Video | परफेक्ट टायमिंग, परफेक्ट स्टंट, महिलेचा व्हिडीओ पाहून तुम्हीही म्हणाल ‘तुस्सी बडे ग्रेट हो’

सुरुवातीला माणूस महिलेच्या खांद्यांवर चढला आहे. त्यानंतर त्याने मुलालासुद्धा वर घेतले आहे. एका महिलेने एवढे सारे ओझे सांभाळल्यामुळे नेटकरी थक्क झाले आहेत.

Video | परफेक्ट टायमिंग, परफेक्ट स्टंट, महिलेचा व्हिडीओ पाहून तुम्हीही म्हणाल 'तुस्सी बडे ग्रेट हो'
stunt viral video

मुंबई : या जगात आपल्याला एकापेक्षा एक कलाकार व्यक्ती मिळतील. कोणत्या व्यक्तीमध्ये कोणती कला दडलेली असेल हे सांगता येत नाही. लोकांच्या या भन्नाट कलाकारीचे अनेक व्हिडीओ सोसल मिडीयावर व्हायरल होतात. यातील काही कलाकारांना तर सोशल मीडियाच्या जोरावर मोठी प्रसिद्धी मिळते. सध्या व्हायरल होत असलेला व्हिडीओ तर अगदीच खास आहे. या व्हिडीओमध्ये एका महिलेने अचाट कामगिरी करुन दाखवली आहे. तिने दाखवलेल्या कसरती पाहून नेटकरी थक्क झाले आहेत. (women showing amazing stunts with man and children video went viral on social media)

माणूस महिलेच्या खांद्यावर चढला

व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये एक महिला आणि एक माणूस असे दोघे उभे आहेत. ते काहीतरी ट्रिक करुण दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत. सुरुवातीला माणूस महिलेच्या खांद्यांवर चढला आहे. त्यानंतर त्याने मुलालासुद्धा वर घेतले आहे. एका महिलेने एवढे सारे ओझे सांभाळल्यामुळे नेटकरी थक्क झाले आहेत.

चार जणांना सांभाळत महिलेची कसरत

ही महिला एवढ्यावरच थांबलेली नाही. तर तिने पुन्हा आणखी दोन मुलांना बोलावले आहे. दोन मुलांना बोलावून त्यांनासुद्धा या महिलेने तसेच माणसाने वर उचलले आहे. म्हणजेच व्हिडीओतील महिलेने एकूण चार जणांचे ओझे उचलले आहे. तसेच या चारही जणांचे ओझे सांभाळून ही महिला कसरती करत आहे. ही महिला त्यांना घेऊन गोल फिरत आहे.

पाहा व्हिडीओ :

व्हिडीओ पाहून लोकांच्या भन्नाट कमेंट्स

हा व्हिडीओ पाहून नेटकरी थक्क झाले आहेत. काही नेटकऱ्यांनी महिलेच्या या धाडसाची दाद दिली आहे. तर काही लोकांना व्हिडीओमधील कसरती चांगल्याच आवडल्या आहेत. महिलेने साधलेला समतोल पाहून अनेकांनी उत्स्फूर्तपणे कमेंट्स केल्या आहेत. व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ नेमका कुठला आहे, याची माहिती मिळू शकलेली नाही. मात्र त्याला ‘@Ffs_OMG’ या ट्विटर अकाऊंटवर शेअर करण्यात आले आहे.

इतर बातम्या :

VIDEO : आज हम लोग मस्ती करेगाssss, दहीहंडीतील गंमती जमती, तुफान हसवणारा व्हिडीओ

Video | भर रस्त्यात राग अनावर, म्हाताऱ्या आजोबांचा तुफान राडा, व्हिडीओ व्हायरल

VIDEO: अमेरिकन डान्सर पत्नीसोबत बॉलीवूडच्या ‘छम्मक छल्लो’ गाण्यावर थिरकतो तेव्हा….

(women showing amazing stunts with man and children video went viral on social media)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI