भारतातील एक गाव जेथून दिसते Milkyway आकाशगंगा, आकाशातील तारे मोजायला चला

मुंबई सारख्या महानगरातील प्रकाशाच्या प्रदुषणाने आपल्या शहरवासियांना आकाशातील तारे कधी दिसतच नाहीत. त्यामुळे आपण गावाला जेव्हा जातो तेव्हाच आकाशातील लुकलुकणारे तारे आपल्याला खुणावतात. भारतात एक गाव आहे जेथे आपली आकाशगंगा Milkyway जवळ आल्यासारखी भासते....चला तर कोणते ते गाव पाहुयात

भारतातील एक गाव जेथून दिसते Milkyway आकाशगंगा, आकाशातील तारे मोजायला चला
milkyway आकाशगंगा Image Credit source: TV9MARATHI
Follow us
| Updated on: Jun 17, 2024 | 10:42 PM

मुंबई, दिल्ली किंवा चेन्नईसारख्या महानगरातील वाढत्या प्रकाशानंतर आकाशातील तारे दिसतच नाहीत. आता मान्सून सुरु झाल्याने मुंबईकरांना ढगांमुळे आकाश दिसत नाही. तरीही पावसाळ्यानंतर हिवाळ्यात वांगणी येथे ‘आकाश दर्शन’ अशी बातमी वाचायला मिळत असते. परंतू देशातील एक गाव असे आहे. जेथे आपल्याला आपली आकाश गंगा Milkyway दिसते. आपली आकाशगंगा पाहण्यासाठी येथे पर्यटक जमतात. वाढत्या प्रकाश प्रदुषणाने महानगरातील नागरिकांना तारकांचा आनंद घेता येत नाही. या गावाला जगातील सर्वात उंच गाव म्हटले जाते. चला तर गावात आपल्या आकाशगंगेतील ताऱ्यांना पाहण्यासाठी या गावात…

जगातील सर्वात उंच गाव

आपला भारत इतका विशाल आहे की येथे एकाच देशात अनेक प्रकारचे हवामान आणि भौगोलिक रचना पाहायला मिळत असते. हिमाचल प्रदेशातील स्पिती जिल्ह्यात हे गाव आहे. या गावाला जगातील सर्वात उंच गाव म्हटले जाते. या गावाचे नाव कौमिक गाव… येथे आपल्या नुसत्या उघड्या डोळ्यांनी आपली आकाशगंगा पाहायला मिळते. कोणत्याही दुर्बिणीची गरज नसते. रात्रीच्या अंधारात तारे असे चमकतात आपण विश्वास ठेवू शकणार नाही. याचा अनुभव पाहायला या गावात जायलाच हवे…कौमिक गाव समुद्रसपाटीपासून सुमारे 15,027 फूट उंचीवर वसलेले आहे, जिथे मोटर बाइकने सहज जाता येते. यामुळेच या गावात पर्यटकांचा डेरा असतो.

जून महिन्यात हाडे गोठविणारी थंडी

जगातील सर्वात उंच गावात जून महिन्यात देखील हाडे गोठविणारी थंडी असते. जगातील सर्वात उंचावरील गावात जून महिन्यातील तापमान 7 ते 9 डिग्री सेल्सियसपर्यंत खाली उतरलेले असते. या गावातील लोकसंख्या खूप कमी आहे. येथे खूपच कमी वस्ती आहे. थंडीत ही घरे देखील रिकामी असतात. कारण एवढ्या थंडीत गावात राहाणे शक्य नसते. हिवाळ्यात गावकरी पायथ्याशी असलेल्या घरांमध्ये जातात. थंडी गेली की पुन्हा ते आपल्या गावातील मूळ घरात येतात. कौमिक गावाची आशियातील नव्हे तर जगातील सर्वात उंच गावात गणना होते. येथे अनेक आकर्षक निसर्ग आणि स्थळे आहेत. अनेक मठ आहेत. तेथून या स्थळांचे सौंदर्य न्याहाळता येते.

Non Stop LIVE Update
शिंदेंच्या शिवसेनेचे उमेदवार आजच होणार जाहीर, संजय शिरसाट म्हणाले...
शिंदेंच्या शिवसेनेचे उमेदवार आजच होणार जाहीर, संजय शिरसाट म्हणाले....
शरद पवारांच्या NCPकडून एबी फॉर्मचं वाटप सुरू, 3 जणांची उमेदवारी फिक्स
शरद पवारांच्या NCPकडून एबी फॉर्मचं वाटप सुरू, 3 जणांची उमेदवारी फिक्स.
झिशान सिद्दीकी वांद्रे पूर्व मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात
झिशान सिद्दीकी वांद्रे पूर्व मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात.
'राऊतांना झोपताना झाडं अन् उठताना डोंगर...', शहाजी बापूंचं प्रत्युत्तर
'राऊतांना झोपताना झाडं अन् उठताना डोंगर...', शहाजी बापूंचं प्रत्युत्तर.
उन्मेष पाटलांना उमेदवारी, ठाकरे गटाकडून होणार अधिकृत घोषणा?
उन्मेष पाटलांना उमेदवारी, ठाकरे गटाकडून होणार अधिकृत घोषणा?.
अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या 'या' नेत्यानं घेतली ठाकरेंची 'मशाल' हाती
अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या 'या' नेत्यानं घेतली ठाकरेंची 'मशाल' हाती.
अमोल मिटकरींना उमेदवारी मिळणार की नाही?, अजितदादांनी तडकाफडकी बोलावलं
अमोल मिटकरींना उमेदवारी मिळणार की नाही?, अजितदादांनी तडकाफडकी बोलावलं.
'भाई को उडा देंगे, 5 करोड दे दो..', म्हणणारा आता म्हणतो, सलमान भाईजान
'भाई को उडा देंगे, 5 करोड दे दो..', म्हणणारा आता म्हणतो, सलमान भाईजान.
'ते 5 कोटी शहाजी बापूंचे? एकच गाडी सापडली अशा..',रोहित पवारांचा निशाणा
'ते 5 कोटी शहाजी बापूंचे? एकच गाडी सापडली अशा..',रोहित पवारांचा निशाणा.
'भाजपच्या यादीत धक्कातंत्र नव्हतं पण आमची यादी...', कोणाचा गौप्यस्फोट?
'भाजपच्या यादीत धक्कातंत्र नव्हतं पण आमची यादी...', कोणाचा गौप्यस्फोट?.