5

RRR चित्रपटाच्या नाटू नाटू गाण्यावर परदेशी व्यक्तीचा जबरदस्त डान्स, Video लोकांना चांगलाच भावना

फ्रान्समधील जीका नावाचा व्यक्तीने आपल्या डान्स व्हिडीओने देशी नेटिझन्सचं मन जिंकलं आहे. जीकाने सोशल मीडियावर टाकलेल्या नव्या व्हिडीओमध्ये तो RRR चित्रपटातील नाटू नाटू या गाण्यावर नाचताना पाहायला मिळत आहे. इतकंच नाही तर जीका आपला मित्र यूनुससोह या हिट गाण्याच्या हुकस्टेपला पूर्णपणे फॉलो करताना दिसत आहे.

RRR चित्रपटाच्या नाटू नाटू गाण्यावर परदेशी व्यक्तीचा जबरदस्त डान्स, Video लोकांना चांगलाच भावना
नाटू नाटू गाण्यावर परदेशी व्यक्तीचा डान्स व्हायरल
Follow us
| Updated on: Dec 12, 2021 | 9:32 PM

मुंबई : अनेक परदेशी नागरिकांनी बॉलिवूड (Bollywood) चित्रपटांमधील गाण्यांवर धरलेला ठेका आपण अनेकदा सोशल मीडियावर पाहिला असेल. असे अनेक व्हिडीओ सध्या इंटरनेट सेन्सेशन (Internet sensation) म्हणून समोर आले आहे. तुम्ही सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असाल तर तुम्ही अमेरिकेतील डान्सिंग डॅड म्हणुन प्रसिद्ध असलेल्या रिकी पॉन्डचा (Ricky Pond) डान्स नक्की पाहिला असेल. तो हिंदी गाण्यांवर जबरदस्त डान्स करुन सोशल मीडियावर (Social Media) स्टार बनला आहे. मात्र, तो जगातील एक असा व्यक्ती नाही जो बॉलिवूडवर जास्त प्रेम करत असेल. अन्य देशातील लोकही बॉलिवूडमधील गाण्यांवर प्रेम करतात. तसंच त्यांचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. असाच एक व्हिडीओ सध्या खूप व्हायरल होत आहे. ज्यात एक व्यक्ती आपली प्रतिभा दाखवून सर्वांना चकित करताना पाहायला मिळतोय.

फ्रान्समधील जीका नावाचा व्यक्तीने आपल्या डान्स व्हिडीओने देशी नेटिझन्सचं मन जिंकलं आहे. जीकाने सोशल मीडियावर टाकलेल्या नव्या व्हिडीओमध्ये तो RRR चित्रपटातील नाटू नाटू या गाण्यावर नाचताना पाहायला मिळत आहे. इतकंच नाही तर जीका आपला मित्र यूनुससोह या हिट गाण्याच्या हुकस्टेपला पूर्णपणे फॉलो करताना दिसत आहे.

व्हिडीओ आतापर्यंत 1 मिलियन अर्थात 10 लाखापेक्षा अधिक वेळा पाहिला

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ लोकांच्या पसंतीला उतरत आहे. हा व्हिडीओ आतापर्यंत 1 मिलियन अर्थात 10 लाखापेक्षा अधिक वेळा पाहिला गेला आहे. तर 1 लाखापेक्षा अधिक लोकांनी हा व्हिडीओ लाईक केला आहे. तर अनेक लोकांनी व्हिडीओवर कमेंटही केली आहे. एका यूजरने जीकाच्या डान्सची प्रशंसा करताना ‘बस ये रील अप व्हायरल’ अशी कमेंट केली आहे. तर काही लोकांनी कमेंट करत जिकाला बॉलिवूडच्या अजून गाण्यांवर डान्स करण्यासही सांगितलं आहे.

View this post on Instagram

A post shared by Younes ???? (@thedvrko)

दरम्यान, जिकाचा बॉलिवूड चित्रपटातील गाण्यावरील डान्स व्हायरल होण्याची ही पहिली वेळ नाही. यापूर्वी त्याने सूर्यवंशी चित्रपटातील ‘टिप टिप बरसा पाणी’ या गाण्यावर आपल्या मित्रासह डान्स करतानाचे व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.

RRR चित्रपट 7 जानेवारीला रिलीज होणार

जूनियर एनटीआर, राम चरण, अजय देवगण आणि आलिया भट्ट यांची मुख्य भूमिका असलेला RRR चित्रपट 7 जानेवारीला रिलीज होणार आहे. राहुल सिप्लीगंज आणि काला भैरव यांनी गायलेलं नाटू नाटू हे गाणं आतापर्यंत 44 मिलियन म्हणजे 4.4 कोटी पेक्षा अधिक वेळा पाहिलं गेलं आहे.

इतर बातम्या :

Breaking : 10वी सोबतच 12वी बोर्ड परीक्षांचे ऑनलाईन अर्ज भरण्यास शाळांना मुदतवाढ

शरद पवारांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छांचा वर्षाव, राज्यभरात विविध कार्यक्रम, पवारांनी सोशल मीडियावरुन मानले आभार

Non Stop LIVE Update
AC Local वर दगडफेक, कांदिवली ते बोरिवली स्थानकादरम्यान नेमकं काय घडलं?
AC Local वर दगडफेक, कांदिवली ते बोरिवली स्थानकादरम्यान नेमकं काय घडलं?
भावी मुख्यमंत्री राज ठाकरे? फडणवीसांनी दिल्या शुभेच्छा, म्हणाले...
भावी मुख्यमंत्री राज ठाकरे? फडणवीसांनी दिल्या शुभेच्छा, म्हणाले...
इंडिया आघाडीची रॅली म्हणजे टोपी लावण्याचे काम? दीपक केसरकर म्हणाले...
इंडिया आघाडीची रॅली म्हणजे टोपी लावण्याचे काम? दीपक केसरकर म्हणाले...
'सैन्य कशाला हवं, ...तरी राऊत पळून जातील', कुणी उडवली राऊतांची खिल्ली?
'सैन्य कशाला हवं, ...तरी राऊत पळून जातील', कुणी उडवली राऊतांची खिल्ली?
'संजय राऊत आदित्य ठाकरेंना चावले की काय?', कुणी केला खोचक सवाल?
'संजय राऊत आदित्य ठाकरेंना चावले की काय?', कुणी केला खोचक सवाल?
भुजबळांचा जरांगे यांना सल्ला; 'मला एकट्याला टार्गेट करण्यापेक्षा...'
भुजबळांचा जरांगे यांना सल्ला; 'मला एकट्याला टार्गेट करण्यापेक्षा...'
'त्या' दौऱ्यावरून आदित्य ठाकरे यांचा उद्योगमंत्र्यांना खोचक सवाल
'त्या' दौऱ्यावरून आदित्य ठाकरे यांचा उद्योगमंत्र्यांना खोचक सवाल
'ढेकणांना मारण्यासाठी लष्कराची गरज नसते', राऊतांवर कुणाचा निशाणा?
'ढेकणांना मारण्यासाठी लष्कराची गरज नसते', राऊतांवर कुणाचा निशाणा?
आदित्य ठाकरे यांना भाजपचा खोचक सवाल, 'अफझलखान तुमचा पाहुणा लागतो का?'
आदित्य ठाकरे यांना भाजपचा खोचक सवाल, 'अफझलखान तुमचा पाहुणा लागतो का?'
शिवतीर्थावरील दसरा मेळाव्यावरून राऊत यांचं आव्हान काय? थेट म्हणाले...
शिवतीर्थावरील दसरा मेळाव्यावरून राऊत यांचं आव्हान काय? थेट म्हणाले...