VIDEO : हा मुलगा हातापायाची, अंगाची कशीही घडी करतो, व्हिडीओ बघितला तर आश्चर्यचकीत व्हाल

जगभरात अतरंगी लोकांची कमी नाही. प्रत्येकात देवाने काहीना काही वेगळं कौशल्य दिलं आहे (African Youth Viral Video)

VIDEO : हा मुलगा हातापायाची, अंगाची कशीही घडी करतो, व्हिडीओ बघितला तर आश्चर्यचकीत व्हाल
हा मुलगा हातापायाची, अंगाची कशीही घडी करतो, आफ्रिकेचा बाबा रामदेव बघा

मुंबई : जगभरात अतरंगी लोकांची कमी नाही. प्रत्येकात देवाने काहीना काही वेगळं कौशल्य दिलं आहे. फक्त त्या कौशल्याची जाणीव होणं जास्त जरुरीचं आहे. तसेत ते कौशल्य समजल्यावर त्यासाठी मेहनत करणं देखील गरजेचं आहे. योग्य मेहनत केली तर त्याचं शंभर टक्के फळ मिळतं. आपल्या कलेची, कौशल्याचं जग दखल घेतं. या संबंधित अनेक अतरंगी लोकांचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. तसाच काहीसा व्हिडीओ एक आफ्रिकेच्या अतरंगी कलाकाराचा व्हायरल होतोय. हा व्हिडीओ बघितल्यावर तुम्हालाही आश्चर्याचा धक्का बसेल (African Youth Viral Video).

व्हायरल होणाऱ्या व्हिडीओत नेमकं काय ?

संबंधित व्हिडीओ हा आफ्रिकेतला आहे. व्हिडीओतला मुलगा सर्वात आधी तो आपला उजवा पाय उचलतो. त्यानंतर तो त्या उजव्या पाचायी सहज घडी करतो. त्या घडी केलेल्या पायाला चार दिशेने फिरवतो. त्यानंतर तो हातांची कसरत सुरु करतो. पाठीमागी हातांचीस घडी करुन दाखवतो. नंतर तो एका हाताने पाठ खाजवतो (African Youth Viral Video).

त्यानंतर तो पोट मागे घेतो. हे पोट तो इतकं मागे घेतो की त्याच्या छातीच्या बरगड्या दिसायला लागतात. त्यानंतर तो हात आणि पायांची एकत्र कसरत करतो. नंतर तो खाली बसून पायाने डोक्यावरची टोपी काढतो. टोपीने तोंडाला हवा मारतो. त्यानंतर पायानेच ती टोपी डोक्यावर ठेवतो. यावेळी तो जणू काही योगासनेच करतोय, असं वाटतं.

आयपीएस अधिकाऱ्याकडून व्हिडीओ शेअर

आयपीएस अधिकारी रुपीन शर्मा यांनी हा व्हिडीओ त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर शेअर केला आहे. यावेळी त्यांनी तरुणाच्या लवचिकतेचं कौतुक केलं आहे. तसेच आफ्रिकेचा बाबा रामदेव, असं कॅप्शन त्यांनी व्हिडीओला दिलं आहे.

व्हिडीओ बघून लोकांकडून मुलाचे कौतुक

संबंधित व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय. या व्हिडीओला लोकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. या व्हिडीओवर अनेकांनी प्रतिक्रिया दिली आहे. व्हिडीओतील तरुणाच्या लवचिकतेचं लोक खरंच कौतुक करत आहेत.

व्हिडीओ बघा:

हेही वाचा : ‘सोनम गुप्ता बेवफा’नंतर आता ‘पुष्पाच्या प्रेमपत्रा’ची चर्चा, म्हणते “दीपूजी मला पळवून न्या”

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI