AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

1 September : आधार ते गॅस सिलेंडर, उद्यापासून बदलणार हे 7 नियम

१ सप्टेंबरपासून आधार कार्ड, क्रेडिट कार्ड, एलपीजी सिलिंडर आणि एफडीशी संबंधित ७ नियमांमध्ये बदल होणार आहेत, ज्याचा थेट परिणाम तुमच्या खिशावर होणार आहे. काय आहेत ते सात बदल जाणून घ्या.

1 September : आधार ते गॅस सिलेंडर, उद्यापासून बदलणार हे 7 नियम
shailesh musale
shailesh musale | Updated on: Aug 31, 2024 | 5:46 PM
Share

प्रत्येक महिन्या 1 तारखेपासून काही नियम किंवा गोष्टी बदलत असतात. नवीन गोष्ट लागू करण्यासाठी शक्यता एक तारीखच निवडली जाते. आता १ सप्टेंबर महिन्यातही अनेक मोठे बदल होणार आहेत. ज्याचा परिणाम तुमच्या खिशावर होणार आहे. आधार कार्ड, क्रेडिट कार्ड, एलपीजी सिलेंडर किंवा एफडी असो. प्रत्येकाचे नियम बदलणार आहेत. ज्याचा परिणाम थेट तुमच्यावर होणार आहे. सरकार केंद्रीय कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता (डीए वाढ) देखील देऊ शकते.१ तारखेपासून काय काय बदलणार आहे जाणून घ्या.

1- एलपीजी सिलेंडरच्या किमतीत बदल होणार

एलपीजी सिलिंडरच्या दरात दर महिन्याला बदल होत असतात. कधी तेल कंपन्या किंमत वाढवतात तर कधी कमी करतात. अशा परिस्थितीत यावेळीही एलपीजीच्या किमतीत बदल होऊ शकतो. गेल्या महिन्यात व्यावसायिक एलपीजी गॅस सिलिंडरची किंमत 8.50 रुपयांनी वाढली होती, तर जुलैमध्ये त्याची किंमत 30 रुपयांनी कमी झाली होती.

2- बनावट कॉलशी संबंधित नियम

उद्यापासून फेक कॉल्स आणि मेसेजवर नियंत्रण ठेवता येणार आहे. यासाठी ट्रायने टेलिकॉम कंपन्यांना असे कॉल्स आणि फेक मेसेजेसवर नियंत्रण ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. ट्रायने याबाबत कठोर मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. TRAI ने Jio, Airtel, Vodafone, Idea, BSNL यांसारख्या दूरसंचार कंपन्यांना 30 सप्टेंबरपर्यंत टेलिमार्केटिंग कॉल्स आणि 140 मोबाइल नंबर सीरिजपासून सुरू होणारे व्यावसायिक मेसेजिंग ब्लॉकचेन आधारित DLT म्हणजेच डिस्ट्रिब्युटेड लेजर टेक्नॉलॉजी प्लॅटफॉर्मवर शिफ्ट करण्यास सांगितले आहे.

3- ATF आणि CNG-PNG चे दर बदलणार

एलपीजी सिलिंडरबरोबरच, हवाई इंधन म्हणजेच एअर टर्बाइन इंधन (एटीएफ) आणि सीएनजी-पीएनजीच्या किमतीही तेल बाजारातील कंपन्या दर महिन्याला बदलतात.

4- क्रेडिट कार्डच्या नियमांमध्ये बदल

HDFC बँकेने युटिलिटी व्यवहारांवर रिवॉर्ड पॉइंट्सची मर्यादा निश्चित केली आहे, हा नियम 1 सप्टेंबरपासून म्हणजेच उद्यापासून लागू होईल. या अंतर्गत, ग्राहकांना या व्यवहारांवर दरमहा केवळ 2,000 पॉइंट मिळू शकतात. थर्ड पार्टी ॲपद्वारे पेमेंट केल्यास HDFC बँक कोणतेही बक्षीस देणार नाही.

IDFC फर्स्ट बँक सप्टेंबर 2024 पासून क्रेडिट कार्डवर देय असलेली किमान रक्कम कमी करणार आहे. पेमेंटची तारीख देखील 18 वरून 15 दिवसांपर्यंत कमी केली जाऊ शकते. याशिवाय, 1 सप्टेंबर 2024 पासून, UPI आणि इतर प्लॅटफॉर्मवर पेमेंटसाठी RuPay क्रेडिट कार्ड वापरणाऱ्या ग्राहकांना इतर पेमेंट सेवा प्रदात्यांचे क्रेडिट कार्ड वापरणाऱ्या ग्राहकांप्रमाणेच रिवॉर्ड पॉइंट्स मिळतील.

5- महागाई भत्त्यात वाढ होणार

केंद्र सरकार सप्टेंबरमध्ये कर्मचाऱ्यांसाठी मोठी घोषणा करू शकते. सरकार कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात ३ टक्क्यांनी वाढ करेल अशी अपेक्षा आहे. सध्या सरकारी कर्मचाऱ्यांना 50 टक्के महागाई भत्ता (DA) दिला जात आहे, तर 3 टक्क्यांच्या वाढीनंतर तो 53 टक्के होईल.

6- मोफत आधार अपडेट

मोफत आधार कार्ड अपडेट करण्याची अंतिम तारीख १४ सप्टेंबर निश्चित करण्यात आली आहे. यानंतर, तुम्ही आधारशी संबंधित काही गोष्टी मोफत अपडेट करू शकणार नाही. 14 सप्टेंबरनंतर आधार अपडेट करण्यासाठी शुल्क भरावे लागणार आहे. यापूर्वी मोफत आधार अपडेटची अंतिम तारीख 14 जून 2024 होती, ती 14 सप्टेंबर 2024 पर्यंत वाढवण्यात आली होती.

7- विशेष FD मध्ये गुंतवणुकीशी संबंधित नियम

IDBI बँकेने 300 दिवस, 375 दिवस आणि 444 दिवसांच्या विशेष एफडीची मुदत 30 जून ते 30 सप्टेंबरपर्यंत वाढवली आहे. इंडियन बँकेने 300 दिवसांच्या विशेष एफडीची मुदत 30 सप्टेंबरपर्यंत वाढवली आहे. तर पंजाब आणि सिंध बँकेच्या विशेष एफडीची अंतिम मुदत ३० सप्टेंबर आहे. एसबीआय अमृत कलश स्पेशल एफडी योजनेची अंतिम मुदतही ३० सप्टेंबर ठेवण्यात आली आहे. म्हणजेच सप्टेंबरनंतर या एफडी योजनांमध्ये कोणतीही गुंतवणूक होणार नाही.

Follow Us
साहेब आता निर्णय घ्या... नाराज समर्थकांचं भुजबळांकडे साकडं, राज्यसभा..
साहेब आता निर्णय घ्या... नाराज समर्थकांचं भुजबळांकडे साकडं, राज्यसभा उमेदवारीमुळे थेट विनंती; काय घडतंय?
दोन्ही राष्ट्रवादीचं विलिनीकरण आता... बड्या नेत्याचं सुचक विधान चर्चेत
दोन्ही राष्ट्रवादीचं विलिनीकरण आता... बड्या नेत्याचं सुचक विधान चर्चेत, नेमकं काय म्हणाले?
इंडिया आघाडीत कोणकोणत्या मुद्द्यांवर चर्चा, ठाकरेंनी काय भूमिका मांडली
इंडिया आघाडीत कोणकोणत्या मुद्द्यांवर चर्चा, ठाकरेंनी काय भूमिका मांडली? राऊतांनी A टू Z सांगितलं!
मोठी बातमी! पक्षातून हकालपट्टीची होताच मिसाळेंची पहिली प्रतिक्रिया,
मोठी बातमी! पक्षातून हकालपट्टीची होताच मिसाळेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले माझा फोन हॅक...
मोठी बातमी! सरकारी ऑफिसात महिला कर्मचाऱ्याचा छळ, बावनकुळेंनी लगेच फोन
मोठी बातमी! सरकारी ऑफिसात महिला कर्मचाऱ्याचा छळ, बावनकुळेंनी लगेच फोन फिरवला, त्या प्रकरणाची गंभीर दखल!
9 लाखांची दारू, 2 हुक्का अन् गांजा, पुण्यातील रेव्ह पार्टीचं हादरवणारं
9 लाखांची दारू, 2 हुक्का अन् गांजा, पुण्यातील रेव्ह पार्टीचं हादरवणारं सत्य;  डिजेच्या तालावर...
मोठी बातमी | जळगाव MIDC मध्ये भीषण आग! कुलर कंपनी धुराच्या लोटात
मोठी बातमी | जळगाव MIDC मध्ये भीषण आग! कुलर कंपनीत धुराचे लोट, मोठी दुर्घटना टळली
अचानक रुग्णालयात पोहोचल्या सुनेत्रा पवार; कर्मचाऱ्यांची घेतली खरडपट्टी
Dcm Sunetra Pawar | मोबाईलमध्ये व्यस्त, कामात हलगर्जीपणा! अचानक रुग्णालयात पोहोचल्या सुनेत्रा पवार; कर्मचाऱ्यांची घेतली खरडपट्टी
राष्ट्रवादीचा मोठा निर्णय, किशोर मिशाळ यांची हकालपट्टी, अजितदादांवर...
राष्ट्रवादीचा मोठा निर्णय, किशोर मिशाळ यांची हकालपट्टी, अजितदादांवर विधान करणं भोवलं!
36 हजार कोटींच्या कर्जमाफीचा मार्ग मोकळा कृषी मंत्र्यांकडून मोठी घोषणा
Datta Bharne | 56 लाख शेतकऱ्यांसाठी मोठी खुशखबर! 36 हजार कोटींच्या कर्जमाफीचा मार्ग मोकळा? कृषी मंत्र्यांकडून मोठी घोषणा