Viral Video: केवळ 52 इंचाची दोन मजली इमारत! आतुन कशी असणार? पाहा एकदा
Viral Video: इंस्टाग्राम अकाउंट @adityaseries01 वरून शेअर झालेल्या 52 इंचाच्या घराचा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप खळबळ माजवत आहे. दोन दिवसांत या व्हिडीओला 1 कोटी वेळा पाहिले गेले आहे. लोक हे पाहून हादरले आहेत की इतक्या कमी जागेतही घरातील सर्व सुख-सुविधा उपलब्ध आहेत.

सध्या सोशल मीडियावर 52 इंचाच्या एका दोन मजली घराचा (52 इंच हाऊस) व्हिडीओ खूप चर्चेत आहे. या अनोख्या घराच्या होम टूरचा व्हिडीओ बिहारमधील एका कंटेंट क्रिएटर आदित्यने आपल्या इंस्टाग्राम अकाउंट @adityaseries01 वर शेअर केला आहे. हा व्हिडीओपाहून नेटकरी थक्का झाले आहेत. लोक हे पाहून आश्चर्यचकित झाले आहेत की इतक्या कमी जागेतही घरातील सर्व सुख-सुविधा आहेत.
व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की घर इतके अरुंद आहे की दरवाजा उघडताच कंटेंट क्रिएटर आपले हातही नीट पसरू शकत नाही. पण, इतक्या लहान घरातही सर्व आवश्यक वस्तू आहेत.
वाचा: त्याने पोलिसांनासुद्धा गंडवलं; ‘देवमाणूस’मधील अभिनेत्रीची झाली फसवणूक, वाचा नेमकं काय झालं?
View this post on Instagram
कसे आहे आतुन नेमकं घर?
व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की आत जाताच समोर एक लहानसे देवघर आहे. त्याच्या शेजारीच तीन फूट रुंद बेड आहे, ज्यावर घरातील लोक झोपतात. त्यानंतर एक व्यवस्थित स्वयंपाकघर आहे, ज्यात प्रत्येक गोष्टीसाठी शेल्फ बनवलेली आहे आणि भांडी भिंतीवर योग्य पद्धतीने लावून ठेवली आहेत. या घरात वॉशरूम आणि बाथरूम वेगळे आहेत. सर्वात खास गोष्ट ही आहे की या दोन मजली घरात वर जाण्यासाठी शिढ्या देखील बनवलेल्या आहेत. मात्र, त्या इतक्या अरुंद आहेत की एका वेळी फक्त एकच व्यक्ती वर किंवा खाली जाऊ शकते. कंटेंट क्रिएटरनुसार, हे घर 50 फूट लांब आणि 4 फूट 4 इंच रुंद आहे.
1 कोटी लोकांनी पाहिला हा व्हिडीओ
दोन दिवसात या व्हिडीओला 1 कोटीपेक्षा जास्तवेळा पाहिला गेला आहे. त्यामुळे हा व्हिडीओ किती लोकप्रिय झाला आहे याचा अंदाज लावता येऊ शकतो. तसेच व्हिडीओला 1 लाख 77 हजारपेक्षा जास्त लोकांनी लाइक केले आहे. व्हिडीओ पाहिल्यानंतर नेटिझन्स विविध प्रकारच्या प्रतिक्रिया देत आहेत. एका युजरने लिहिले की, “मला तर पाहताच श्वास घेणे कठीण झाले. व्हेंटिलेशनसुद्धा नाही. मी तिथे राहण्याची कल्पनाही करू शकत नाही.” दुसऱ्या युजरने म्हटले, “जसेही आहे, पण आपले तरी आहे.” एका युजरने मजेशीर पद्धतीने लिहिले, “सर्वकाही आहे, पण ऑक्सिजनची कमतरता आहे.” तर, आणखी एका युजरने हृदयस्पर्शी कमेंट केले, “गरीब माणसाचे स्वतःचे घर बनले तरी ते मोठी गोष्ट आहे. ते किती मोठे किंवा किती लहान आहे, याचा काही फरक पडत नाही.”
