Video: महाकाय अजगर गळ्यात घालून महिलेचा स्टंट, नेटकरी म्हणाले, बाई जपून, अजगराचा भरवसा नाय!

व्हिडिओमध्ये आपण पाहू शकता की, तिच्या गळ्यात गुंडाळलेला अजगर किती प्रचंड आणि धोकादायक दिसत आहे. पण या बाई त्याला अजिबात घाबरत नाही. ती त्याच्याबरोबर अगदी शांतपणे खेळताना दिसते

Video: महाकाय अजगर गळ्यात घालून महिलेचा स्टंट, नेटकरी म्हणाले, बाई जपून, अजगराचा भरवसा नाय!
महाकाय अजगरासोबत खेळणारी महिला

साप लहान असो वा मोठा, तो पाहिल्यावर अनेकांची हवा टाईट होते. पण एक महिला गळ्याभोवती गुंडाळलेल्या अजगराशी खेळत आहे, जणू ते खेळणं आहे. या दरम्यान, अजगर या महिलेवर हल्ला देखील करत नाही. सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडिओ पाहिल्यानंतर कोणाच्याही हृदयाचे ठोके वाढू शकतात. हा अजगर किती प्रचंड आणि धोकादायक दिसतो हे तुम्ही पाहू शकता. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर सोशल मीडिया युजर्स आश्चर्यचकित झाले आहेत. काही लोकांनी म्हटले आहे की हा वेडेपणा आहे. (Viral Video of woman playing with giant python wrapped around her neck left netizens amazed)

व्हायरल झालेल्या व्हिडीओ क्लिपमध्ये, एका महिलेने अजगर गळ्यात गुंडाळलेला दिसत आहे. व्हिडिओमध्ये आपण पाहू शकता की, तिच्या गळ्यात गुंडाळलेला अजगर किती प्रचंड आणि धोकादायक दिसत आहे. पण या बाई त्याला अजिबात घाबरत नाही. ती त्याच्याबरोबर अगदी शांतपणे खेळताना दिसते. अजगराकडे बघून अंदाज लावला जाऊ शकतो की, तो किती जड असेल. तरीही ती महिला आरामात त्याला गळ्यात गुंडाळून कॅमेरामनशी बोलत आहे.

पाहा व्हिडीओ:

 

View this post on Instagram

 

A post shared by Royal Pythons (@royal_pythons_)

काही सेकंदांचा हा जबरदस्त व्हिडिओ इंस्टाग्रामवर royal_pythons_ नावाच्या खात्यावर शेअर करण्यात आला आहे. युजरने कॅप्शनमध्ये लिहिले आहे, हा अतिविशाल अजगर नाही. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर काही लोकांनी त्या महिलेला वेडं म्हटलं आहे, त्यामुळे बहुतेक युजर्सना अजगराचा रंग आवडत आहे. काही जण म्हणतात की, त्याला अजगराच्या काळ्या रंगापेक्षा त्याच्या शरीरावर चमकणारा इंद्रधनुषी रंग आवडला.

एका युजरने लिहिले, मी माझ्या आयुष्यात इतका सुंदर अजगर पाहिला नाही. किती छान रंग आहे हा. त्याच वेळी, दुसऱ्याने लिहिले, कोणत्याही सापाला हाताळण्याचं तुमचं तंत्र भन्नाट आहे. अनेकजण इमोजीजद्वारे आपल्या भावना व्यक्त करत आहेत.

हेही वाचा:

Video: घराबाहेर ठेवलेला भोपळा अस्वलाने खाल्ला, व्हिडीओ पाहून नेटकरी खूश

Video: 3 तोंडांच्या सापाचा फोटो पाहून नेटकरी घाबरले, पण खरं समजल्यावर विश्वास ठेवणं अवघड, पाहा निसर्गाचा अद्भूत चमत्कार

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI