AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Video: चॉकलेट आणि मसाला लावलेलं मक्याचं कणीस, दिल्लीतील विचित्र स्ट्रीट फूड पाहून नेटकरी भडकले!

एका स्ट्रीट फूड विक्रेत्याने स्वीट कॉर्नचा समावेश असलेली एक विचित्र रेसिपी तयार केली आणि त्यामुळे नेटिझन्सची निराशा झाली. हा व्हिडिओ फूड व्लॉगर अनिकेत लुथराने त्याच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.

Video: चॉकलेट आणि मसाला लावलेलं मक्याचं कणीस, दिल्लीतील विचित्र स्ट्रीट फूड पाहून नेटकरी भडकले!
चॉकलेट मसाला स्वीट कॉर्न
| Edited By: | Updated on: Nov 18, 2021 | 6:06 PM
Share

सोशल मीडियावर विचित्र गोष्टींची कमतरता नाही. सोशल मीडियावर फूडचे अनेक कॉम्बिनेशन्स पाहायला मिळतात, ज्यांचे फोटो आणि व्हिडिओ वेगाने व्हायरल होत आहेत. तुम्ही जर खाद्यपदार्थाचे शौकीन असाल, तर आम्हांला खात्री आहे की तुम्हीही त्याबद्दल थोडेसे उत्सुक असाल, जो व्हिडिओ आता व्हायरल होत आहे. पण आधी तुम्हाला सांगतो की काही काळापूर्वी एक व्हिडिओ व्हायरल झाला होता, ज्यामध्ये एका व्यक्तीने शेव, दही आणि चटणीसोबत रसगुल्ला चाट बनवला होता? बरं, आता समोर आलेल्या व्हिडिओमध्ये एक दुकानदार स्वीट कॉर्नवर चॉकलेट आणि मसाले घालताना दिसत आहे. आता त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. (Weird Street Food in Delhi that vendor makes sweet corn with chocolate and masala in viral video)

तुम्ही सर्वांनी थोडे बटर, मीठ आणि चिमूटभर चिली फ्लेक्स असलेले स्वीट कॉर्न पाहिले असेलच. हा स्वादिष्ट नाश्ता सर्वांनाच आवडतो. पण एका स्ट्रीट फूड विक्रेत्याने स्वीट कॉर्नचा समावेश असलेली एक विचित्र रेसिपी तयार केली आणि त्यामुळे नेटिझन्सची निराशा झाली. हा व्हिडिओ फूड व्लॉगर अनिकेत लुथराने त्याच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.

व्हिडीओ पाहा:

व्हिडीओमध्ये असे दाखवण्यात आले आहे की, विक्रेता वाफवलेलं कणीस घेऊन त्यावर लोणी लावत आहे. मग तो मोठ्या प्रमाणात चॉकलेट सिरप आणि मलई ओततो. ते अजून संपलेले नाही! दुकानदारही त्यावर काही मसाले आणि लिंबू टाकतो. कॅप्शननुसार, स्ट्रीट स्टॉल पूर्व दिल्लीमध्ये आहे. होय, हे वाचून तुम्हाला थोडं विचित्र वाटलं असेल, पण हे खरं आहे. आतापर्यंत या व्हिडिओला लाखो लाईक्स आणि हजारो कमेंट्स पाहायला मिळत आहेत. हा व्हिडिओ काही लोकांची खूप निराशा करत आहे, तर काही लोक या डिशची टेस्ट घेण्यासाठी उत्सुक आहेत. या व्हिडीओने सोशल मीडिया यूजर्सना खूप आश्चर्यचकित केले आहे.

व्हिडिओवर एका युजरने लिहिले, ‘कोण असं कॉर्न चॉकलेटसोबत मसाला खातं’ दुसऱ्या यूजरने लिहिले, ‘एकदा खायला हरकत नाही,’ अजून एकाने लिहिले, ‘इतका विचित्र कॉम्बो कोण ठेवतो’, व्हिडिओच्या कमेंट विभागात बरेच इमोजी देखील दिसत आहेत.

हेही पाहा:

Viral: डोंगरकड्याच्या शेवटी बसून फोटो काढण्याचं वेड, दरीची खोली पाहून नेटकऱ्यांचा अंगावर काटा

Video: छोटु चिंपांझीचं मुलांवर प्रेम, प्रत्येकाला कडकडून मिठी, व्हिडीओ पाहून नेटकरी अवाक!

चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला...
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला....
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर.
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती.
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ.
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?.
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.