AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Video: ‘गोवा वाले बीच पे जाऊ आपण फिक्स बे! महिना आखीर बिच में, पैशे नाहीत खिश्शे मे’

Goa Beach : गोवा ट्रीप प्लान केलेल्यांना हा व्हिडीओ अधिकच जवळचा वाटला, तर नवल वाटायला नको.

Video: 'गोवा वाले बीच पे जाऊ आपण फिक्स बे! महिना आखीर बिच में, पैशे नाहीत खिश्शे मे'
चला.. जायचं का गोव्याला?Image Credit source: TV9 Marathi
| Updated on: Jun 14, 2022 | 2:24 PM
Share

मुंबई : महिना अगदी मध्यावर आलाय. पगार जवळपास संपला असेल. काहीसाच उरला असेल. अशातच दुसरीकडे पावसालाही उधाण येतंय. अशात लोकांना समुद्र किनाऱ्याचे, खळखळणाऱ्या पाण्याचे वेध लागू लागले आहेत. काहींना लोणावळ्यातल्याच (Lonawala Rain) पावसात आनंद मिळतो. पण काहींना गोव्याला जायचा मोह आवरता येत नाही. अशात एका मित्राला गोव्याला (Goa trip) जायची हुक्की आली आणि त्याने मित्रांना गोव्याला सोबत नेण्यासाठी प्लॅन करताना एक भन्नाट मीमही बनवून टाकला. खरंतर गोव्याचे प्लॅन भल्याभल्यांचे यशस्वी होत नाही. लोकं प्लॅनिंग करतातत. गोव्याला जायचा व्हॉट्सअप ग्रूपही (WhatsApp) बनतो. पण प्लान काही सक्सेसफुल होत नाही. कुठंतरी काही तरी गडबडतं आणि प्लॅन गंडतोच. चार मित्र एकत्र येऊन गोव्याला जायला पिकनिकसाठी प्लॅन बनवतात. त्या प्लॅनवर चर्चा होते. फायनल ठरतंही ठरतही. पण महिन्याला पंधरा दिवस उरलेले असताना, खिशातही खडखडातच असतो. अशावेळी गोव्याला जायचा विचार कसा करायचा? गोव्याचा प्लॅन यशस्वी कसा करायचा? याचा एक भन्नाट किस्सा एका पोरानं सांगितला. भन्नाट मित्रांना हा भन्नाट व्हिडीओ सध्या सोशल मीडियात व्हायरल होतोय.

गोवा वाले बिच मे…

गोवा वाले बीच में… जाऊ आपण फिक्स बे.. असं म्हणत मित्रांना गोव्याला जाण्याचं प्लानिंग करणारे काही मस्तीखोर मित्र एकत्र आले. एका मित्र गोव्याला जाऊया असं म्हणाला खरा. पण जायचं कसं? खिशात पैसेच नाही, असा प्रश्नही त्यांना पडलंय. महिन्याचे पंधरा दिवस उलटल्यानंतर असंही फार लोकांच्या खिशात पैसे नसतातच. उरलेला महिना कसा बसा काढायचा, याचीच चिंता सतावत असते. पण या सगळ्यातही पोरांनी हार मानली नाही. आपल्या मित्रांना कनविन्स करण्यासाठी त्याने जे उपाय सांगितले ते एकापेक्षा एक आहेत.

पाहा व्हिडीओ :

कॉमेडी कॅप्टन 88 या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला. अनेकांना या व्हिडीओ हसू आवरलं नाही. पण मित्रांना गोव्याला घेऊन जाण्यासाठी स्वतःची गाडी आणि मोबाईल भाड्याने ठेवणारा असा मित्र तुम्हाला मिळो आणि तुमचीही गोवा ट्रीप सफल होवो.

98 हजारपेक्षा जास्त लोकांनी हा व्हिडीओ लाईव्ह केला असून लाख इन्स्टाग्राम युजर्स हा व्हिडीओ पाहून झालेत. गोवा ट्रीप प्लान केलेल्यांना हा व्हिडीओ अधिकच जवळचा वाटला, तर नवल वाटायला नको.

दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी
दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी.
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?.
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट..
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष....
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?.
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्..
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्...
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त.
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज.
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली.
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार.