Video: नवरीची लग्नात भन्नाट एन्ट्री, बॉलीवूड गाण्यावर दमदार ठुमके, नेटकरी म्हणाले, याला म्हणतात दमदार एन्ट्री!

लग्नाला अविस्मरणीय बनवण्यासाठी फोटोशूटपासून ते नववधूच्या एंट्री आणि डान्सपर्यंत सर्व गोष्टींचे खास नियोजन केलं जातं. सध्या या गोष्टी खूप ट्रेंडमध्ये आहेत. अनेक विवाहसोहळ्यांमध्ये नववधू बॉलिवूड चित्रपटाच्या गाण्यावर नाचत समारंभात एंट्री घेताना दिसतात.

Video: नवरीची लग्नात भन्नाट एन्ट्री, बॉलीवूड गाण्यावर दमदार ठुमके, नेटकरी म्हणाले, याला म्हणतात दमदार एन्ट्री!
नाचत नवरीची लग्नमंडपात भन्नाट एन्ट्री

इंटरनेटवर लग्नाचे व्हिडिओ व्हायरल होत आहेत. विशेषत: वधू-वरांशी संबंधित व्हिडिओ कंटेंटला खूप पसंती दिली जाते. कधी एखादा गोंडस क्षण व्हायरल होतो, तर कधी नववधूच्या डान्सचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतो. सध्या एका लग्नाचा असाच एक व्हिडिओ खूप व्हायरल होत आहे, ज्यामध्ये वधू अप्रतिम डान्स करताना दिसत आहे. यावेळी वराचे भाव पाहण्यासारखे आहेत. (Viral Indian Wedding Video bride Entry dances how groom reacts on stage amazing video)

लग्नाला अविस्मरणीय बनवण्यासाठी फोटोशूटपासून ते नववधूच्या एंट्री आणि डान्सपर्यंत सर्व गोष्टींचे खास नियोजन केलं जातं. सध्या या गोष्टी खूप ट्रेंडमध्ये आहेत. अनेक विवाहसोहळ्यांमध्ये नववधू बॉलिवूड चित्रपटाच्या गाण्यावर नाचत समारंभात एंट्री घेताना दिसतात. असाच एक व्हिडिओ सध्या इंटरनेटवर धुमाकूळ घालत आहे. ज्यामध्ये नववधू एंट्री करताना ‘मैं नछडी फिरा…’ या बॉलिवूड गाण्यावर नाचताना दिसत आहे. वधू फुलांच्या चादरीत समारंभात प्रवेश घेते. वधू नाचत असताना, स्टेजवर बसलेला वर तिला फ्लाइंग किस देतो. यादरम्यान वराचे भावही पाहण्यासारखे असतात.

व्हिडीओ पाहा:

 

View this post on Instagram

 

A post shared by Happyframes (@happyframes_)

वधूचा हा गोंडस व्हिडिओ Happyframes_ नावाच्या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. युजरने कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘तुमच्या लग्नात एंट्रीच्या वेळी तुमच्या आवडत्या गाण्यावर डान्स करा.’ हा व्हिडिओ लोकांना खूप आवडला आहे. व्हिडिओमध्ये वधू डान्स करताना खूपच गोंडस दिसत आहे, तर वर सतत हसताना दिसत आहे.

हा व्हिडिओ पाहिल्यानंतर लोक आपल्या प्रतिक्रिया देत आहेत. एका यूजरने कमेंट करताना लिहिले, ‘वधू किती सुंदर दिसत आहे. तुम्हा दोघांना लग्नाबद्दल अभिनंदन.’ दुसऱ्या युजरने कमेंट करताना लिहिले, ‘माझ्यासाठी ही वधूची आतापर्यंतची सर्वोत्तम एन्ट्री आहे.’ त्याचवेळी आणखी एका युजरने वराबद्दल लिहिले, ‘तू खूप भाग्यवान आहेस.

हेही पाहा:

Video: वधूजवळ जाण्यासाठी वरापुढे मेव्हणीच्या अजब अटी, लग्नातील एका भन्नाट प्रथेचा व्हिडीओ व्हायरल

Video: श्रीदेवीच्या नवराई माझी लाडाची वर आजीबाईंचे ठुमके, नेटकरी म्हणाले, नाचायला वयाचं बंधन नसतं!

 

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI