉकलेट डेचा इतिहास काय आहे?
असे मानले जाते की सोळाव्या शतकात जेव्हा चॉकलेट युरोप देशामध्ये खूप लोकप्रिय झाले होते तेव्हा त्याचा संबंध प्रेमाशी जोडला जाऊ लागला. त्यानंतर चॉकलेट हळूहळू प्रेम व्यक्त करण्यासाठी आणि खास प्रसंग व्यक्त करताना जोडीदार एकमेकांना देण्याच्या एक भाग बनला. त्यामुळे व्हॅलेंटाईन वीकमध्ये चॉकलेट डेचा समावेश करण्यामागचा हेतू नातेसंबंधांमध्ये गोडवा प्रेमाने भरणे हा आहे.
चॉकलेट तिखट असायचे
तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की चॉकलेट सुरुवातीला चवीला तिखट लागायचे. चॉकलेटचा इतिहास सुमारे चार हजार वर्षे जुना आहे. तसेच चॉकलेटचा शोध मेक्सिकोमध्ये लागला. पूर्वी चॉकलेटची चव कडू असायची. कडू चॉकलेट तयार करण्यासाठी कोको बीन्स मध्ये मसाले आणि मिरची वाटून चॉकलेट बनवले जायचे. त्यानंतर कालांतराने 1848 मध्ये ब्रिटिश चॉकलेट कंपनी जे.एर फ्राय अँड सन्सने कोकोमध्ये लोणी, दूध आणि साखर मिसळून ते गॉड बनवले आणि त्याला चॉकलेटचे रूप दिले. अशा परिस्थितीत चॉकलेटची चवही काळानुसार बदलत गेली.
चॉकलेट डे साजरा करण्याचे कारण
चॉकलेटची गोड चव मैत्रीत व प्रेमामध्ये गोडवा आणते. असे मानले जाते की चॉकलेट डे मुळे नात्यांमधील गैरसमज दूर करण्याची संधी मिळते. हे खाल्ल्याने सेरोटोनिन आणि डोपामाइन नावाचे आनंदी संप्रेरक बाहेर पडतात, जे मूड तणावमुक्त करण्यास मदत करतात.