Viral Video : ओव्हरटेक करताना व्हॅनला धडक, अपघाताचा थरारक व्हिडीओ पाहिलात का?

सोशल मीडियावर रस्ते अपघाताचे व्हिडीओ समोर येत असतात. कधीकधी हे व्हिडीओ खूप भितीदायक असतात, लोकांचे मन त्यांना पाहूनच सुन्न होतं. (Viral Video: Hit the van while overtaking, watch this video of the accident)

Viral Video : ओव्हरटेक करताना व्हॅनला धडक, अपघाताचा थरारक व्हिडीओ पाहिलात का?


मुंबई : जगभरात दररोज रस्त्यांवर (Accident) अनेक अपघात होत असतात. खरं तर, एका व्यक्तीचा निष्काळजीपणा दुसऱ्या व्यक्तीला मारू शकतो. सोशल मीडियावर रस्ते अपघाताचे व्हिडीओ समोर येत असतात. कधीकधी हे व्हिडीओ खूप भितीदायक असतात, लोकांचे मन त्यांना पाहूनच सुन्न होतं. या वेळी आम्ही तुम्हाला सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला व्हिडीओ दाखवत आहोत. या व्हिडीओमध्ये  एका ट्रॅक्टरनं वेगानं जाणाऱ्या व्हॅनला जोरदार धडक दिली आहे.

हा व्हिडीओ यूट्यूब चॅनल व्हायरल हॉगनं इंटरनेट जगतामध्ये शेअर केला आहे. व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की एक ट्रॅक्टर थेट रस्त्यावरुन जात आहे. मात्र थोड्या वेळानं त्याच्या मागून एक वेगानं येणारी व्हॅन येते. व्हॅनचा चालक त्याच्या पुढे जाणाऱ्या ट्रॅक्टरला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न करतो, जेव्हा ट्रॅक्टर चालकानं व्हॅनला जोरदार धडक दिली. यानंतरचं दृश्य पाहून बरेच लोक वाईट घाबरले. म्हणूनच अनेकांनी हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.

पाहा हा थरकाप उडवणारा व्हिडीओ

व्हिडीओच्या सुरवातीला, या रस्त्यावर कोणत्याही प्रकारचा अपघात होणार आहे असं वाटत. कारण ट्रॅक्टर चालक त्याच्याच हद्दीत गाडी चालवत होता. पण अचानक त्यानं जबरदस्तीनं व्हॅनला धडक दिली. वास्तविक, हा व्हिडीओ पाहून आपण हे समजून घेतलं पाहिजे की रस्त्यावर वाहन चालवताना कोणतीही चूक करू नका, अन्यथा अपघातात लोकांचा मृत्यू निश्चित आहे. विशेषतः वाहनाला ओव्हरटेक करताना, विशेष काळजी घेतली पाहिजे, कारण केवळ आपणच नाही तर इतरांनाही मारले जाऊ शकते.

संबंधित बातम्या

Video: पैलवानानं कुस्तीचा डाव टाकला आणि मृत्यूचा फास आवळला, कुस्तीच्या फडात नेमकं काय झालं बघा?

अरे बापरे! कचरा फेकायला गेलेल्या महिलेने बाळालाच डस्टबीनमध्ये फेकले, VIDEO पाहून व्हाल SHOCK

Trending Video : रस्त्याच्या मधोमध गाडी खराब झाल्यानं वधू लागली रडायला, मग पोलिसाने काय केलं ते तुम्हीच पाहा

Video | ‘मानिके मगे हिते’ गाण्याची क्रेझ, हवाई सुंदरीचा विमानात झक्कास डान्स, व्हिडीओ व्हायरल

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI