AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

एक ऑर्डर पोहोचवण्यासाठी Zepto-Blinkit च्या डिलिव्हरी बॉयला किती पैसे मिळतात?

मोबाइलवर एका क्लिकद्वारे आपण घरातील हवं ते सामान मागवू शकतो. अवघ्या काही मिनिटांत डिलिव्हरी बॉय आपल्याला ते घरपोच आणून देतो. पण यासाठी त्यांना किती रुपये मिळतात, हे तुम्हाला माहीत आहे का?

एक ऑर्डर पोहोचवण्यासाठी Zepto-Blinkit च्या डिलिव्हरी बॉयला किती पैसे मिळतात?
delivery boyImage Credit source: Instagram
| Updated on: Mar 21, 2025 | 8:16 AM
Share

हल्ली आपण ऑनलाइन ग्रॉसरी ॲपच्या माध्यमातून काही मिनिटांमध्ये घरातील सामान मागवू शकतो. यासाठी कुठल्याही किराणा मालाच्या दुकानात जायची गरज नाही, किंवा घरातून बाहेर पडण्याचीही गरज नाही. झेप्टो, ब्लिंकिंट यांसारख्या ॲपच्या माध्यमातून आपण एका क्लिकवर हवं ते सामान घरपोच मागवू शकतो. मग अगदी घरातील कांदे-बटाटे संपलेले असो किंवा मसाला संपलेला असो.. ऐनवेळी बाजारात कुठे जायचं, असा प्रश्न हल्ली लोकांना पडत नाही. कारण अशा विविध वस्तू ग्रॉसरी ॲप्सच्या माध्यमातून एका झटक्यात मागवले जाऊ शकतात. ऑर्डर केल्यानंतर जेव्हा डिलिव्हरी बॉय दरवाज्यावर येऊन उभा राहतो, तेव्हा अनेकदा लोकांच्या मनात प्रश्न येत असेल की, आपण इतक्या रुपयांची ऑर्डर दिली, त्यात इतका डिलिव्हरी चार्ज लागला, जीएसटीसुद्धा दिलं, मग यातनं डिलिव्हरी बॉयला किती पैसे मिळाले?

सहा महिन्यांपासून ग्रॉसरी डिलिव्हरीचं काम करणाऱ्या शिवम पांडेनं डिलिव्हरी बॉयच्या कमाईबद्दलची माहिती दिली आहे. “आम्ही दररोज 35 ते 40 राइड करतो. हा आकडा कमी किंवा जास्तसुद्धा असू शकतो. एक किलोमीटरपर्यंत राइड केल्यास डिलिव्हरी बॉयच्या खातत्यात 10 ते 15 रुपये येतात. काही वेळा ही रक्कम वाढते तर काही वेळा ती कमीसुद्धा केली जाते. तुम्ही सरासरीचा विचार केला तर एक किलोमीटरपर्यंत रायडरला 9 रुपये मिळतात. ग्राहकाने जरी 50 रुपयांची ऑर्डर दिली किंवा 500 रुपयांची, डिलिव्हरी बॉयला किलोमीटरच्या हिशोबानेच पैसे मिळतात”, असं झेप्टो आणि ब्लिंकिटमध्ये काम करणाऱ्या शिवमने सांगितलं.

डिलिव्हरी बॉयने पुढे सांगितलं की त्यांची एकूण कमाई ही फक्त आणि फक्त ऑर्डर डिलिव्हरी करण्यावरच अवलंबून असते. ते जितके जास्त ऑर्डर डिलिव्हरी करतात, तेवढी त्यांची कमाई जास्त होते. सण-उत्सवाच्या वेळीही डिलिव्हरी बॉयला कोणत्याही प्रकारचा बोनस मिळत नाही. त्यामुळे त्याला आपल्या कामाच्या माध्यमातूनच कमाई करावी लागते. परंतु सणावाराच्या दिवशी इतर दिवसांपेक्षा अधिक ऑर्डर्स असल्याने त्यातून अधिकची कमाई होते. परंतु कंपनीकडून कोणती भेट किंवा बोनस मिळत नाही.

मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.