देशभरातील निष्क्रिय खात्यांमध्ये तब्बल 26,697 कोटी रुपये पडून; ‘अशी’ काढता येते रक्कम

अर्थमंत्री निर्मला सितारमण यांनी राज्यसभेत एका प्रश्नाला लेखी उत्तर देताना सांगितले की, देशभरात कोट्यावधी निष्क्रिय बँक खाते असून, या खात्यात  तब्बल 26,697 कोटी रुपये तसेच पडून आहेत.

देशभरातील निष्क्रिय खात्यांमध्ये तब्बल 26,697 कोटी रुपये पडून; 'अशी' काढता येते रक्कम
प्रातिनिधिक फोटो

नवी दिल्ली : अर्थमंत्री निर्मला सितारमण यांनी राज्यसभेत एका प्रश्नाला लेखी उत्तर देताना सांगितले की, देशभरात कोट्यावधी निष्क्रिय बँक खाते असून, या खात्यात  तब्बल 26,697 कोटी रुपये तसेच पडून आहेत. गेल्या दहा वर्षांपासून या बँक खात्यात कुठलाही व्यवहार करण्यात आलेला नाही. भारताची मध्यवर्ती बँक असलेल्या आरबीआयने दिलेल्या माहितीनुसार भारतामध्ये निष्क्रिय खात्यांची संख्या 8,13,34,849 इतकी असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

आरबीआयच्या बँकांना सूचना

दरम्यान आता अशा निष्क्रिय खात्यांची संख्या कमी करण्यासाठी आरबीआयकडून पुढाकार घेण्यात आला आहे. बँकांनी त्यांच्याकडे असलेल्या प्रत्येक खात्याचा दर वर्षाच्या शेवटी आढावा घ्यावा. त्यातील ज्या खात्यांवर वर्षभरापासून एकही व्यवाहार झाला नाही, अशा ग्राहकांना त्यांच्या खात्यांची माहिती लेखी स्वरुपात द्यावी. संबंधित ग्राहकांना वर्षभरापासून त्यांच्या खात्यावर एकही व्यवहार झाला नसल्याची कल्पना द्यावी. तसेच जे खाते निष्क्रिय झाले आहेत, त्या खात्याच्या खातेदाराचा अथवा नॉमिनिचा शोध घेऊन ते पुन्हा सुरू करावेत. अशा सूचना आरबीआयकडून बँकांना देण्यात आल्या आहेत. ज्या खात्यावर सलग दोन वर्षांपर्यंत कुठलाही व्यवहार होत नाही, असे खाते निष्क्रिय म्हणून घोषित केले जाते. अशा खात्यातून तुम्हाला नंतर पैसे काढता येत नाहीत. मात्र या खात्यात पैसे जमा होऊ शकतात.

निष्क्रिय खात्यांची माहिती देणे बंधनकारक

आरबीआयच्या सूचनेनुसार सर्व बँकांना आपल्या निष्क्रिय खात्यांची माहिती बँकेच्या अधिकृत साईटवर देणे बंधनकारक करण्यात आले आहे. या साईटवर जाऊन आपले एखादे खाते निष्क्रिय झाले असेल तर त्याची माहिती आपल्याला मिळू शकते. त्यानंतर पॅन कार्ड, आधार कार्ड, मोबाईल नंबर या गोष्टींची पूर्तता केल्यानंतर आपल्याला त्या खात्यामध्ये किती रक्कम आहे याची देखील माहिती मिळते. संबंधित सर्व माहिती घेतल्यानंतर तुम्ही तुमच्या बँकेच्या शाखेत जाऊन क्लेम फॉर्म भरू शकता.  क्लेम फॉर्मसोबत आवश्यक ते सर्व कागदपत्रे जोडावी लागतता. त्यानंतर संबंधित बँक ही त्या खात्याचे व्हेरिफिकेशन करते. सर्व कागदपत्रे योग्य असल्यास तुम्हाला त्या खात्यातून रक्कम काढण्यास परवानगी देते. समजा एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाला असेल आणि त्याच्या नॉमिनीला निष्क्रिय खात्यातून पैसे काढायचे असतील, तर अशा परिस्थितीमध्ये त्याला संबंधित व्यक्तीचे मृत्यू पत्र आणि इतर आवश्यक कागदपत्र बँकेत सादर करावे लागतात.

संबंधित बातम्या

पेट्रोल,डिझेलमधून गेल्या आर्थिक वर्षात दुप्पट महसूल, केंद्रीय अर्थ राज्यमंत्र्यांची माहिती

व्यवसायिक गॅस सिलिंडरच्या दरात 100 रुपयांची वाढ; हॉटेलमधील जेवनही महागणार

जे केजरीवालांनी केलं ते ठाकरे सरकार करणार का?; दिल्लीत पेट्रोल स्वत, व्हॅट हटवला

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI