7th Pay Commission: सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर; ‘या’ आठवड्यात डबल बोनस मिळण्याची शक्यता

सरकारी कर्मचाऱ्यांच्या घरभाडे भत्ता (HRA) आणि DA मध्ये त्यांच्या मूळ वेतनाच्या आधारे वाढ केली जाईल. सध्याचा नियम म्हणतो की, डीएची रक्कम बेसिक सॅलरीच्या 25 टक्क्यांहून अधिक झाल्यास HRA 3% ने वाढतो. | 7th Pay Commission

7th Pay Commission: सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर; 'या' आठवड्यात डबल बोनस मिळण्याची शक्यता
पैसे कमवा
Follow us
| Updated on: Sep 29, 2021 | 9:45 AM

नवी दिल्ली: सरकारी कर्मचाऱ्यांसाठी ही चांगली बातमी आहे. अलीकडेच, पेन्शनधारकांसाठी त्याचा महागाई भत्ता (डीए) आणि महागाई निवारण (डीआर) वाढवण्यात आला आहे. त्यामुळे आता या आठवड्यात केंद्रीय कर्मचारी दुहेरी बोनसचा लाभ घेऊ शकतील. दोन महिन्यांपूर्वी केंद्र सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांचा डीए 17% वरून 28% करण्याचा निर्णय घेतला होता. 1 जुलैपासून या निर्णयाची अंमलबजावणी झाली होती. त्याचप्रमाणे सेवानिवृत्त केंद्रीय पेन्शनधारकांसाठीही सरकारने डीआर वाढवण्याचा निर्णय घेतला होता. या दोन्ही निर्णयांनंतर लवकरच सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांसाठी घरभाडे भत्ता वाढवण्याची घोषणा केली.

हे आदेश जारी करताना सरकारने म्हटले आहे की, सरकारी कर्मचाऱ्यांच्या घरभाडे भत्ता (HRA) आणि DA मध्ये त्यांच्या मूळ वेतनाच्या आधारे वाढ केली जाईल. सध्याचा नियम म्हणतो की, डीएची रक्कम बेसिक सॅलरीच्या 25 टक्क्यांहून अधिक झाल्यास HRA 3% ने वाढतो. 2017 मध्ये हा नियम करण्यात आला. कर्मचाऱ्याचा डीए त्याच्या बेसिक सॅलरीच्या 25% पेक्षा जास्त असेल त्याच्या HRA मध्ये बदल केला जाईल. त्यानुसार अलीकडेच केंद्र सरकारने आपल्या कर्मचाऱ्यांचा एचआरए जाहीर केला होता.

एचआरए आणि वेतन एकत्र देऊन सरकार केंद्रीय कर्मचाऱ्यांना दुहेरी बोनसचा लाभ देईल किंवा दोन्हीचे पैसे वेगवेगळे मिळतील, याबाबत कोणताही शासकीय निर्णय समोर आलेला नाही. परंतु सणासुदीचा काळ लक्षात घेता सरकार आपल्या कर्मचाऱ्यांना या ‘डबल बोनस’चा लाभ देऊ शकते. एचआरएचे पैसे वाढीव दराने मिळाल्याने पगारामध्ये मोठी वाढ होऊ शकते. मात्र, याबाबत केंद्र सरकारकडून कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.

HRA मध्ये वाढ झाल्यास काय फायदा?

HRA किंवा घरभाडे भत्ता हा कोणत्याही कर्मचाऱ्याच्या पगाराचा एक आवश्यक भाग आहे. अशा परिस्थितीत जर कर्मचाऱ्याच्या पगारामध्ये काही बदल झाला तर त्याचा परिणाम HRA वर दिसेल. डीएमध्ये वाढ झाल्यामुळे मूळ वेतन वाढेल आणि यासोबत एचआरए देखील वाढेल. केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी एचआरए वाढवून 27 टक्के करण्यात आला आहे. घरभाडे भत्त्याचा हा सुधारित दर सप्टेंबरच्या अखेरीस पगारामध्ये जोडून मिळू शकतो.

निवृत्त कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर, DA आणि ग्रॅच्युटी वाढणार

सेवानिवृत्त सरकारी कर्मचाऱ्यांसाठी ही आनंदाची बातमी आहे. आता त्यांना एकाच वेळी ग्रॅच्युइटी, रोख पेमेंट आणि वाढीव महागाई भत्त्याचा लाभ मिळेल. केंद्र सरकारने एका ट्विटद्वारे ही माहिती दिली आहे. अर्थ मंत्रालयाच्या खर्च विभागाने ही माहिती दिली आहे. या विभागाने म्हटले आहे की, आता सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनाही रोख पैसे आणि ग्रॅच्युइटीचा लाभ मिळेल.

केंद्र सरकारच्या कार्यरत कर्मचाऱ्यांसाठी अशीच एक घोषणा नुकतीच करण्यात आली. या कर्मचारी आणि निवृत्ती वेतनधारकांसाठी सरकारने DA आणि DR मध्ये वाढ जाहीर केली आहे. कोरोनामुळे सरकारने DA मध्ये केलेली वाढ थांबवली होती, जी आता पुन्हा सुरू करण्यात आली आहे.

या निर्णयानंतर केंद्र सरकारच्या सेवानिवृत्त अधिकाऱ्यांना रोख पेमेंट आणि ग्रॅच्युइटीचे फायदेही जाहीर करण्यात आले आहेत. सरकारने जानेवारी 2020 ते जून 2021 पर्यंत सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना ग्रॅच्युइटी देखील जारी केली आहे. सरकारने एक निवेदन जारी केले आहे ज्यात जानेवारी 2020 ते 30 जून 2021 पर्यंत डीए देण्याची घोषणा करण्यात आली आहे.

संबंधित बातम्या:

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर; ऑक्टोबर महिन्यात मिळणार 2,18,200 रुपयांची भेट

दिवाळीपूर्वी मोदी सरकारचं केंद्रीय कर्मचाऱ्यांना गिफ्ट, महागाई भत्त्यात 5 टक्के वाढ

सरकार एनपीएसमध्ये करणार हा मोठा बदल, कंपनी कायद्यात येऊ शकते पेन्शनचे काम

7th pay commission: निवृत्त कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर, DA आणि ग्रॅच्युटी वाढणार

Non Stop LIVE Update
मोदींवरील त्या वक्तव्यावर नवनीत राणांचं स्पष्टीकरण, विरोधकांवर घणाघात
मोदींवरील त्या वक्तव्यावर नवनीत राणांचं स्पष्टीकरण, विरोधकांवर घणाघात.
मशाल आहे की आईस्क्रीमचा..., भाजपच्या बड्या नेत्याची ठाकरे गटाला टोला
मशाल आहे की आईस्क्रीमचा..., भाजपच्या बड्या नेत्याची ठाकरे गटाला टोला.
सासूचे 4 दिवस संपले, आता सूनेचे दिवस...,दादांचा शरद पवारांना खोचक टोला
सासूचे 4 दिवस संपले, आता सूनेचे दिवस...,दादांचा शरद पवारांना खोचक टोला.
गद्दारी करणाऱ्यांना... ओमराजे निंबाळकरांची शिंदेंच्या खासदारावर टीका
गद्दारी करणाऱ्यांना... ओमराजे निंबाळकरांची शिंदेंच्या खासदारावर टीका.
खासदाराच्या प्रचारसभेत आमदाराला आली चक्कर, रुग्णालयात उपचार सुरु
खासदाराच्या प्रचारसभेत आमदाराला आली चक्कर, रुग्णालयात उपचार सुरु.
काँग्रेसचा जाहीरनामा मुस्लिमांना प्राधान्य देणारा? भाजपच्या टीकेवर....
काँग्रेसचा जाहीरनामा मुस्लिमांना प्राधान्य देणारा? भाजपच्या टीकेवर.....
राणेंच्या उमेदवारीवरून धाकधूक, नितेश राणेंचं वक्तव्य; एक दिवस थांबा...
राणेंच्या उमेदवारीवरून धाकधूक, नितेश राणेंचं वक्तव्य; एक दिवस थांबा....
नरेंद्र मोदी खोटारडे... त्यांच्या घोषणा भपंक, राऊतांचा मोदींवर घणाघात
नरेंद्र मोदी खोटारडे... त्यांच्या घोषणा भपंक, राऊतांचा मोदींवर घणाघात.
घड्याळ चिन्हाचं प्रकरण न्यायप्रविष्ट, दादांच्या जाहिरातीत काय म्हटलंय?
घड्याळ चिन्हाचं प्रकरण न्यायप्रविष्ट, दादांच्या जाहिरातीत काय म्हटलंय?.
उन्हाचा तडाखा वाढलाय, मुंबईसह 'या' शहरात उष्णतेची लाट, उन्हाची काहिली
उन्हाचा तडाखा वाढलाय, मुंबईसह 'या' शहरात उष्णतेची लाट, उन्हाची काहिली.