VIDEO : पिझ्झा पाहून बाळाने दिली लाखमोलाची Reaction, व्हिडीओ पाहून नेटकरीही खुश

लहान मुलांचे लडीवाळ अदा कोणाचही मन जिंकू शकतात. त्यांचे निरागस चेहरे पाहून आपोआपच आपल्या चेहऱ्यावर हसू उमटतं. असाच एक व्हिडीओ पाहून तुम्हालाही नक्कीच आनंद होईल.

VIDEO : पिझ्झा पाहून बाळाने दिली लाखमोलाची Reaction, व्हिडीओ पाहून नेटकरीही खुश

मुंबई: सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. यामध्ये लहान बाळांचे व्हिडीओ असतील तर त्यांना नेटकऱ्यांचे अधिक प्रेम मिळते. लहान बाळांच्या व्हिडीओजमध्ये सर्वात खास गोष्ट म्हणजे त्याचे Cute आणि निरागस असे Reaction असतात. मुलांच्या या लडीवाळ अदांना कॅमेऱ्यात कैद करुन अनेकजण त्याला मोबईल लॅपटॉप अशा ठिकाणी सेव्ह करुन ठेवतात.  असाच एक क्युट व्हिडीओ सध्या इंटरनेटवर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एक लहान बाळ पिझ्झा पाहून फारच खुश होताना दिसत आहे.

अनेकदा घरात जेव्हा बाहेरुन पिझ्झा सारखं खाद्य मागवलं जात तेव्हा घरातली बच्चे कंपनी फारच खुश होते. अगदी उड्याच मारु लागतात. पण अगदीच लहान बाळही जेव्हा पिझ्झा पाहून खुश होते, तेव्हा ते खरचं पाहण्यासारखे असते. तर या व्हिडीओमधील बाळही अगदी मस्त एक्सप्रेशन देत आहे. हे पाहून कोणाच्याही तोंडातूल, किती छान! किंवा ‘सो क्यूट.’ अशीच प्रतिक्रिया निघेल. व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओमध्ये लहान बाळाचे बाबा पिझ्झाचा बॉक्स उघडतात. त्यावेळी लहान बाळ अगदी खुश होऊन जातं. त्याची उत्सुकता आणि क्युट रिएक्शन अगदी पाहण्यासारखे आहेत…

नेटकरी व्हिडीओवर फिदा

हा भारी व्हिडीओ ट्विटरवर GoodNewsMovement नावाच्या पेजने अपलोड केला आहे. जो व्हिडीओ आतापर्यंत 9 हजार लोकांनी पाहिलाी आहे. पण या व्हिडीओला पाहणाऱ्यांची संख्या अधिकच वाढत आहे. अनेकांनी हा व्हिडीओ लाईक केला असून बरेचजण कमेंट देखील करत आहेत. यात अनेकांनी बाळाचे एक्सप्रेशन खूप क्यूट असल्याचं सांगितलं आहे. तर अनेकांनीहा व्हिडीओ पुन्हा पुन्हा पाहावासा वाटत आहे. असंही म्हटलं आहे.

इतर बातम्या :

VIDEO : 73 वर्षांच्या आजोबांची स्केटबोर्डवर धमाल!, व्हिडीओ पाहून व्हाल चकीत

Video | महिलेचा पुरुषासोबत धमाकेदार डान्स, पण मध्येच घडला भलता प्रकार, पाहा नेमकं काय झालं ?

Video | नवरी, नवरदेवासमोर तरुणाचा भन्नाट डान्स, व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली

(Viral video of babys cute reaction after seeing a pizza)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI