AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Video: … आणि बघता बघता वादळात झाड मुळासकट कोसळून पडलं

तौक्ते चक्रीवादळाने महाराष्ट्राचं मोठं नुकसान केलंय. त्यात कोकणाला याचा सर्वाधिक मोठा फटका बसलाय. हे नुकसान दाखवणारे अनेक व्हिडीओ देखील सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

Video: ... आणि बघता बघता वादळात झाड मुळासकट कोसळून पडलं
| Updated on: May 19, 2021 | 9:09 PM
Share

मुंबई : तौक्ते चक्रीवादळाने महाराष्ट्राचं मोठं नुकसान केलंय. त्यात कोकणाला याचा सर्वाधिक मोठा फटका बसलाय. हे नुकसान दाखवणारे अनेक व्हिडीओ देखील सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यातून या चक्रीवादळाचं रौद्र रुप पाहता येतंय. आता आणखी एक व्हिडीओ समोर येतोय. यात मालवणी बोलणारे हे नागरिक चक्रीवादळाच्या तडाख्यात घराशेजारील झाड पडताना बोलताना दिसत आहेत. त्यांचं झाड पडणार की नाही हे बोलणं सुरु असतानाच अचानक हे झाड अक्षरशः मुळासकट उन्मळून पडतं (Video of Malvan Kokan in which big tree collapse due to Tauktae Cyclone).

वादळ सुरु झाल्यानंतर अगदी सरळ उभं असलेलं हे झाड पडेल असं व्हिडीओ पाहणाऱ्या कुणालाही वाटत नाही. मात्र, व्हिडीओतील नागरिक यावर चर्चा करताना दिसतात. एक आजीबाई पुढे होऊन झाडाकडे जाऊ लागतात तेव्हा एकजण त्यांना पुढे जाण्यापासून रोखतो. वाऱ्याचा वेग कसा असेल आणि झाड केव्हा पडू शकेल अशा गप्पा मारत असतानाच हे महाकाय झाड वादळाच्या एका हिंदोळ्यासह मुळासकट उन्मळून पडतं. यानंतर आजूबाजूचे नागरिक एकच आरडाओरड करतात.

हे झाड कोसळल्यानंतर एक महिला झाडाखाली आपला लाकडाचा माच (खाट किंवा पलंग) मोडल्याचं म्हणत काहीशी तक्रार करते. मात्र, इतर लोक जाऊ द्या सोडून द्या म्हणत महिलेची समजूत काढतात आणि हसतात. या व्हिडीओत कोसळलेलं झाड पाहून वाऱ्याच्या वेगाचा अंदाज येऊ शकतो. अशाच प्रकारे कोकणात अनेक ठिकाणी हेच चित्र पाहायला मिळालंय. यातील काही मोजक्याच घटना व्हिडीओच्या स्वरुपात पाहायला मिळतात. अशा अनेक घटना आहेत ज्यांची तीव्रता यापेक्षा अधिक आहे केवळ त्या व्हिडीओत कैद झालेल्या नाहीत.

हेही वाचा :

Weather update: तौक्ते चक्रीवादळाचा असाही फायदा, मान्सूनचा पाऊस वेळेआधीच महाराष्ट्रात धडकणार

INS कोची जहाजातून 184 जणांची सुटका, 6 मृतदेह हाती, अरबी समुद्रात रेस्क्यू ऑपररेशन सुरुच

महाराष्ट्रालाही ‘तौक्ते’चा फटका, मग पंतप्रधानांचा भेदभाव का?; राष्ट्रवादीचा सवाल

व्हिडीओ पाहा :

Video of Malvan Kokan in which big tree collapse due to Tauktae Cyclone

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.